व्हरकटवाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?व्हरकटवाडी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर धारूर
जिल्हा बीड
तालुका/के धारुर
लोकसंख्या ६६४ (२०११)
भाषा मराठी
सरपंच
ग्रामपंचायत व्हरकटवाडी
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• 431128
• MH

व्हरकटवाडी हे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातील गाव आहे.धारूर तालुका हा बालाघाटच्या डोंगर रांगात वसलेला तालुका आहे. तालुक्याच्या खास तीन ओळखी १) दुष्काळी तालुका २) ऊसतोड कामगारांचा तालुका ३) गोड सीताफळांंचा तालुका. व्हरकटवाडी हे असेच एक दुर्लक्षित व मागास वाडी. आपल्या प्रयत्नांनी या छोट्या वाडीने दुष्काळावर मात करण्याचा सामूहिक प्रयत्न केला.[१]

पार्श्वभूमी[संपादन]

व्हरकटवाडी बीड पासून ३८ किलोमीटर अंतरावर आहे.धारूर पासून २२ किलोमीटर अंतरावर आहे. गावाचे एकूण क्षेत्र ५४६ हेक्टर. गावात १४७ घरे आहेत. [२] २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ६६४ आहे.त्यातील ३६९ पुरुष आणि ३१५ महिला आहेत.[३]

दुष्काळी परिस्थिती[संपादन]

२०१४ व २०१५ हे दोन सलग वर्षे बीड जिल्ह्यात दुष्काळ होता.[४] [५] [६] शेतातील नापिकी,शेतकरी आत्महत्या[७], गुरांच्या दुष्काळी धावण्या व गावोगावी पिण्याच्या पाण्याचे टँँकर अशी विदारक परिस्थिती जिल्ह्यातील सर्वच गावांची होती.[८] व्हरकटवाडी कमी पर्जन्यमान असल्याने हे गाव नेहमीच दुष्काळी भागात मोडते.[९] कोरडवाहू शेतीवर उपजीविका होत नसल्याने गावातील लोक ऊसतोडणीसाठी जातात.[१०] [११] [१२] [१३]

दुष्काळाशी दोन हात[संपादन]

गावातील लोकांनी व ग्रामपंचायतीने गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणलोटक्षेत्र विकासाचा प्रकल्प केला. पानी फाउंडेशनतर्फे होणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ व २०१८ स्पर्धेत [१४] गाव सहभागी झाले होते.[१५]

सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ स्पर्धेत थोडे काम करून गावाला पाण्याचे व पाणलोटक्षेत्र विकासाचे महत्त्व कळाले. धारूर तालुक्यातील अनेक गावांनी या स्पर्धेत काम करून आपले गाव पाणीदार केले होते.[१६]

सत्यमेव जयते वॉटर कप २०१८ स्पर्धेत मात्र गाव पूर्ण ताकदीने उतरले. पानी फाउंडेशनतर्फे तांत्रिक प्रशिक्षण [१७] झाल्यावर गावाची शिवार फेरी करून कामाचे नियोजन झाले. ग्रामसभेत आगकाडी मुक्त शिवार, चराई बंदी, कुऱ्हाडबंदी असे निर्णय सामूहिकरित्या घेऊन त्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. ८ एप्रिल २०१८ पासून गावाने काम करण्यास सुरुवात केली. पुढील ४५ दिवसात श्रमदान व मशिनच्या माध्यमातून काम करून मोठा जलसाठा निर्माण करण्यात आला. प्रत्येक घरात शोषखड्डा, गावातील शिवारातील माती परीक्षण, गावाच्या प्रति माणसी ६ घनमीटर श्रमदान झाले.[१८] माथा ते पायथा पद्धतीने गावाच्या पाणलोट क्षेत्रावर उपचार करण्यात आले. क्षेत्र उपचार म्हणून बांध बंदिस्ती,सलग समपातळीतील चर,खोल सलग समपातळीतील चर,अनगड दगडी बांध तर पायथ्याचे उपचार म्हणून नदी खोलीकरण,शेततळी व मातीनाला बांध करण्यात आले. स्पर्धेतील गुणदानाच्या निकषानुसार काम झाले. गावात मोठा पाणी साठा तयार करण्यात आला.[१९]गावाला यावर्षी स्पर्धेत यश मिळाले नाही परंतु गाव पाणीदार झाले.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न या कामाने सुटला. [२०] [२१] [२२] [२३] [२४]

सामाजिक संस्थांची मदत[संपादन]

या सर्व कामात गावाने श्रमदान केले व ज्ञान प्रबोधिनी,अंबाजोगाईने अवजड यंत्रांच्या द्वारे काम करण्यासाठी मदत केली.[२५] [२६] [२७] [२८] [२९]

बक्षीस[संपादन]

सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ स्पर्धेत तालुका पातळीवरील दुसरे बक्षीस. .[३०]

संदर्भ[संपादन]

  1. ^ https://www.youtube.com/watch?v=apcGFAKefHU
  2. ^ https://villageinfo.in/
  3. ^ https://www.census2011.co.in/
  4. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2020-09-21. 2020-08-30 रोजी पाहिले.
  5. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2020-09-21. 2020-08-30 रोजी पाहिले.
  6. ^ https://agrostar.in/amp/hi/maharashtra/article/agrostar-information-article-5bf00e3a2e7b8c499bc2a938[permanent dead link]
  7. ^ https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/beed/farmers-sucide/articleshow/48929188.cms
  8. ^ https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-drought-situation-beed-maharashtra-19936
  9. ^ http://bepls.com/spl_2017(3)/7.pdf
  10. ^ https://www.deccanherald.com/content/501207/beed-district-witnesses-large-scale.html
  11. ^ https://www.dhan.org/developmentmatters/2014/march/case1.php
  12. ^ https://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/184688/10/10_chapter%203.pdf
  13. ^ https://sg.inflibnet.ac.in/bitstream/10603/184688/10/10_chapter%203.pdf
  14. ^ https://www.paanifoundation.in/watercup/
  15. ^ https://www.paanifoundation.in/watercup/list-of-talukas/
  16. ^ https://www.youtube.com/watch?v=apcGFAKefHU&list=PLM1KhQfAebfHxD6MnW2rGCcw1TIZUML7f&index=30
  17. ^ https://www.paanifoundation.in/samruddh-gaon/training-programme/
  18. ^ https://www.loksatta.com/maharashtra-news/adhik-mahina-pani-foundation-vharkatwadi-water-cup-competition-beed-1683723/
  19. ^ https://www.maxmaharashtra.com/max-reports/on-the-strength-of-stubbornness-the-vraktavadi-villagers-made-the-village-a-paradise-23611-2/23611/
  20. ^ https://www.youtube.com/watch?v=5pMAna6R1D8&list=PLM1KhQfAebfHxD6MnW2rGCcw1TIZUML7f&index=14
  21. ^ https://www.youtube.com/watch?v=YHeZ-Vnrkl0&list=PLM1KhQfAebfHxD6MnW2rGCcw1TIZUML7f&index=32
  22. ^ https://www.youtube.com/watch?v=Y52xBSXVP2M&list=PLM1KhQfAebfHxD6MnW2rGCcw1TIZUML7f&index=35
  23. ^ https://www.youtube.com/watch?v=HptVAtNFARQ
  24. ^ https://www.esakal.com/saptarang/mahesh-bardapur-write-article-saptarang-121103
  25. ^ https://www.youtube.com/watch?v=ffVcUitxSjg
  26. ^ https://www.evivek.com//Encyc/2019/6/3/-dnyan-prabodhini-works-to-drought-.html
  27. ^ https://www.evivek.com//Encyc/2019/6/3/-drought-IN-Marathwada0898989.html
  28. ^ https://thelogicalindian.com/story-feed/get-inspired/satyamev-jayate-water-cup/?infinitescroll=1
  29. ^ https://www.pudhari.news/news/Marathwada/Water-Cup-Tournament-start-today/m/[permanent dead link]
  30. ^ https://www.paanifoundation.in/watercup/list-of-2017-smj-water-cup-winners/