मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ - १८६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई शहर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, मुंबादेवी मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. २०८ - उमरखाडी, २०९ -डोंगरी, ३१०-खारा तलाव, ३११ - कुंभारवाडा, ३१२ - भुलेश्वर, ४१७-ताडदेव, ५२५- २रा नागपाडा, ५२६ - कामाठीपुरा यांचा समावेश होतो. मुंबादेवी हा विधानसभा मतदारसंघ मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अमिन अमीरअली पटेल हे मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ अमिन अमीरअली पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ अमिन अमीरअली पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ अमिन अमीरअली पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".