समीक्षकांचे संमेलन
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
साहित्य समीक्षकांचे पहिले संमेलन २९-३० नोव्हेंबर २०१२ रोजी पुण्यात झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे असणाऱ्या ८२ लक्ष रुपये निधीच्या व्याजातून हा उपक्रम झाला. संमेलनाध्यक्ष प्रा. के.रं. शिरवाडकर होते.
- संमेलनाचा कार्यक्रम असा होता.
- २९ नोव्हेंबर २०१२ संध्याकाळी ६ वाजता, ’साहित्य-समाज व संस्कृती’ या विषयावर के.रं. शिरवाडकरांचे बीजभाषण
- नंतरच्या सत्रात, वसंत आबाजी डहाके यांचे भाषण
- ३० नोव्हेंबर २०१२, ’साहित्याची बांधिलकी आणि लेखकाचे स्वातंत्र्य’, आदी ६-७ विषयांवर वक्ते त्यांचे विचार मांडतील.
- वक्त्यांची नावे - गिरीश कुबेर, डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. नीलिमा गुंडी, डॉ. किसन पाटील, डॉ. रेखा साने-इनामदार, डॉ. मंगला आठलेकर, डॉ.मनोहर जाधव.
समीक्षा संमेलन २०१३
[संपादन]संमेलनाध्यक्ष - डाॅ. सुधीर रसाळ
समीक्षा संमेलन २०१४
[संपादन]संमेलनाध्यक्ष - डॉ. दिलीप धोंडगे
समीक्षा संमेलन २०१५
[संपादन]संमेलनाध्यक्ष - डॉ. नागनाथ कोत्तापल्ले
समीक्षा संमेलन २०१७
[संपादन]महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे (शाहुपुरी-सातारा शाखा) आणि छत्रपती शिवाजी कॉलेज (सातारा)-मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २९ आणि ३० नोव्हेंबर २०१७ या काळात साताऱ्याला एक समीक्षा संमेलन झाले. अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. हरिश्चंद्र थोरात होते.
या संमेलनाचे सूत्र 'समीक्षा : सिद्धान्त आणि व्यवहार' असे होते. संमेलनाचे उद्घाटन माजी संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते झाले.
समीक्षा संमेलन २०१८
[संपादन]महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे (पंढरपूर शाखा) व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय (पंढरपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने १ डिसेंबर २०१८ रोजी पंढरपूर येथे एक दिवसीय समीक्षा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले या संमेलनाचे अध्यक्ष होते.
हे ही पहा
[संपादन]