Jump to content

हार्वर्ड विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हार्वर्ड विद्यापीठ
ब्रीदवाक्य Veritas
Type खाजगी विद्यापीठ
स्थापना इ.स. १६३६
Endowment ३२.३ अब्ज अमेरिकन डॉलर (जून २०१३)
President ड्रू जिल्पिन फ्रॉस्ट
पदवी ७,२००
स्नातकोत्तर १४,०००
संकेतस्थळ www.harvard.edu



जॉन हार्वर्डचा पुतळा. ह्याचे नाव विद्यापीठाला दिले गेले.

हार्वर्ड विद्यापीठ हे अमेरिका देशाच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील केंब्रिज ह्या शहरात स्थित असलेले एक खाजगी संशोधन विद्यापीठ आहे. इ.स. १६३६ साली स्थापन झालेले हार्वर्ड हे अमेरिकेमधील सर्वात जुने उच्च शिक्षणासाठीचे विद्यापीठ आहे. अमेरिकन यादवी युद्धानंतर अध्यक्ष चार्ल्स एलियट ह्याच्या अथक प्रयत्नांमुळे हार्वर्ड जगातील सर्वोत्तम संशोधन शैक्षणिक संस्था बनली. सुमारे ३२.३ अब्ज डॉलर संपत्ती असलेले हार्वर्ड हे जगातील सर्वात श्रीमंत व प्रतिष्ठित विद्यापीठ आहे. आयव्ही लीग ह्या न्यू इंग्लंड परिसरातील प्रतिष्ठेच्या विद्यापीठ समूहाचा हार्वर्ड सदस्य आहे.

हार्वर्ड विद्यापीठ बॉस्टन शहराच्या ३ मैल वायव्येस चार्ल्स नदीच्या काठावर २०९ एकर जागेवर स्थित आहे. आजवर ८ अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी येथून शिक्षण घेतले आहे तसेच सुमारे १५० नोबेल पारितोषिक विजेते हार्वर्डसोबत जोडले आहेत.

शैक्षणिक संस्था

[संपादन]

हार्वर्ड विद्यापीठात खालील ११ स्वतंत्र शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत.

  • हार्वर्ड कॉलेज
  • हार्वर्ड मेडिकल स्कूल
  • हार्वर्ड डिव्हिनिटी स्कूल
  • हार्वर्ड लॉ स्कूल
  • हार्वर्ड स्कूल ऑफ डेंटल मेडिसिन
  • हार्वर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ आर्ट्स अँड सायन्स
  • हार्वर्ड बिझनेस स्कूल
  • हार्वर्ड एक्स्टेन्शन स्कूल
  • हार्वर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ डिझाईन
  • हार्वर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ एज्युकेशन
  • हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ
  • हार्वर्ड केनेडी स्कूल
  • हार्वर्ड स्कूल ऑफ इंजिनियरिंग अँड अप्लाईड सायन्सेस

प्रसिद्ध पदवीधर

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: