आत्महत्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एदुआर्द माने याने रंगवलेले चित्र - "आत्महत्या" (इ.स. १८७७-८१)

आत्महत्या म्हणजे सहेतुकपने स्वतःच स्वतःला जीवे मारण्याचे कृत्य होय. पुष्कळदा आत्यंतिक नैराश्यामुळे किंवा मनात उद्भवलेल्या मानसिक विकारांमुळे (उदा.: वैफल्य, छिन्नमनस्कता, मद्यपाश, नशेच्या पदार्थांचा अंमल इत्यादी) व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त होते. तणाव, दुर्दैवाने वाट्याला आलेली आर्थिक संकटे, वैयक्तिक नातेसंबंधांतील गुंते यांचाही यात वाटा असू शकतो. आत्महत्या करू पाहणार्‍या व्यक्ती गळफास लावून घेणे, नस कापणे, विषारी पदार्थ सेविणे, उंचावरून उडी मारणे असे विभिन्न मार्ग चोखाळत असल्याचे आढळते.

जगभरात दर वर्षी सुमारे दहा लाख माणसे आत्महत्या करतात[ संदर्भ हवा ]. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार मानवी मृत्यूच्या कारणांच्या क्रमवारीत आत्महत्या तेराव्या क्रमांकावरचे कारण आहे[१].

आत्महत्येची कारणे [संपादन]


Globe important.svg
या लेखातील किंवा विभागातील मजकुराचा दृष्टिकोन विषयाची जागतिक व्याप्ती दर्शवत नाही. स्थानिकतेच्या संदर्भापुरतीच व्याप्ती सीमित ठेवणे अपेक्षित असल्यास, देशाचा/स्थानिक व्याप्तीचा स्पष्ट उल्लेख करावा. किंवा जागतिक संदर्भांत लिहावयाचे असल्यास पुनर्लेखन करावे. यासंबंधी चर्चा घडवून आणण्यासाठी कृपया चर्चापानावर चर्चा करावी.

ज्या वेळी एखाद्या व्याकीतीला त्याचे जीवन निरस वाटते तेव्हा नैसर्गिक रित्या त्याच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येतात. अशा वेळी जर त्याला योग्य असे मानसिक धौर्या मिळाले नाही तर तो स्वतालः संपवायचा प्रयत्न करतो. महाराष्ट्रातील विदर्भ या क्षेत्रातील कितीतरी शेतकर्यांनी नापिकी आणि सावकारी कर्जापायी आत्महत्या केली आहे. तसेच बहुतेक विद्यार्थी परीक्षेत अपयश आले म्हणून आत्महत्या करतात.

ज्या वेळी एखाद्या व्यक्तीला त्याचे जीवन निरस वाटते तेव्हा नैसर्गिक रित्या त्याच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येतात. अशा वेळी जर त्याला योग्य असे मानसिक ध्येर्य मिळाले नाही तर तो स्वतला: संपवायचा प्रयत्न करतो. महाराष्ट्रातील विदर्भ या क्षेत्रातील कितीतरी शेतकऱ्यानी नापिकी आणि सावकारी कर्जापायी आत्महत्या केली आहे. तसेच बहुतेक विद्यार्थी परीक्षेत अपयश आले म्हणून आत्महत्या करतात.
त्रूटी उधृत करा: पानामधे <ref> (संदर्भ) आहे, परंतु <references/> ({{संदर्भयादी}}<nowiki />) सापडले नाही. <nowiki>{{संदर्भयादी}}<nowiki /> असल्याशिवाय पानाच्या तळाशी संदर्भांचे तपशील दिसणार नाहीत.</strong>