कावळा
| कावळा | ||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| प्रजातींची उपलब्धता | ||||||||||||
| शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||
|
||||||||||||
अनुक्रमणिका |
वर्णन [संपादन]
कावळा माणसाच्या वसाहतीजवळ पण घरात न येणारा, परिचित पक्षी आहे. हा पक्षी चलाख, सावध, चपळ, खाण्यासाठी विशिष्ट आवड नसलेला, मृतभक्षी आहे.
गृह कावळा हा सुमारे १७ इं. (४२ सें. मी.) आकाराचा, मानेजवळचा भाग राखाडी रंगाचा तर उर्वरीत काळ्या रंगाचा एक पक्षी आहे. नर-मादी दिसायला सारखेच असतात. तर संपूर्ण काळ्या रंगाच्या कावळ्याला डोमकावळा असे म्हणतात.
आवाज [संपादन]
माकडांना हुसकावून लावतांना कावळ्यांचा कलकलाट (सहाय्य·माहिती)
वास्तव्य/आढळस्थान [संपादन]
कावळा संपूर्ण भारतभर आढळणारा पक्षी असून भारताशिवाय तो बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, मालदीव वगैरे देशांमध्ये सपाट भूप्रदेश ते डोंगराळ भागात सर्वत्र आढळतो.
गृह कावळ्याच्या आकार आणि मानेजवळील राखाडी रंगाच्या छटांवरून यांच्या किमान ४ उपजाती आहेत.
खाद्य [संपादन]
शिजलेले अन्न, धान्य, उंदीर, उधळी, लहान पक्षी, त्यांची अंडी, मृत जनावरे असे सर्व प्रकारचे खाद्य हे पक्षी खातात.
प्रजनन काळ [संपादन]
साधारणपणे एप्रिल ते जून हा काळ कावळ्यांचा वीणीचा काळ आहे. हे पक्षी जमिनीपासून किमान ३ मी. उंचीवर खोलगट, काटक्यांचे आणि मिळेल ते साहित्य वापरून घरटे तयार करतात. मादी एकावेळी ४ ते ५ फिकट निळी-हिरवी त्यावर तुटक तपकिरी रेषा असलेली अंडी देते. नर-मादी पिलांचे संगोपन मिळून करतात. कित्येकदा कावळ्याच्या घरट्यात कोकिळा आपली अंडी सोडून निघून जाते. अशा पिलांची देखभाल कावळेच करतात.
इतर [संपादन]
हिंदू संस्कृतीत माणसाच्या मृत्यूपश्चात तेराव्या दिवशी व प्रत्येक श्राद्धाच्या वेळेस कावळ्याला केळ्याच्या पानात जेवण देण्याची प्रथा आहे. तसेच रोजच्या अन्नातील एक घास कावळ्यासाठी काढून ठेवण्याची प्रथा आहे.