अर्जुन
अर्जुन ही महाभारतातील एक प्रमुख व्यक्तिरेखा असून तो पांडवांमधला तिसरा भाऊ होता. तो इंद्राच्या कृपेने पंडूची पत्नी कुंती हिला झालेला पुत्र होता. महाभारतीय युद्धात त्याचा सारथी असलेल्या कृष्णाने त्याला युद्धप्रसंगी कर्ममार्गाची आठवण करून देणारी भगवद्गीता सांगितली
.
महाभारतातील कृष्ण, भीष्म, द्रोणाचार्य, विदुर, नारदमुनी आणि धृतराष्ट्र यांच्यानुसार तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर व अद्वितीय योद्धा होता. महाभारतात तोच एकटा अपराजित शूर होता.
कुरुक्षेत्रातील युद्धात कौरवांच्या अपयशात याचा प्रमुख वाटा होता. हिंदू संस्कृतीमध्ये तो शौर्याचे प्रतीक मानला जातो. हिंदू धर्मानुसार तो नराचा अवतार होता तर कृष्ण हा नारायणाचा अवतार होता.
अर्जुनाला द्रौपदीव्यतिरिक्त उलुपी, सुभद्रा आणि चित्रांगदा या पत्नी होत्या.
बृहन्नडा
[संपादन]अर्जुनाने अज्ञातवासात असताना षंढवेश धारण केला व बृहन्नडा या नावाने विराटाच्या नगरीत एक वर्ष काढले.
पुस्तक
[संपादन]अर्जुनाच्या जीवनावर सुनील देसाई यांनी ’सर्वश्रेष्ठ धनुर्धर’ नावाची कादंबरी लिहिली आहे.
पहा : अर्जुन वृक्ष
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |