Jump to content

अंबाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अंबाडी
अंबाडीची पाने
अंबाडीची पाने
शास्त्रीय वर्गीकरण
अंबाडीच्या फळाचे वरचे आवरण
अंबाडीच्या फळाचा आतील भाग-वरचे फुलासारखे आवरण काढल्यावर
अंबाडी फळ कोलकात्याच्या बाजारात विक्रीसाठी, पश्चिम बंगाल, भारत
अंबाडीच्या बिया

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. अंबाडीच्या पानांची भाजी करतात. अंबाडीचे खोड मुळाशी धरून झोडपतात आणि वाळल्यावर त्यांपासून वाख करून त्यांचे दोरखंड वळतात.

अंबाडीला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते -

  • संस्कृत-अन्वष्टा
  • हिंदी-अम्बारी,मोईआ
  • बंगाली-माचिका
  • कानडी-पुंडी, पुंडियानारू
  • गुजराती-अंबाडी
  • मल्याळम-
  • तामीळ-
  • तेलगू- गोंगुरा
  • इंग्रजी- *लॅटिन-हिबिस्कस सबडेरिफ्फा (Hibiscus sabdariffa)

वर्णन

[संपादन]

याचे सर्वात जास्त उत्पादन चीनमध्ये होते.[ संदर्भ हवा ] ही सुमारे १.५ ते २ मीटर उंच वाढणारी वनस्पती आहे. हे झाड सरळ वाढते. ह्याची पाने चवीने आंबट असतात. कोवळी असतांना ह्याच्या पाल्याची भाजी करतात.याच्या बियांपासून तेल काढतात.त्यास 'हॅश ऑईल' असे म्हणतात.यात टेट्राहायड्रोकॅनॉनिबॉल(टीएचसी) या रसायनाचे प्रमाण जास्त असते.त्यात ओमेगा ३ व ओमेगा ६ ही मेदाम्ले भरपूर प्रमाणात असतात.मानवी शरीरासाठी आवश्यक ते गुणोत्तर नेमके यात असते.[ संदर्भ हवा ]

उत्पत्तिस्थान

[संपादन]

भारतात विदर्भ, खानदेशपंजाबचा काही भाग.

उपयोग

[संपादन]

सर्वसाधारण - भाजी, दोऱ्या, सतरंज्या,कागद करण्यास उपयुक्त

आयुर्वेदानुसार - पित्त, जळवात, अजीर्ण इत्यादी

नवरात्र उपवासात ही भाजी खाल्ली जाते हिला संस्कृत मध्ये कात्यायनी असेें ही ओलखतात

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]

वनौषधी गुणादर्श - आयुर्वेद महोपाध्याय-दाजी शंकर पदेशास्त्री