Jump to content

फोंडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?फोंडा

गोवा • भारत
—  शहर  —
Map

१५° २४′ ००″ N, ७४° ०१′ १२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
५.२ चौ. किमी
• ३५.८२० मी
जवळचे शहर बेळगाव
जिल्हा उत्तर गोवा
तालुका/के फोंडा
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
२२,६६४ (2011)
• ४,३५८/किमी
९३२ /
भाषा कोंकणी, मराठी

फोंडा (Ponda) हे गोव्याच्या उत्तर गोवा जिल्ह्यातील फोंडा तालुक्याचे मुख्यालय आहे.

भौगोलिक स्थान व लोकसंख्या

[संपादन]

फोंडा (Ponda) हे गोव्याच्या उत्तर गोवा जिल्ह्यातील फोंडा तालुक्यातील ५.२ चौ. किमी. क्षेत्राचे शहर असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या शहरात ५८१८ कुटुंबे असून शहराची एकूण लोकसंख्या २२६६४ आहे. शहरात ११७२९ पुरुष आणि १०९३५ स्त्रिया आहेत. ह्या शहराचा जनगणना स्थल निर्देशांक ८०३२४७ [] आहे. हे शहर गोव्याच्या मध्यवर्ती भागात वसलेले आहे. फोंडा पणजीच्या आग्नेयेला २९ किलोमीटरवर तर मडगावाच्या वायव्येला १८ कि.मी. अंतरावर आहे. फोंडा शहर हे गोव्याचे औद्योगिक केंद्र व गोव्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. हे गोव्यातील वेगाने वाढणारे शहर आहे. गोव्यातील प्रमुख अभियांत्रिकी महाविद्यालय गोवा इंजिनियरिंग कॉलेज फोंड्याजवळच फर्मागुडी येथे आहे. पूर्वाश्रमी फोंडा हा प्रदेश "अंत्रुज महाल" म्हणून प्रसिद्ध होता.

लोकसंख्येनुसार शहराचा दर्जा III (लोकसंख्या_एकूण २०,००० ते ४९,९९९). शहराची नागरी स्थिती आहे 'नगरपालिका'.

१ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले सगळ्यात जवळचे बेळगाव हे शहर १३२ किमी अंतरावर आहे. ५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले सगळ्यात जवळचे पुणे हे शहर ५०८ किमी अंतरावर आहे. जवळचे रेल्वे स्थानक १६ किमी अंतरावर मडगाव येथे आहे.

हवामान

[संपादन]
  • पाऊस (मिमी.): ३६३०.४२
  • कमाल तापमान (सेल्सियस): ३१.५३
  • किमान तापमान (सेल्सियस): २३.५१

इतिहास

[संपादन]

फोंडा पोर्तुगीजांच्या ताब्यात त्यामानाने उशीरा आलेले गाव आहे. ह्या भागावरचे सौंदे राजे विजयनगरच्या किंवा विजापुराच्या आधिपत्याखाली होते. १६व्या शतकापर्यंत फोंडा पोर्तुगीजांच्या ताब्यात नव्हते. त्यामुळे जाचाला कंटाळून स्थलांतर करणाऱ्या हिंदूंना हा भाग सुरक्षित वाटायचा. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा भाग काबीज केला. इ.स. १७६४ सालापर्यंत हा भाग मराठ्यांच्या ताब्यात राहिला. येथील दाट झाडीमुळे येथे हिंदू देवतांचे स्थलांतर सोपे झाले. पोर्तुगीजांनी हा भाग सौंदेकरांकडून इ.स. १७९१ मध्ये घेतला. अजूनही येथे हिंदूंचे प्राबल्य दिसून येते.

साक्षरता

[संपादन]

इ.स. २००१ सालातील भारतीय जनगणनेनुसार फोंड्याची साक्षरता ८२% आहे. ही राष्ट्रीय साक्षरतेपेक्षा (५९.९%पेक्षा) खूप जास्त आहे. कोंकणीमराठी येथे जास्त प्रमाणात बोलली जाते.

स्वच्छता आणि पिण्याचे पाणी

[संपादन]

शहरामध्ये उघडी गटारव्यवस्था आहे.

छोट्या धरणातून पाणीपुरवठा होतो. शहराला शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा होतो. पाणी पुरवठ्याची क्षमता ३१५० किलो लिटर आहे.

शहरात अग्निशमन सुविधा आहे.

शिक्षण

[संपादन]

येथे खालील शिक्षणसंस्था आहेत :-

  • इंदिराबाई व्ही. भट ढवळीकर माध्यमिक विद्यालय, ढवळी
  • एस.एस. समितीचे उच्च माध्यमिक विद्यालय (विज्ञान शाखा), कवळे
  • ए.जे.डी. आल्मेडा माध्यमिक विद्यालय, फोंडा
  • कामाक्षी उच्च माध्यमिक विद्यालय, कुर्टी
  • जी. व्ही. ‍एम्.चे उच्च माध्यमिक विद्यालय, फोंडा
  • दादा वैद्य माध्यमिक विद्यालय, कुर्टी
  • पी.ई.एस.आर.एस.एन. उच्च माध्यमिक विद्यालय, फर्मागुडी
  • सरकारी अभियांत्रिक महाविद्यालय, फर्मागुडी
  • डॉ. दादा वैद्य शिक्षण प्रशिक्षण महाविद्यालय, फर्मागुडी

आरोग्य सुविधा

[संपादन]

शहरात १ ॲलोपॅथी रुग्णालय आहे. सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय १२ किमी वर आहे. शहरात १ दवाखाना आहे. शहरात १ कुटुंबकल्याण केंद्र आहे. शहरात १ प्रसूति व बालकल्याण केंद्र आहे. शहरात १ प्रसूति केंद्र आहे. शहरात १ क्षयरोग उपचार केंद्र आहे. सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय ३ किमी वर आहे. सर्वात जवळील इतर वैद्यकीय सुविधा ४२ किमी वर आहे. शहरात १४ खाजगी बाह्यरुग्ण वैद्यकीय सुविधा आहेत. शहरात १४ खाजगी निवासी व बाह्यरुग्ण वैद्यकीय सुविधा आहेत. शहरात ४१ औषधाची दुकाने आहेत.

सुविधा

[संपादन]

सर्वात जवळील खाजगी अनाथाश्रम केला (२ किमी) येथे आहे. सर्वात जवळील नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे सरकारी निवास (होस्टेल) पेन्हा-दि फ्रॅन्का (३५ किमी) येथे आहे. सर्वात जवळील खाजगी वृद्धाश्रम बांदोडा (८ किमी) येथे आहे. सर्वात जवळील शासकीय क्रीडांगण मडगाव (१६ किमी) येथे आहे. सर्वात जवळील खाजगी चित्रपटगृह उसगाव (१० किमी) येथे आहे. शहरात १ शासकीय सभागृह आहे. शहरात २ शासकीय सार्वजनिक ग्रंथालय आहेत. नागरी सुविधा : देंनदिन जीवन सुरळीतपणे चालण्यासाठी सर्व लोकांना ज्या सोई ऊपलब्ध करून दिलया जातात,ज्या सोईना नागरी सुविधा म्हणतात. उदाहरणार्थ,पीण्यासाठी व स्वच्छतेसाठी पाणी,प्रवासाठी रेल्वे किवा बसगाड्यां,रस्ते,पुल ,खेळण्यासाठी मैदाने ,व्यायामशाळा इ.काही आपत्ती आल्यास तिच्यापासुन आपला बचाव व्हावा म्हणूनही काही सोई असने आवश्यक असते. आग लागलयास ती विजवन्यासाठी अग्नीशमन यंत्रणा असावी लागते.

वाहतुकीची साधने

[संपादन]

येथे पणजी, मडगाव व इतर शहरांसाठी कदंब महामंडळाची नियमित बससेवा आहे. कर्नाटक स्टेट ट्रन्स्पोर्ट सर्व्हिसच्या बसेस हुबळी, धारवाडबेळगावसाठी धावतात..

औद्योगिक वसाहती

[संपादन]

कुंडई, बेतोडा व तिस्क येथे औद्योगिक वसाहती आहेत.

बाजार व पतव्यवस्था

[संपादन]

शहरात १४ राष्ट्रीय बँका आहेत. शहरात ८ खाजगी व्यापारी बँका आहेत. शहरात ८ सहकारी बँका आहेत. शहरात २ शेतकी कर्ज संस्था आहेत. शहरात १७ बिगर शेतकी कर्ज संस्था आहेत.

पर्यटन

[संपादन]

अभयारण्ये

[संपादन]
  • बोंडला अभयारण्य
  • महावीर अभयारण्य
श्री देवकी कृष्ण मंदिर, मारसेल
Sri Ramnath Temple at Kavlem 4-7-2008 9-13-06 AM
Safa Masjid (ASI monument number N-GA-12)
Image of Shri Nagesh Temple

मंदिरे

[संपादन]
  • श्री कामाक्षी देवस्थान, शिरोडा
  • श्री गोपाळ गणपती, फर्मागुडी
  • श्री संस्थान गौडपादाचार्य, कवळे
  • श्री नवदुर्गा संस्थान, कुंडई
  • श्री नवदुर्गा संस्थान, मडकई
  • श्री नवदुर्गा संस्थान, बोरी
  • श्री नागेश महारुद्र संस्थान, नागेशी
  • श्री मंगेश महारुद्र संस्थान, मंगेशी, प्रियोळ
  • श्री महालक्ष्मी देवस्थान, बांदोडा
  • मारुती देवस्थान, कुर्टी
  • मारुती देवस्थान, फोंडा
  • श्री रामनाथी देवस्थान, रामनाथी
  • श्री विजयादुर्गा देवस्थान, केरी
  • शंकर पार्वती मंदिर, खडपाबांध
  • श्री शांतादुर्गा देवस्थान, कवळे
  • श्री सातेरी महालसा नारायणी संस्थान, म्हार्दोळ
  • श्री देवकी कृष्ण रवळनाथ संस्थान, मार्शेल

मशिद

[संपादन]

साफा मशिद

[संपादन]

नागा मशिद

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]