गीत
Appearance
शब्दरचनेला सुरावट किंवा स्वररचना प्राप्त करून दिली तर ती शब्दरचना गीत बनते. शब्दरचना ही शब्दांच्या उच्चारांच्या ज्या समाजमान्य पद्धती आहेत तिच्यातून जन्माला येत असते. ती करताना प्रत्येक ओळीत विशिष्ट अनुक्रमाने येणारा शब्दसमूह हा एक कालिक रचना घडवितो. अनेकदा विशिष्ट अंतराने तोच तो उच्चार येतो आणि आपणास लयपूर्ण बांधणी प्रतीत होते. कवितेच्या या अंगभूत लयीवर सुरांची एक रचना बसविली गेली की ती कविता गीत बनते. संगीतातील स्वररचनेमध्ये कवितेतील शब्द बसविले की गीत तयार होते.
अनेक गीतांच्या चाली या भारतीय शास्त्रीय संगीताच्या रागांवर आधारलेल्या असतात. अशा गीतांचा परिचय करून देणारी काही पुस्तके मराठीत आहेत. त्यांपैकी काही ही :-
- नादवेध (अच्युत गोडबोले व सुलभा पिशवीकर)
- स्वर सुधा (श्रीपाद जोशी)
गीतप्रकार
[संपादन]- धृपद
- धमार
- ख्याल
- तराणा
- ठुमरी
- टप्पा
- चीज
- गझल
- कव्वाली
- अभंग
- लावणी
- पोवाडे
- होरी
- त्रिवट
- कजरी
- चैती
- दादरा
- भजन
- कीर्तन
- अष्टपदी
- भावगीत
- भक्तीगीत
- चित्रपटगीत
- लोकगीत
- चतरंग
- लक्षणगीत
- सरगम
- रवींद्र संगीत
- इंडियन पॉप
- इंडियन रॉक
- देशभक्तीपर गीत
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |