Jump to content

चरणजीत सिंह चन्नी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चरणजीत सिंह छन्नी

कार्यकाळ
२० सप्टेंबर २०२१ – १६ मार्च २०२२
मागील अमरिंदर सिंह
पुढील भगवंत मान

पंजाब विधानसभा सदस्य
कार्यकाळ
३० जानेवारी २००७ – १६ मार्च २०२२
मतदारसंघ चमकौर साहिब

जन्म १२ मार्च, १९६३ (1963-03-12) (वय: ६१)
रूपनगर जिल्हा, पंजाब
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

चरंजीत सिंह छन्नी (पंजाबी: ਚਰਨਜੀਤ ਸਿੰਘ ਚੰਨੀ; जन्म: १२ मार्च १९६३)[१] हे एक भारतीय राजनेते, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य व पंजाब राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत.[२] सप्टेंबर २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान ते मुख्यमंत्रीपदावर होते. २०२२ च्या पंजाब विधानसभा निवडणूकीमध्ये चरणजीत सिंह छन्नी व नवज्योतसिंग सिद्धू ह्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. १५ वर्षे विधानसभा सदस्य राहिल्यानंतर छन्नी देखील चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघामधून पराभूत झाले.

ते ह्यापूर्वी पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या मंत्रिमंडळात तंत्रशिक्षण प्रशिक्षण मंत्री होते व पंजाबमधील विधान सभेत विरोधी पक्ष नेते होते.[३]

सुरुवातीचे वयक्तिक आणि शैक्षणिक जीवन[संपादन]

छन्नी यांचा जन्म पंजाब मधील मक्राऊना कालन येथे झाला. [४]त्यांनी कायद्याची पदवी पंजाब विद्यापीठ मधून घेतली आणि एम.बी.ए. हे पी.टी.यू. जालंधर मधून केले.[५]ते दलित रामदासिया सिख समाजाचे होते.[६] [७][८][९][१०]सध्या ते पंजाब मधील चंडीगढ विद्यापीठाअंतर्गत पी. एच. डी. करत आहे. त्यांचा अभ्यास विषय हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा आहे त्यांचे मार्गदर्शक प्रो. इमॅन्युएल नाहर हे आहे. [११]आणि त्यांचे लग्न हे करंजित कौर सोबत झाले असून त्यांना दोन मुलं आहे.[१२]

संदर्भ[संपादन]

 1. ^ "Ministers". punjabassembly.nic.in. 2021-10-08 रोजी पाहिले.
 2. ^ "The Times of India". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2021-10-01.
 3. ^ "The Times of India". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2021-10-01.
 4. ^ "The Times of India". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2021-10-01.
 5. ^ "The Times of India". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2021-10-01.
 6. ^ "Charanjit Singh Channi is Punjab's first Dalit CM". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2021-09-20. 2021-10-08 रोजी पाहिले.
 7. ^ "Punjab gets its first Dalit CM in Charanjit Singh Channi". www.telegraphindia.com. 2021-10-08 रोजी पाहिले.
 8. ^ "PM's Message To Charanjit Channi, Punjab's First Dalit Sikh Chief Minister". NDTV.com. 2021-10-08 रोजी पाहिले.
 9. ^ Hans, Raj Kumar. Making Sense of Dalit Sikh History. Duke University Press. pp. 131–151.
 10. ^ Hans, Raj Kumar. Making Sense of Dalit Sikh History. Duke University Press. pp. 131–151.
 11. ^ Kaur Channi, Harpreet; Singh, Manjeet; Singh Brar, Yadwinder; Dhingra, Arvind; Gupta, Surbhi; Singh, Harpuneet; Kumar, Raman; Kaur, Swapandeep (2021-05). "Agricultural waste assessment for the optimal power generation in the Ludhiana district, Punjab, India". Materials Today: Proceedings. doi:10.1016/j.matpr.2021.04.481. ISSN 2214-7853. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 12. ^ Kaur Channi, Harpreet; Singh, Manjeet; Singh Brar, Yadwinder; Dhingra, Arvind; Gupta, Surbhi; Singh, Harpuneet; Kumar, Raman; Kaur, Swapandeep (2021-05). "Agricultural waste assessment for the optimal power generation in the Ludhiana district, Punjab, India". Materials Today: Proceedings. doi:10.1016/j.matpr.2021.04.481. ISSN 2214-7853. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)