१९८३ क्रिकेट विश्वचषक बाद फेरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  उपांत्य सामने अंतिम सामना
             
जून २२ - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २१३  
 भारतचा ध्वज भारत २१७/४  
 
जून २५ - लॉर्ड्स, लंडन
     भारतचा ध्वज भारत १८३
   वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १४०
जून २२ - ओव्हल मैदान, लंडन
 पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १८४/८
 वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १८८/२  

उपांत्य फेरी[संपादन]

इंग्लंड वि भारत[संपादन]

२२ जून १९८३
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२१३ (६० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२१७-४ (५४.४ षटके)
यशपाल शर्मा ६१ (११५)
पॉल ऍलॉट १/४० (१०)

२२ जुन रोजी ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने अचुक गोलंदाजी केली व इंग्लंड संघाने निर्धारीत ६० षटकात सर्वबाद २१३ धावा केल्या. ग्रेम फ्लॉवरने (३३ धावा ५९ चेंडू, ३ चौ) केल्या तर कपिल देवने ११ षटकात ३५ धावा देत ३ बळी घेतले व मोहिंदर अमरनाथ, रॉजर बिन्नी यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. यशपाल शर्मा (६१ धावा ११५ चेंडू, ३ चौ, २ ष) व संदीप पाटील (५१ धावा ३२ चेंडू, ८ चौ) यांनी अर्धशतक नोंदवले. भारतीय संघाने २१३ धावांचे लक्ष ५४.४ षटकात ४ गडी गमावून पार केले. मोहिंदर अमरनाथला (४६ धावा व २/२७ १२ षटके) सामनावीर घोषित करण्यात आले. [१]

पाकिस्तान वि वेस्ट इंडिज[संपादन]

२२ जून १९८३
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१८४-८ (६० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१८८-२ (४८.४ षटके)


अंतिम सामना[संपादन]

२५ जून १९८३
धावफलक
भारत Flag of भारत
१८३ (५४.४ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१४० (५२ षटके)

अंतिम सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकुण प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉबर्ट्स, मार्शल, गार्नर , होल्डिंग व गोम्सच्या मार्‍या पुढे मोहिंदर अमरनाथ (२६ धावा ८० चेंडू) व क्रिस श्रीकांत (३८ धावा ५७ चेंडू) यांचा अपवाद वगळता कोणताही फलंदाज तग धरू शकला नाही. तळाच्या फलंदाजांनी केलेल्या फलंदाजी मुळे भारतीय संघ सर्व बाद १८३ धावा करू शकला. परंतु भारतीय गोलंदाजांनी खेळपट्टी व हवामानाचा योग्य उपयोग करून भक्कम वेस्ट इंडिज संघाला १४० धावातच बाद करून विश्वचषक जिंकला. अमरनाथ व मदनलाल ह्यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. अमरनाथ ने ७ षटकात केवळ १२ धावा देत ३ बळी घेतले व त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. [२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]