Jump to content

के.रं. शिरवाडकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रा. केशव रंगनाथ शिरवाडकर (जन्म : इ.स. १९२६; - २५ मार्च २०१८) हे साहित्यसमीक्षक होते. ते मराठीत वैचारिक लेखन करत. मराठी साहित्यिक वि.वा. शिरवाडकरांचे हे धाकटे बंधू होत. प्रा.के.रं. शिरवाडकर हे तत्त्वज्ञान विषयातले भारतीय शिक्षण क्षेत्रातील एक प्रख्यात नाव होते. त्यांनी आयुष्यभर प्राध्यापकी आणि संशोधन-लेखन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि पुढे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भाषा या विषयात त्यांनी अध्यापनाचे काम केले.[१] त्यांच्या वाचन-लेखन-चिंतनाचे सार असलेले 'आपले विचारविश्व' हे पुस्तक वयाच्या ८४व्या वर्षी लिहिले. भारतीय विचारांच्या संदर्भात जगातील महत्त्वाच्या तत्त्वज्ञानाचे परिशीलन त्यांनी या ग्रंथात केले आहे.
प्रा.शिरवाडकर यांचे शिक्षण पुणे येथे झाले. ग.प्र. प्रधान आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्याचे ठरवले.त्यानुसार त्यांनी नांदेड येथील पीपल्स कॉलेजच्या उभारणीत योगदान दिले.या महाविद्यालयात ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून १९५० सालापासून अध्यापन करू लागले. नंतर ते तेथे १९५५ ते १९७३ या काळात प्राचार्य होते.[२]

पुस्तके[संपादन]


सन्मान आणि पुरस्कार[संपादन]

  • महाराष्ट्र साहित्य परिषदेने भरवलेल्या पहिल्या साहित्य समीक्षकांच्या संमेलनाचे अध्यक्षपद (२९-३० नोव्हेंबर, २०१२)
  • महाराष्ट्र सरकारकडून तत्त्वज्ञान व मानसशास्त्रविषयावरील पुस्तकासाठीचा ना. गो. नांदापूरकर पुरस्कार (‘संस्कृती, समाज आणि साहित्य’ या पुस्तकाला)

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ के. रं. शिरवाडकर. Loksatta (Marathi भाषेत). 13-04-2018 रोजी पाहिले. वि. वा. शिरवाडकर हे त्यांचे बंधू. त्यांचे जीवन आणि साहित्य या अनुषंगाने ‘तो प्रवास सुंदर होता’ हे पुस्तक त्यांनी लिहिले |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ शिरवाडकर, स्वाती. "येथे कर आमुचे जुळती". राजहंस ग्रंथवेध. मे २०१८ (मे २०१८): ५०. More than one of |pages= and |page= specified (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)