Jump to content

म्हसवड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?म्हसवड

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

१७° ३८′ ०६″ N, ७४° ४७′ १३.२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा सातारा
तालुका/के माण
लोकसंख्या
लिंग गुणोत्तर
साक्षरता
२५,४९४[] (२००१)
१.०२ /
६१.३७ %
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१५५०९
• +२३७३
• MH - ११

म्हसवड हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक शहर आहे.
दहिवडी शहर माण तालुक्यातील मुख्य ठिकाण शहर आहे.दहिवडी म्हणजेच माण.दहिवडी प्रमाणेच म्हसवड शहर ही प्राचीन शहर आहे.म्हसवड हे मध्ये महाराष्ट्र भर प्रसिद्ध असणारे सिद्धनाथ मंदिर आहे या मंदिराची तर एका वर्षाला माणगंगा नदी काठी मोठी यात्रा असते या यात्रेला खूप मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात सिद्धनाथ यात्रेचे आकर्षण म्हणजे सिद्धनाथ रथ असतो या यात्रेचे सर्व नियोजन म्हसवड नगरपरिषद करत असते म्हसवडचे प्रशासन नगरपरिषद पाहते.

इतिहास

[संपादन]

मराठा साम्राज्याचे एक शिलेदार राजेमाने यांचा या भागावर अंमल होता.या मराठा घराण्याचे रतोजीराव माने विजापूरच्य आदिलशाही दरबारातील एक बडे शूरवीर सरदार होते. त्यांचे पुत्र नागोजीराव माने हे सुद्धा तितकेच पराक्रमी शूरवीर होते. छत्रपती राजाराम राजेंना जिंजीच्या वेढ्यतुन सुटका करण्यास नागोजीराव यांनी मदत केली होती.नागोजीराव माने यांचा पराक्रम पाहून दहिगाव येथील भाळवणी या संस्थानच्या नाईक निंबाळकर यांच्या घराण्यातील कन्या राधाबाई यांचा विवाह नागोजीराव सोबत झाला. दक्षिणेतील राष्ट्रकूट, वाकाटक, अभीर, शेंद्रक, होयसळ, चोळ, पांड्यै, क्षत्रप, पल्लव या पराक्रमी राजवंशातील आजचे मराठ्यांतील वंशज कुठल्या अपभ्रंशीत आडनानावाने वावरत असतील? हा खरोखरच संशोधनाचा विषय आहे.

इतिहास अभ्यासताना मराठ्यांच्या शहाण्णव कुळातील माने हे राष्ट्रकूट राजवंशातील वंशज कूळ असावे असे वाटते. इ. सनाच्या ४ थ्या शतकाच्या मध्यात सांगली, सातारा, कोल्हापूर, बेळगाव आदी भागात मानपुरच्या राष्ट्रकूट राजवंशाचे शासन होते. मानाङ्क हा राष्ट्रकूट राजवंशाचा संस्थापक राजा आहे. त्याची राजधानी मानपूर ही त्याच्या नावाशी साधर्म्य सांगणारी अशीच आहे. तेव्हाचे मानपूर म्हणजे सध्याच्या सातारा जिल्ह्यातील माण हे तालुक्याचे दहिवडी हे मुख्य शहर आहे.म्हसवड एक ऐतिहासिक शहर आहे.

गुप्त साम्राज्यातील सम्राट दुसरा चंद्रगुप्त विक्रमादित्य याच्याशी या राजवंशाचे मित्रत्वाचे संबंध असून नंतरच्या काळात त्यांनी वाकाटकांचे स्वामित्व स्विकारले होते. चाळुक्य नरेश पुलकेशी दुसरा याच्याकडून पराभव होईपर्यंत माण देशावर राष्ट्रकुटांचे शासन होते. तेथून पुढच्या काळात आठव्या शतकाच्या मध्यापर्यंत हा भाग बादामी चाळुक्य यांच्या अधिपत्याखाली होता. आठव्या शतकाच्या मध्यापासून इ. स. ९७३ पर्यंत राष्ट्रकुट हे दक्षिण भारतातील सार्वभौम चक्रवर्ती सम्राट होते. तिथून पुढचा ११८९ पर्यंतचा काळ पुन्हा सार्वभौम चक्रवर्ती सम्राट राजे चाळुक्य राजवंशाचा होता.

राष्ट्रकूट राजवंशाचा संस्थापक मानाङ्क, माण, माणपूर, माणदेश, माण नदी आदी नावे एकाच धाटणीचे वाटतात. शिवाय माने लोकांत मिसळले तर हे लोक "माण नदीच्या काठावर राहणारे माणी (अभिमानी) लोक म्हणून माने हे आडनाव" असे माने आडनाव निर्मितीचे कारण अभिमानाने सांगताना दिसतात. राष्ट्रकुटांनी जिथे मंदिरादी वास्तू उभारलेल्या दिसतात, तिथे त्यांनी दातात आणि पायाखाली प्रत्येकी दोन नाग दाबलेला आक्रमक गरूड कोरलेला दिसतो. शिवाय माने कुळाचे देवक देखील गरूड अर्थात गरूड पंख किंवा गरूड वेल असे आहे. अजून प्रकर्षाने जाणवणारी दुसरी बाब म्हणजे माने कुळातील बहुसंख्य लोक आजही गरूड अशा आडनाव धारणेने वावरताना दिसतात. यावरून मराठ्यांच्या शहाण्णव कुळातील माने/गरूड हे कूळ राष्ट्रकुट राजवंशाचे वंशजकूळ असावे असे वाटते.

वैशिष्ट्य

[संपादन]

श्री सिद्धनाथ देवाची यात्रा हा येथील प्रसिद्ध उत्सव आहे. या उत्सवात भाविक सिद्धनाथाचा रथ ओढत गावाभोवती फिरवतात.लाखो भाविकांचे श्रद्धास्थान : श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या, विविध राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत व म्हसवडचे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी आहेत. म्हसवडचा सिद्धनाथ हे महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी राज्यातील लाखोभाविकांचे कुलदैवत म्हणून वंशपरंपरेने चालत आलेले आहे. अत्यंत जागृत देवस्थान म्हणून श्री सिद्धनाथाची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. माण तालुक्यातील माणगंगेच्या तीरावर म्हसवड येथे श्री सिद्धनाथांचे इ. स. 10 व्या शतकातील हेमाडपंथी भव्य दगडी मंदिर आहे. मंदिरातील भुयारात काशी-विश्वेश्वराची स्वयंभू शिवपिंड शिवाचे रक्षक म्हणून श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी हे स्थान मानले जाते. श्री सिद्धनाथ यांना भैरवनाथ, सिद्धेश्वर, सिद्वोबा, काळभैरव, महाकाळ, ् आदी नावानेही संबोधले जाते. काळभैरवांची मूळ कथा श्रीधरस्वामींच्या काशीखंड या ग्रंथामध्ये काळभैरवाची उत्पत्ती कशी झाली, त्या संबंधीचा उल्लेख पुढील प्रमाणे आढळतो. ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण असा वाद एकदा त्रैलोक्यात निर्माण झाला. त्यावेळी गायत्री म्हणाली, शिवस्वरूप ब्रह्म अगम्य आहे. शिवाच्या अधिन सर्व काही असते. त्यामुळे सर्वश्रेष्ठ एक शिवच आहे. हे ऐकून ब्रह्मा व विष्णू यांना राग आला व त्यांनी गायत्री आणि शिवाचा निषेध केला. हा निषेध ऐकून शिवांना क्रोध अनावर झाला व त्यांनी आपला उजवा हात क्रोधाने झटकला. त्यावेळी शिवाच्या उजव्या भूजदंडापासून महाकाळ म्हणजेच कालभैरवांची उत्पत्ती झाली. त्यावेळी शिव श्रेष्ठत्वाची सर्वांना प्रचिती आली. लिंगरूपाने शिव भुयारात स्थित झाले व रक्षणकर्ते व शिव अवतार स्वरूप म्हणून काळभैरव व जोगेश्वरी गाभाऱ्यातील सिंहासनावर आरूढ झाले, अशी आख्यायिका आहे. भुयारातील शिवलिंग वर्षातून एकवेळ म्हणजे फक्त महाशिवरात्रीच्या रात्री भाविकांच्या दर्शनासाठी रात्रभर खुले असते. तेवढी रात्र संपल्यावर भुयार बंद केले जाते, ते वर्षभर बंद असते. या बंद भुयाराच्या प्रवेशद्वाराजवळ एक छोटासा पलंग ठेवलेला असून त्यावरील गाद्यांवर श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी यांच्या पंचधातूच्या उत्सव मूर्ती कायमपणे वर्षभर ठेवलेल्या असतात. सिंहासनावरील मूर्तिस्थान व शिलालेख भुयारातील स्वयंभू शिवपिंडीच्या बरोबर माथ्यावर असणाऱ्या गाभाऱ्यातील सिंहासनावर श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी देवी यांच्या गंडकी शिळेवर कोरलेल्या अप्रतिम, कोरीव काम केलेल्या, रेखीव मूर्ती उभ्या आहेत. बाहेरील भागात अनेक देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. बाहेर उजव्या बाजूस एक मोठे व वेगळे शिवलिंग आहे. त्याच्या शेजारी असलेल्या नंदी जवळील भिंतीवर कन्नड भाषेत कोरलेला एक शिलालेख आहे. लेख शिळेची वरच्या भागाची रुंदी 49 सें. मी, खालील भागाची रुंदी 65 सें. मी. आणि लांबी 110 सें. मी. आहे. एवढ्या भागात एकूण 43 ओळी आहेत. त्याच्यावरील लिपी ही मध्ययुगीन कन्नड आहे. प्रारंभीचा मंगल श्लोक आणि शेवटचा शाप-आशीर्वादात्मक श्लोक हे संस्कृतमध्ये आहेत. उर्वरित सर्व मजकूर कन्नड भाषेत आहे. घटस्थापना, नवरात्रारंभ व हळदी समारंभ श्री सिद्धनाथ मंदिरात परंपरेनुसार कार्तिक शुद्ध-1 (दिवाळी पाडवा) या दिवशी पहाटे गाभाऱ्याजवळ असणाऱ्या म्हातारदेवापुढे मंदिराचे मुख्य पुजारी, सालकरी यांच्या हस्ते मानकरी व सेवेकरी यांच्या उपस्थितीत घटस्थापना केली जाते. म्हसवड गावात व इतरत्र श्री नाथांना कुलस्वामी मानणारे भक्त आपापल्या घरी घटस्थापना करतात. हे घट 12 दिवसांचे असतात. सर्व पुजारी व भाविक या काळात उपवास करून श्रींची भक्ती करतात. याला नवरात्र म्हणतात. देवीचे नवरात्र 9 दिवसांचे असते. मात्र श्री सिद्धनाथांचे हे नवरात्र 12 दिवसांचे असते. या घटस्थापनेपासून नवरात्रारंभ होतो. याच दिवशी दुपारी 12 वाजता श्रींचा हळदी समारंभ होतो. श्री सिद्धनाथ-माता जोगेश्वरी यांच्या पंचधातूच्या उत्सवमूर्तींना हळदी लावण्याच्या कार्यक्रमात येथील गुरव समाज, गावातील तसेच परगावच्या हजारो महिला सहभागी होतात. ढोल, सनई-चौघडा, बँड यांच्या मंगल गजरात हा हळदी समारंभ होतो. घट बसलेल्या या दिवसापासून बारा दिवस उपवास करून येथील गुरव समाजातील तसेच शहरातील महिला, पुरुष, मुले, मुली आदी अबालवृद्ध पहाटे चारपासून कार्तिक स्नान करून माणगंगेच्या पात्रातून संपूर्ण नगर प्रदक्षिणा घालतात. मंदिरात काही पुजारी व भक्तगण 12 दिवस अहोरात्र उभे राहून श्रींची उपासना करतात. याला उभे नवरात्र म्हणतात. ही परंपरा अव्याहत, अखंडपणे सुरू आहे. श्रींचा विवाह सोहळा कार्तिक शुद्ध 12 (बारस-तुलसी विवाह) रोजी रात्री साडेअकरा वाजता मंदिराच्या बाहेरील हत्ती मंडपातील सुशोभित केलेल्या हत्तीवरील अंबारीत बसविण्यात आलेली श्रींची मूर्ती विवाहासाठी मंदिराचे मुख्य पुजारी (सालकरी) मंदिराच्या गाभाऱ्यात नेतात. गाभाऱ्यात जोगेश्वरी देवीच्या मूर्तीसमोर अंतरपाट धरून मंगलाष्टकांसह पारंपरिक, धार्मिक, विधिपूर्वक, शास्त्रोक्त पद्धतीने रात्री 12 वाजता मोठ्या थाटाने श्री सिद्धनाथ-देवी जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा होतो. बाहेरील हत्ती मंडपातून श्री सिद्धनाथाची मूर्ती गाभाऱ्यात नेत असताना हजारो भाविक भक्तिभावाने मूर्तीस स्पर्श करण्यासाठी धडपडत असतात. कारण श्रींच्या मूर्तीस यावेळी स्पर्श झाल्यावर संपूर्ण वर्ष सुख-समृद्धी व भरभराटीचे जाते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे रस्सीखेच होऊन श्रींची मूर्ती गाभाऱ्यात नेली जाते व नंतर पुरोहितांमार्फत धार्मिक निधीनुसार श्रींचा विवाह सोहळा होतो. श्रींच्या पूजेची अखंड परंपरा या सिद्धनाथ मंदिरातील मुख्य पुजारी-सालकरी असतात. ते वर्षभर संन्यस्त राहून सकाळ-सायंकाळ शूचिर्भूत होऊन श्रींची पंचामृत व गरम उदकाने स्नान, दररोज विविध अवतारातील पूजा, पहाटे 5 वाजता काकड आरती, सकाळी साडेआठ वाजता मुख्य आरती, दुपारी 3 वाजता धुपारती, रात्री साडेआठ वाजता मुख्य आरती व रात्री 10 वाजता शेजारती अशी दिवसातून पाच वेळा श्रींची आरती अखंडपणे सुरू असते. सालकरी यांना भाविक पूज्य मानतात.

मानवी समाजामध्ये ज्या पद्धतीने हळदी समारंभ, विवाह व नंतर वरात आदी कार्यक्रमांनी विवाह सोहळा होतो, त्याच पारंपरिक पद्धतीनुसार येथील श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी या देवांचा हळदी समारंभ, विवाह व वरात हे कार्यक्रम सालाबादप्रमाणे होतात. दिवाळी पाडव्यादिवशी घटस्थापना, नवरात्रारंभ व हळदी समारंभ पार पडला. त्यानंतर कार्तिक शुद्ध-12 तुलसी विवाहादिवशी श्रींचा विवाह सोहळा रात्री 12 वाजता असतो।. दणकट, मजबूत आणि भव्य अशा लाकडी, चंदनाच्या रथामध्ये श्रींच्या उत्सवमूर्ती दुपारी 12 वाजता बसविल्या जातात. रथाला मोठे दोर बांधून माणसांच्या सहाय्याने हा रथ ओढला जातो. श्रींच्या पंचधातूच्या उत्सव मूर्ती घेऊन रथामध्ये ठेवण्याचा मान गुरव समाजाला आहे. या बरोबरच रथाची देखभाल करण्याचा व रथावर बसण्याचा मान राजेमाने घराण्याला आहे. हा रथ ओढण्याचा मान माळी समाजाला, त्याबरोबरच बारा बलुतेदारांनाही रथ ओढण्याचा मान आहे. माणगंगेच्या पात्रातून शहराला उजवी प्रदक्षिणा घालून दुपारी 12 वाजता सुरू झालेली ही श्रींची रथातील "वरात' रात्री 12च्या पुढे मूळ ठिकाणी येते. दरम्यानच्या काळात रथावर गुलाल-खोबऱ्याची उधळण भव्य प्रमाणात होत असल्याने या दिवशी संपूर्ण म्हसवड नगरी गुलालाच्या रंगामध्ये न्हाऊन निघते. श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यांचा हळदी विवाह व वरात म्हणजे रथयात्रा हे कार्यक्रम पूर्वांपार, पारंपरिक पद्धतीने चालत आलेले आहे व अव्याहत सुरू आहे. सिद्धनाथ मंदिरातील गाभाऱ्यामध्ये सागवानी लाकडापासून बनविलेले अत्यंत कलाकुसर केलेले महिरप नाथाचे मानकरी कराडचे मानकरी शिदोजीराव डुबल यांनी बसविलेले आहे. यामुळे मंदिराच्या सिंहासनाची शोभा वाढली आहे. यासाठी मोहनराव डुबल, दिग्विजय डुबल, हरिनाथ डुबल, अजित डुबल या परिवारांनी सहकार्य केले आहे. तसेच यावर्षी मंदिराच्या शिखरास रंग देण्याचे कामही डुबल परिवाराकडून पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे मंदिराची शोभा वाढली आहे. विशेष बाब म्हणजे मंदिर स्थापनेपासून प्रथमच श्रींच्या मूर्तींना वज्रलेप करण्याचे अत्यंत किचकट व खर्चिक काम देवस्थान ट्रस्टीकडून करण्यात आले असले तरी त्यातील वज्रलेपासाठी साडेचार लाख रुपये खर्च करून यातील सिंहाचा वाटा नगरपरिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक व गटनेते विजय सिन्हा यांनी उचलला आहे. अर्थात वज्रलेपामुळे श्रींच्या मूर्तींना नवचैतन्य आले आहे. श्रींच्या मूर्ती अत्यंत आकर्षक व देखण्या दिसत आहेत. श्रींच्या दर्शनाने तमाम भाविकांच्या समाधानामध्ये शतपटींनी वाढ होणार आहे.

स्थानिक

[संपादन]

श्री.सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिर,राजेमाने घराण्याचा राजवाडा, श्री. सिद्धनाथ हायस्कूल,श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने कॉंलेज, जैन मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजार पटांगण, मंडई, एस.टी. स्थानक,माणगंगा नदी ढोर कारखाना इत्यादी येथील जी ओळखीची ठिकाणे आहेत, ती पत्त्यासाठी संदर्भ म्हणून वापरली जाऊ शकतात.

तथ्ये

[संपादन]
  1. मराठी ही येथील मूळ भाषा आहे.
  2. बुधवार हा म्हसवडचा बाजाराचा दिवस आहे.
  3. सोलापूर्सातारा जिल्ह्यांच्या सीमेजवळच्या गावांपैकी हे एक शहर आहे.
  4. श्री. सिद्धनाथ व जोगेश्वरी हे येथील बऱ्याच कुटुंबांचे कुलदैवत आहे.तसेच या कुलदैवताच्य यात्रेवेळी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात.आंध्रप्रदेश,कर्नटक व महाराष्ट्रतून अनेक भाविक आपल्या कुलदैवताचे दर्शन घेण्यासाठी येतात.

संदर्भ

[संपादन]