मखमली शिलींध्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मखमली शिलींध्री
Sitta frontalis -Assam -India-8.jpg
शास्त्रीय नाव Sitta frontalis (Swainson)
कुळ (Sittidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश Velvet-fronted Nuthatch
संस्कृत नील शिलींध्री
हिंदी कठफोडिया

वर्णन[संपादन]

मखमली शिलींध्री पक्षी हा आकाराने चिमणीपेक्षा लहान, पाठीकडून निळसर जांभळ्या रंगाचा तर पोटाकडून फिकट पांढर्‍या राखाडी रंगाचा असून याच्या कपाळावर आडवा, ठळक, मखमली काळा पट्टा आहे. नराच्या डोळ्याजवळ, भुवईजवळ छोटे काळे पट्टे असतात तर मादीला असे पट्टे नसतात. हा फरक सोडला तर नर-मादी दिसायला अगदी सारखेच.

वास्तव्य/आढळस्थान[संपादन]

सर्व प्रकारच्या दाट जंगलाच्या भागात आढळणारा मखमली शिलींध्री पक्षी संपूर्ण भारतभर स्थानिक निवासी पक्षी आहे. पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, चीन, इंडोनेशिया, म्यानमार, मलेशिया या देशातही तो आढळतो. फक्त हिमालयाच्या पूर्व बाजुकडून आसाम, म्यानमार ते मलेशिया या भागातील याची उपजात थोडी लहान आहे.

खाद्य[संपादन]

विविध दाणे, बिया, फळातील गीर, कीटक, त्यांच्या अळ्या, सुरवंट, कोळी हे यांचे खाद्य आहे.

प्रजनन काळ[संपादन]

या पक्ष्यांचा उत्तर भारतातील वीण काळ साधारणपणे एप्रिल ते जून असा असून दक्षिण भारतातील पक्ष्यांचा वीण काळ फेब्रुवारी ते एप्रिल-मे असा आहे. मखमली शिलींध्री या पक्ष्याचे घरटे उंच झाडांच्या ढोलीत, सहसा सुतार वगैरे पक्ष्यांनी सोडून दिलेल्या ढोलीत, पाने, कापूस, पिसे वगैरे साहित्य वापरून तयार केलेले असते. अशा घरट्याचे प्रवेशद्वार चिखलाने आवश्यकतेनुसार व्यवस्थीत बंद केलेले असते.

मादी एकावेळी ३ ते ६ पांढर्‍या रंगाची त्यावर लाल किंवा जांभळ्या तुटक ठिपके, रेषा असलेली अंडी देते. अंडी उबविण्यापासून पिलांच्या संगोपनापर्यंतची सर्व कामे नर-मादी मिळून करतात.

चित्रदालन[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.