महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
लेखक डॉ. ज्ञानराज काशीनाथ गायकवाड 'राजवंश'
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार जीवनचरित्र
प्रकाशन संस्था रिया पब्लिकेशन्स्, कोल्हापूर
प्रथमावृत्ती जून २००६
चालू आवृत्ती ऑगस्ट २०१६ (सहावी)
मुखपृष्ठकार सतीश भावसार
विषय डॉ. बाबासाहेब आंबेडकर
पृष्ठसंख्या ४२३

महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे इ.स. २००६ मधील लेखक डॉ. ज्ञानराज काशीनाथ गायकवाड 'राजवंश' लिखित भारतीय बहुआयामी विद्वान आणि समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मराठी चरित्र आहे. हे पुस्तक जून २००६ मध्ये रिया प्रकाशनाद्वारे पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर ऑगस्ट २०१६ मध्ये या पुस्तकाची सहावी आवृत्ती प्रकाशित झाली. कार्यकाळानुसार पाच अध्याय अशी या पुस्तकाची रचना आहे.[१]

ज्ञानराज काशीनाथ गायकवाड 'राजवंश' यांनी आंबेडकरांचे इंग्रजी चरित्र "द मिरॅक्युलस ग्रेट मॅन: डॉ. भीमराव रामजी आंबेडकर" तसेच हिंदी चरित्र "महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर" देखील लिहिले आहे.

रचना[संपादन]

  • पहिला अध्याय (इ.स. १८९१ ते इ.स. १९२३) : समाजहिततत्पर कीर्तिमान महाज्ञानी
  • दुसरा अध्याय (इ.स. १९२४ ते इ.स. १९४२) : धीरोदात्त महानायक
  • तिसरा अध्याय (इ.स. १९४२ ते इ.स. १९५६) : कर्तव्यरत मंत्री, राज्यघटनेचे श्रेष्ठ शिल्पकार, जागृत राज्यसभासदस्य
  • चौथा अध्याय (इ.स. १९३५ ते इ.स. १९५६) : बौद्ध धर्माचा स्वीकार आणि महामानवाचे महापरिनिर्वाण
  • पाचवा अध्याय (इ.स. १८९१ ते इ.स. १९५६) : महामानवाची तेजस्वी व विजयी जीवनयात्रा

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "मराठी पुस्तक महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, marathi book mahAmAnava DOE. bhImarAva rAmajI AMbeDakara mahAmAnawa Do. bhImarAwa rAmajI AnbeDakara". www.rasik.com. 2020-02-19 रोजी पाहिले.[permanent dead link]