कुणाल कपूर (जन्म २६ जून १९५९) [१] हा भारतीय चित्रपट अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि जाहिरात निर्माता आहे. अभिनेता शशी कपूर आणि जेनिफर केंडल यांचा हा मोठा मुलगा आहे. त्याने १९७२ मधील सिद्धार्थ या इंग्रजी भाषेतील चित्रपटाद्वारे पदार्पण केले. नंतर श्याम बेनेगलच्याजुनूनमध्ये आणि तसेच मुख्य प्रवाहातील बॉलीवूड चित्रपट विजेता व आहिस्ता आहिस्तामध्ये काम केले. उत्सव (१९८४) आणि त्रिकाल (१९८५) या कला चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले.[२] १९८७ मध्ये स्वतःची कंपनी ॲडफिल्म-वालस स्थापन केल्यानंतर, दूरचित्रवाणी जाहिरातींची निर्मिती आणि दिग्दर्शन करण्यासाठी त्यांनी अभिनय थांबवला.
कुणालचे लग्न चित्रपट निर्माते रमेश सिप्पी यांची मुलगी शीनाशी झाले होते, जी एक छायाचित्रकार आहे. त्यांना दोन मुले आहेत, जहान पृथ्वीराज कपूर नावाचा मुलगा आणि शायरा कपूर नावाची मुलगी. कुणाल आणि शीना यांचा आता घटस्फोट झाला आहे.[३]