हॉवर्ड विद्यापीठ
Appearance
हार्वर्ड विद्यापीठ याच्याशी गल्लत करू नका.
हॉवर्ड विद्यापीठ ही एक अमेरिकेतील उच्चशिक्षण संस्था आहे. हे विद्यापीठ वॉशिंग्टन, डी.सी. मधील एक अमेरिकन खाजगी, फेडरल चार्टर्ड, भूतकाळातील कृष्णवर्णीयांचे संशोधन विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ "R2: डॉक्टरल युनिव्हर्सिटीज - उच्च संशोधन क्रियाकलाप" मध्ये वर्गीकृत असून उच्च शिक्षणावरील मध्य राज्य आयोगाद्वारे मान्यताप्राप्त आहे.[१]
इ.स. १८६७ पर्यंतच्या इतिहासाचा मागोवा घेता, हॉवर्ड विद्यापीठ, स्थापनेपासूनच सांप्रदायिक आणि लैंगिक भेदभाव रहित तसेच भिन्न वंशाच्या लोकांसाठी खुले आहे. हे १२० हून अधिक प्रोग्राम्समध्ये पदविका, पदवी आणि व्यावसायिक प्रशिक्षण व पदवी प्रदान करते; अमेरिकेतील इतर कोणत्याही ऐतिहासिकदृष्ट्या कृष्णवर्णीय महाविद्यालय आणि विद्यापीठापेक्षा (HBCU) जास्तच.[२]
निवडक माजी विद्यार्थी
[संपादन]- कमला हॅरिस - अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष
- टोनी मॉरिसन - पुलित्झर पुरस्कार आणि नोबेल पारितोषिक विजेत्या कादंबरीकार
- थर्गूड मार्शल - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
संदर्भ
[संपादन]- ^ "Carnegie Classifications Institution Lookup". carnegieclassifications.iu.edu. Center for Postsecondary Education. 2022-05-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
- ^ Clay, Gregory (May 23, 2016). "College Choice says Spelman is the top HBCU …".
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत