कोकिळ
| शास्त्रीय नाव | Eudynamys scolopacea scolopacea (Linnaeus) |
|---|---|
| कुळ | कोकिलाद्य (Cuculidae) |
| अन्य भाषांतील नावे | |
| इंग्लिश | Asian Koel |
| संस्कृत | पिक, कोकिल |
| हिंदी | कोयल |
(या प्रजातीतील नराचा आवाज ऐका.)[१]
उन्हाळ्याची चाहूल लागताच सर्वत्र कुहू-कुहू-कुहू आवाज ऐकू येतो तो नर कोकिळ पक्ष्याचा. हिवाळ्याची सुरूवात होत असता मात्र हा एकदम गडप झाल्यागत वाटतो. याच्या मादीचा आवाज किक-किक-किक असा असतो.
अनुक्रमणिका |
वर्णन [संपादन]
साधारणपणे कावळ्याएवढा (१७ इं) आकाराचा हा पक्षी असून शेपटी लांब असते. नराचा मुख्य रंग काळा, डोळे गडद लाल रंगाचे चोच फिकट पोपटी रंगाची असून मादीचा मुख्य रंग गडद तपकिरी व त्यावर पांढरे-बदामी ठिपके-पट्टे असतात. याच्या किमान तीन उपजाती आहेत.
आढळ [संपादन]
कोकिळ पक्षी संपूर्ण भारतभर सर्वत्र आढळतो तसेच बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार श्रीलंका येथेही याचे वास्तव्य आहे. कोकिळ भारतात निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे.
वसतिस्थान [संपादन]
कोकिळ पक्षी मुख्यत्वे झाडावरच राहणारा (Arboreal) असून तो दाट पाने असलेल्या झुडपी जंगलात, बागेत, शेतीच्या भागात राहणे पसंत करतो.
खाद्य [संपादन]
कीटक, फुलपाखरे, सुरवंट, फळे, मध हे यांचे आवडते खाद्य आहे.
वीण काळ [संपादन]
मार्च ते ऑगस्ट हा काळ कोकिळ पक्ष्यांचा वीणीचा काळ असून हे पक्षी आपले घरटे बांधत नाही तसेच ते आपल्या पिलांची देखभालही करत नाही. मादी (कोकिळा) फिकट हिरव्या-राखाडी रंगाची त्यावर लालसर-तपकिरी ठिपके असलेली अंडी तिला दिसेल अशा कोण्त्याही इतर पक्ष्याच्या घरट्यात आपली अंडी सोडून जाते.
पिलांचे संगोपन [संपादन]
इतर पक्ष्यांच्या घरट्यात सोडून दिलेली अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे कामे असे पालक माता-पिता करतात. सहसा त्यांची स्वतःची पिले अंड्यातून बाहेर येण्या आधी कोकिळेचे पिले बाहेर आलेली असतात आणि त्यांची वाढही इतर पिलांच्या मानाने वेगाने होते.
चित्रदालन [संपादन]
संदर्भ [संपादन]
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |