आंगेला मेर्कल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आंगेला मेर्केल या पानावरून पुनर्निर्देशित)
आंगेला मेर्कल
आंगेला मेर्कल

जर्मनीची चान्सेलर
विद्यमान
पदग्रहण
२२ नोव्हेंबर २००५
मागील गेर्हार्ड श्र्योडर

जन्म १७ जुलै, १९५४ (1954-07-17) (वय: ६०)
हांबुर्ग, पश्चिम जर्मनी
सही आंगेला मेर्कलयांची सही

आंगेला मेर्कल (जर्मन: Angela Merkel; जन्म: १७ जुलै १९५४) ही जर्मनी देशाची विद्यमान चान्सेलर आहे. २००५ सालापासून चान्सेलरपदावर असलेली मेर्कल ही जर्मनीची पहिली महिला चान्सेलर आहे.

भौतिक रसायनशास्त्रामध्ये डॉक्टरकीची पदवी मिळवलेली मेर्कल १९९० सालच्या जर्मनीच्या पुन:एकत्रीकरणानंतर मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न राज्यामधून जर्मनीच्या संसदेवर निवडून आली. त्यानंतर तिने जर्मन सरकारमध्ये महिला व बाल मंत्रालय, पर्यावरणमंत्रालय इत्यादी खाती सांभाळली. २००५ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विजय मिळवून चान्सेलरपदावर आल्यानंतर मेर्कलने २००९ व २०१३ सालच्या निवडणुकांमध्ये विजय मिळवून सत्ता राखली आहे.

आजच्या घडीला मेर्कल युरोपियन संघामधील सर्वात प्रभावशाली व्यक्ती मानली जाते. २०१२ साली फोर्ब्ज मासिकाने मेर्कल जगातील दुसऱ्या क्रमांकाची बलाढ्य व्यक्ती असल्याचे नमूद केले. २००९ साली भारत सरकारने तिला जवाहरलाल नेहरू पुरस्कार बहाल केला. बरेच वेळा इतिहासकारांकडून मेर्कलची तुलना माजी ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचरसोबत केली जाते.

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: