लक्षणगीत
Appearance
लक्षणगीत हे काव्याच्या रचनेमध्येच रागाची (किंवा चालीची)थोडीफार माहिती सांगितलेली काव्यरचना होय.
नावाप्रमाणे गीताच्या लक्षणांचे वर्णनही केले जाते. त्याचप्रमाण रागाला लागणारे स्वर, वयं स्वर, वर्जावर्जादी नियम, वादी, संवादी, राग समय, रागाची जाती, रागाचे चलन इत्यादींची माहिती देणारे आणि त्याच रागामध्ये जे गीत गायले जाते त्या गीतालाच लक्षणगीत’ असे ओळखले जाते. लक्षणगीतामधील रचना शब्द, स्वर, ताल, लय यांनी गुंफलेली असते. अस्ताई आणि अंतरा असे दोन भाग लक्षणगीतामध्ये असतात. लक्षणगीते ही सर्व रागांमध्ये आणि सर्व तालांमध्ये गायली जातात. या प्रकारच्या रचनेमुळे रागाची (गायल्या जाणारया) थोडक्यात ओळख होते आणि रागाचे स्वरूप कळते.