वृश्चिक रास
वृश्चिक एक ज्योतिष-राशी आहे पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी ३० अंशाचे असे बारा भाग केले आहेत. वृश्चिक रास ही आठव्या भागात येते, म्हणून ही राशी कुंडलीत ८ या आकड्याने दर्शवतात. या राशीमध्ये विशाखा नक्षत्राच्या चारापैकी चौथा चरण(भाग), आणि अनुराधा व ज्येष्ठा ही संपूर्ण नक्षत्रे येतात.
या राशीवर मंगळ (ज्योतिष) ग्रहाचा अंमल आहे. ही जलतत्त्वाची आणि स्थिरस्वभावाची आहे. ही चंद्राची नीच रास आहे.
स्वभाव
[संपादन]ही रास असणारी माणसे शारीरिक दृष्ट्या चिवट, काटक व स्पष्टवक्ती असतात. त्यांच्यात प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता असते. त्यांना जबरदस्त इच्छाशक्ती असते आणि ती कुटुंबावर अतिशय प्रेम करतात.
हे सुद्धा पहा
[संपादन]फलज्योतिषातील ग्रह व राशी
| |||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|