"उंट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
#WLF
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
ओळ ४२: ओळ ४२:
उंटाचा प्रमुख उपयोग वाळवंटातील वाहन म्हणून केला जातो. त्याची पाणी न पिता तसेच चरबी साठवणूक करण्याची क्षमता यामुळे तो वाळवंटी प्रदेशातील आदर्श वाहन बनतो. उंटाच्या चरबीचा वापर करून घेतला जातो. उंटाचे मांस खाण्यासाठी वापरले जाते तर [[चामडे]] [[पादत्राणे]] बनविण्यासाठी वापरले जाते.
उंटाचा प्रमुख उपयोग वाळवंटातील वाहन म्हणून केला जातो. त्याची पाणी न पिता तसेच चरबी साठवणूक करण्याची क्षमता यामुळे तो वाळवंटी प्रदेशातील आदर्श वाहन बनतो. उंटाच्या चरबीचा वापर करून घेतला जातो. उंटाचे मांस खाण्यासाठी वापरले जाते तर [[चामडे]] [[पादत्राणे]] बनविण्यासाठी वापरले जाते.
उंटाच्या केसांपासून काही विशिष्ट प्रकारची [[औद्योगिक वस्त्रेही]] बनविली जातात.
उंटाच्या केसांपासून काही विशिष्ट प्रकारची [[औद्योगिक वस्त्रेही]] बनविली जातात.
[[File:A jumping camel.jpg|thumb|जैसलमेर वाळवंट महोत्सवात हे उंट आहे.]]

== संदर्भ ==
== संदर्भ ==
* Davidson, Alan. ''Oxford Companion to Food'' (1999). "Camel", p. 127
* Davidson, Alan. ''Oxford Companion to Food'' (1999). "Camel", p. 127

०५:५०, ३० सप्टेंबर २०२० ची आवृत्ती

ऊंट

शास्त्रीय वर्गीकरण
वंश: पृष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: आर्टिओडाक्टायला
कुळ: कॅमेलिडे
जातकुळी: कॅमेलस
लिन्नॉस, १७५८

उंट हा एक वाळवंटी प्रदेशात राहणारा प्राणी आहे. वाळवंटातील वास्तव्यासाठी त्याची नैसर्गिक जडणघडण झाली आहे.

उंटांच्या मुख्यत्वे दोन जाती आहेत. एक वाशींडी व दोन वाशींडी (बॅक्ट्रीयन उंट). या शिवाय उंटांच्या अजून चार उप-जाती आहेत. या पैकी लामा अल्पाका, ग्वुनाको, विकुना या दक्षिण अमेरिका खंडात आढळणाऱ्या उप प्रजाती आहेत. उंट साधारणपणे चाळीस ते पन्नास वर्षे जगतो. पूर्ण वाढ झालेल्या ऊंटाची उंची साधारणपणे वाशींडांना धरून सात फूटांपेक्षा जास्त असते. उंटाचा वेगाने धावण्याचा वेग पासष्ट कि.मी. प्रति तास असतो. तर लांबवर पल्ला गाठण्याचा वेग चाळीस कि.मी. प्रति तास असतो.

इतिहास

उंटांच्या अवषेशांवरून असे सिद्ध झाले आहे की एक वाशींडी उंट हे मुलतः अमेरिकेतून अलास्का मार्गे आशिया खंडात पसरले असे मानले जाते. तर दोन वाशींडांचे उंट मूलतः तुर्कस्तान च्या वाळवंटी प्रदेशातून आशिया खंडात पसरले असे मानले जाते. पू्र्वी तुर्कस्तानला बॅक्ट्रीया असे नाव होते त्यावरून बॅक्ट्रीयन उंट असे नाव या प्राण्याला पडले.

वास्तव्य

आज जगात मुख्यतः उंट आफ्रिका खंडात सोमालिया, सुदान या देशांच्या आसपास आढळतात. तसेच आशिया खंडात मंगोलिया, चीन, अफगाणिस्तान, इराक या भागातही आढळतात. भारतातही राजस्थान येथे उंट आढळतात.

वरील सर्व भागातील उंट हे मुख्यतः माणसाळवले गेले आहेत. परंतु ऑस्ट्रेलिया खंडाच्या मध्य भागात अजूनही नैसर्गिक उंट आहेत. यांची संख्या सुमारे सात लाख इतकी आहे व त्यांचे प्रजनन ११% दराने वाढते आहे.

वंश विषयक

उंट वा लामा यांच्या एकत्रीत प्रजोत्पादनाचे प्रयत्न झाले आहेत. तसेच एक व दोन वाशींडी उंटाचे प्रजननही केले जाते. यांना 'बुख्त' असे संबोधन आहे. हे साधारणपणे कझाकिस्तान या प्रदेशात आढळतात.

निसर्गाशी जुळवून घेण्याची क्षमता

उंट अन्न चरबीच्या रुपात वाशींडां मध्ये साठवून ठेवतो आणि अन्नाची कमतरता आल्यावर त्यातून गरज भागवतो. उंटांच्या लाल पेशीचा आकार अंडाकृती असतो यामुळे कमी पाणी शरीरात असतांनाही त्या कार्यरत राहतात.

उपयोग

सुदान मध्ये उंटांची शेती ही केली जाते. लष्करात उंटांचा वापर करून घेतला जातो.

उंटांचे दूध पिण्यासाठी वापरले जाते.

उंटाचा प्रमुख उपयोग वाळवंटातील वाहन म्हणून केला जातो. त्याची पाणी न पिता तसेच चरबी साठवणूक करण्याची क्षमता यामुळे तो वाळवंटी प्रदेशातील आदर्श वाहन बनतो. उंटाच्या चरबीचा वापर करून घेतला जातो. उंटाचे मांस खाण्यासाठी वापरले जाते तर चामडे पादत्राणे बनविण्यासाठी वापरले जाते. उंटाच्या केसांपासून काही विशिष्ट प्रकारची औद्योगिक वस्त्रेही बनविली जातात.

जैसलमेर वाळवंट महोत्सवात हे उंट आहे.

संदर्भ

बाह्य दुवे