अंबाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अंबाडी
अंबाडीची पाने
अंबाडीची पाने
शास्त्रीय वर्गीकरण
अंबाडीच्या फळाचे वरचे आवरण
अंबाडीच्या फळाचा आतील भाग-वरचे फुलासारखे आवरण काढल्यावर
अंबाडीच्या बिया

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. अंबाडीच्या पानांची भाजी करतात. अंबाडीचे खोड मुळाशी धरून झोडपतात आणि वाळल्यावर त्यांपासून वाख करून त्यांचे दोरखंड वळतात.

अंबाडीला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते -

  • संस्कृत-अन्वष्टा
  • हिंदी-अम्बारी,मोईआ
  • बंगाली-माचिका
  • कानडी-पुंडी, पुंडियानारू
  • गुजराती-अंबाडी
  • मल्याळम-
  • तामीळ-
  • तेलगू- गोंगुरा
  • इंग्रजी- *लॅटिन-हिबिस्कस सबडेरिफ्फा (Hibiscus sabdariffa)

वर्णन[संपादन]

याचे सर्वात जास्त उत्पादन चीनमध्ये होते.[ संदर्भ हवा ] ही सुमारे १.५ ते २ मीटर उंच वाढणारी वनस्पती आहे. हे झाड सरळ वाढते. ह्याची पाने चवीने आंबट असतात. कोवळी असतांना ह्याच्या पाल्याची भाजी करतात.याच्या बियांपासून तेल काढतात.त्यास 'हॅश ऑईल' असे म्हणतात.यात टेट्राहायड्रोकॅनॉनिबॉल(टीएचसी) या रसायनाचे प्रमाण जास्त असते.त्यात ओमेगा ३ व ओमेगा ६ ही मेदाम्ले भरपूर प्रमाणात असतात.मानवी शरीरासाठी आवश्यक ते गुणोत्तर नेमके यात असते.[ संदर्भ हवा ]

उत्पत्तिस्थान[संपादन]

भारतात विदर्भ, खानदेशपंजाबचा काही भाग.

उपयोग[संपादन]

सर्वसाधारण - दोऱ्या,सतरंज्या,कागद करण्यास उपयुक्त

आयुर्वेदानुसार - पित्त, जळवात, अजीर्ण इत्यादी


*बोलणार्याच्या अंबाड्या विकतात, न बोलणार्याचे गहू विकत नाहीत.*

#अंबाडी:- एक औषधी रानभाजी

✍🏻✍🏻✍🏻संपादक वास्तुशास्त्रज्ञ श्री राधेश बादले पाटील पंढरपूर

अंबाडी हि चीन व भारतात सर्वत्र उगवणारी, आढळणारी रानभाजी अर्थात औषधी वनस्पती आहे. *अंबाडीच्या पानांची भाजी करतात,तर सांगाडा झोडपून वाख तयार करून दोरखंड, सतरंजी, कागद, इ. तयार करतात.*

*अंबाडी बीयांपासून तेल काढतात. त्यास Hash Oil म्हणतात.या तेलात Tetrahydrocanonibol(THC), Omega-3, Omega-6 हि मेदाम्ले प्रचंड प्रमाणात आहेत.*

*अंबाडी रानभाजी सेवनाचे औषधी गुणधर्म:-*

*पित्त बाहेर काढण्यासाठी, 84 वातांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी, उदरविकारांसाठी उपयुक्त आहे.*

टिप:- पित्त, रक्तदाब, इ. विकारांस्तव अंबाडी सेवन तज्ञ वैद्यांना विचारूनच करावे. त्रास होतो.

    अंबाडीला संस्कृत भाषेत अन्वष्टा  तर हिंदी भाषेत अंबारी/ मोईआ म्हणतात.

   अंबाडीची भाजी व जनावरांसाठी पेंड, दोरखंड करतात. अंबाडी पाने व ज्वारीचे पीठ मिसळून भाकरीसुध्दा करतात.

*अंबाडी रानभाजीची पाककृती:-*

  १ पेंडी अंबाडीची भाजी

मुठभर तांदुळ (मिळत असेल तर ज्वारी वापरावी)

३-४ लसुण पाकळ्या (ठेचुन किंवा चिरुन)

चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट

लहान खडा गुळ

२ टेबल्स्पून तेल

१/२ टीस्पून हळद, जिरे.

१/२ कप पाणी

कृती - अंबाडीच्या भाजीची फक्त पाने घ्यावी दांडे अजिबात घेउ नयेत. तांदुळ किंवा ज्वारी मिक्सरवर भरडुन रवा करावा. निवडलेली भाजी धुवुन चिरुन घ्यावी त्यात तांदळाचा/ज्वारीचा रवा घालुन पाणी घालुन कुकरला थोडे पाणी घालुन २ शिट्ट्या करुन घ्याव्यात. कुकरचे प्रेशर उतरले की भाजी पळीने घोटुन घ्यावी. त्यात मीठ, लाल तिखट आणि गुळ घालावा. एका पातेल्यात १/२ टीस्पून तेल तापवुन त्यात जिरे आणि हळद घालावी. जिरे तडतडले की त्यात घोटलेली भाजी घालावी. झाकण ठेवुन एक वाफ आणावी. फोडणीच्या पळीमधे उरलेले तेल घालुन तापवावे. तापलेल्या तेलातठेचलेल्या लसुण पाकळ्या घालुन गॅस बारीक करावा. त्यात थोडे लाल तिखट आणि मीठ घालावे. लसणाच्या पाकळ्या कुरकुरीत कराव्यात. भाजी ताटात वाढल्यावर लसणाचे एक चमचा तेल भाजीवर वाढावे. आणि ते मिसळून भाजि भाकरी किंवा चपातीबरोबर खावी.

टीप -

१. लसणीचे तेल करायचे नसेल तर भाजीवर मीठ, तिखट घालून त्यावर कच्चे तेल घालुन खावे आणि लसुण फोडणीत घालावा.

२. *भाजी खुपच अंबट होईल असे वाटले तर भाजि शिजवलेले पाणी काढुन टाकावे.*

*सौजन्य:- ✍🏻 वैद्य प्रशांत भोसले बारामती, ✍🏻 वैद्य कैलास उगले पंढरपूर*

संदर्भ:- रानभाजी, ✍🏻वास्तुशास्त्रज्ञ राधेश बादले पाटील पंढरपूर

🥦 *साप्ताहिक राष्ट्रसंत* 🥦


हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

वनौषधी गुणादर्श - आयुर्वेद महोपाध्याय-दाजी शंकर पदेशास्त्री