हिंदूंचे धर्मांतर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिंदू धर्म आचरणात आणत असलेल्या व्यक्तीला इतर धर्मात आणण्याला हिंदूंचे धर्मांतर असे म्हणतात. धर्मांतर म्हणजे एका धर्मातून बाहेर पडून विधिपूर्वक दुसरा धर्म स्वीकारणे.[१] हिंदूंचे धर्मांतर करवून आणण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत असे दिसून येते. यामध्ये ख्रिस्ती आणि इस्लामिक धर्म आघाडीवर असल्याचे दिसते. बहुसंख्य धर्मांतरे धनादिकांच्या लोभाने किंवा बळजबरीने घडवून आणलेली असतात. हा एक प्रकारे हिंदूंचा छळ आहे.

धर्मांतराच्या पद्धती[संपादन]

ख्रिस्ती व इस्लाम धर्मांच्या इतिहासात जबरदस्ती, सत्तेचे दडपण, प्रलोभन व अनेक वेळा युद्ध या प्रकारच्या साधनांनी धर्मांतर घडवून आणल्याचे पुष्कळ पुरावे सापडतात. ख्रिस्ती धर्मांमध्ये व इस्लाम धर्मांमध्ये प्रविष्ट झालेले अनेक हिंदू लोभाने किंवा बळजबरीने धर्मांतरित झालेले आढळतात.[२]

इतिहास[संपादन]

इतिहासात हिंदू धर्मिय आपल्या धर्मावर अतिशय कठोर निष्ठा ठेवतांना आढळतात. पण तरीही जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर दिसून येते आणि त्याचे अनेक दाखले बखरींमध्ये दिसून येतात. हिंदूंचे धर्मांतर केल्या नंतर हिंदू समुदाय परत हिंदू धर्मात आल्याचे ही पुरावे आहेत. जसे की नेताजी पालकर आणि त्यांचे अनुयायी यांना जबरदस्तीने इस्लाम स्विकारयला लवला होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे शुद्धीकरण करून त्यांना परत हिंदू धर्मात सामावून घेतले.शिवकालीन पत्रव्यवहार, खंड १५, पृ. २८९.

हिंदूंना ख्रिस्ती धर्मांतरीत करण्याच्या पद्धती[संपादन]

ख्रिस्ती धर्मात आणण्याच्या पद्धतीला इव्हेंजेलायझेशन प्रक्रिया म्हणतात. यासाठी चर्चचे प्रादेशिकीकरण केले गेले आहे. स्थानिक भाषेत प्रार्थना घेतल्या जातात. ख्रिश्चन धर्म संस्थात्मक आहे. त्यामुले त्यांची पद्धती जुनी आणि जाणीवपूर्वक बनवलेली आहे असे दिसून येते. बाप्तिस्मा हा पाण्याचा विधी वापरून हिंदूंना ख्रिश्चन समुदायात प्रवेश दिला जातो. या शिवाय १२ ते १६ वर्षे या कोवळ्या वयोगटातील तरुण, कॅथलिक धर्म स्वीकारतो आहे याचे याची पुष्टी करतो. इंग्लंडमध्ये सोसायटी फॉर द प्रोपगेशन ऑफ द गॉस्पेल इन फॉरेन पार्ट्‌स - एस्‌ पी. जी. (१७०१), द. सोसायटी फॉर प्रॉपगेटिंग ख्रिश्चन नॉलेज – एस्‌. पी. सी. के. (१६९९) इ. संस्था स्थापन करण्यात आल्या. त्या आजही कार्यरत आहेत. विल्यम कॅरी (१७६१–१८३४) हे भारतातील आधुनिक धर्मांतर करण्याच्या मिशनरी कार्याचे संस्थापक होत.[३] अनेक चर्च प्रणित ख्रिस्ती संस्था धर्मांतराचे कार्य करत असतात. त्यासाठी गावागावात चर्च तयार केले जाते. याला चर्च प्लांटिंग म्हणतात. हे चर्च स्थापन झाल्यावर तेथिल हिंदू समुदायाला धर्मांतर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले जातत. यासाठी पगारावर पास्टर नियुक्त केले जातात. नवीन उमेदवारांना भाषा शिकण्याची तत्त्वे आणि नेतृत्व विकास आणि वित्त व्यवस्थापन यासारख्या इतर विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जाते.[४] अनेकदा संस्थे कडून अनाथाश्रम चालवले जातात आणि अनाथ मुलांना आपल्या धर्मात ओढले जाते. काही वेळा शालेय कार्यक्रमातून लहान मुलांना धर्मांतर करण्यास प्रोत्साहन दिले जाते. वृद्धाश्रम चालवून तेथील व्यक्तींना त्यांची संपत्ती चर्चला दान करण्यासाठी प्रवृत्त केले जाते. याच संपत्तीचा यौपयोग करून अजून धर्मांतराचे कार्य चालवले जाते. वर्किंग वुमन्स् होस्टेल्स चालवून तेथे एकट्या असलेल्या व्यक्तींना गोड बोलून धर्माच्या जाळ्यात ओढले जाते. यासाठीही धर्मप्रणित कर्मकांड महत्त्वाचे मानले जाते. कर्मकांडातून व्यक्तीमध्ये आवश्यक असलेली श्रद्धा दृढ होते यामुले धर्मांतरीक झालेला हिंदू जास्त कट्टर होत जातो.

फसवणूक[संपादन]

फसवणूक करून अथवा अमीष दाखवून अनेकदा धर्मांतर केले जाते. महाराष्ट्रातील दुर्गम भागात हिंदू मुलींना बाप्तिस्मा देऊन धर्मांतरासाठी प्रोत्साहन दिले जाते. अहमदनगर हिंदू मुलींना फसवले जात आहे व धर्मांतर केले जाण्याचे आरोप विधानसभेत झाले आहेत.[५]

कायदा[संपादन]

कोणीही आपल्या इच्छेने धर्म बदलू शकतो, तो त्याचा वैयक्तिक अधिकार आहे, असे कायदा सांगतो. परंतु, कायदा असेही म्हणतो की, कोणीही कोणाचेही धमकावून किंवा लालसेने धर्मांतर करू शकत नाही.[६] ओरिसा राज्यात 'धर्मांतर विरोधी कायदा' आहे. येथे हिंदूंचे धर्मांतर केल्यास कमाल दोन वर्षांचा तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो. सक्तीचे धर्मांतर झाल्यास फक्त दहा हजार रुपये दंडाची तरतूद आहे. तमिळनाडू आणि गुजरात राज्यांसह इतरत्र तत्सम कायदे मंजूर केले गेले आहेत. यामध्ये भारतीय दंड संहिता, १८६० च्या कलम २९५ अ आणि २९८ अंतर्गत सक्तीचे धर्मांतर हा दखलपात्र गुन्हा आहे असे नोंदवलेले आहे. या तरतुदींनुसार 'जबरदस्तीने धर्मांतरासाठी' जबाबदार असलेल्या व्यक्तीला तुरुंगवासाची शिक्षेची तरतूद आहे.[७] यामुले कायदेशीर भ्यास करून अनेक संस्था त्यातल्या पळवाटा शोधून मगच धर्मांतराचे कार्य हाती घेतात असे दिसून येते.

भारतात धर्म बदलण्याचे कायदेशीर टप्पे[संपादन]

भारतात अनेक एनजीओज मार्फत विदेशी आर्थिक स्रोत वापरून मोठ्या प्रमाणात कायदेशीर वकीलांची फौज यासाठी वापरली जाते. अतिशय चतुराईने तुम्हाला हिंदू धर्म सोडणे कसे आवश्यक आहे हे सारखे बिंबवले जाते. त्यासाठी अनेकदा व्यक्तीला कुटुंबा पासून वेगळे केले जाते.

  • धर्म बदलण्यासाठी प्रतिज्ञापत्र अथवा शपथपत्र म्हणजे Affidavit न्यायालयात द्यावे लागते.
  • प्रतिज्ञापत्र नोटरीद्वारे प्रमाणित केले जाते.
  • एका राष्ट्रीय दैनिकात व्यक्तीच्या धर्मांतराच्या माहितीची जाहिरात प्रसिद्ध केली जाते
  • धर्म बदलाची अधिकृत नोंदणी करण्यासाठी राजपत्र कार्यालयात अर्ज केला जातो (सहसा हे काम जिल्हा दंडाधिकारी कार्यालयातून केले जाते.)
  • धर्मासोबत नवीन नाव राजपत्रात नोंदवले जाते व अधिकृतपणे धर्मांतर होते.

यातल्या कोणत्याही टप्प्यावर हिंदूंचे धर्मांतर थांबू शकते. पण या काळात धर्मांतर घडवून आणणारे अतिशय जागरूक राहतात आणि धर्मांतर करत असलेल्या लोक हिंदू व्यक्तीचा इतर कुणाशीही संपर्क येऊ दिला जात नाही अथवा येणार नाही याची काळजी घेतात. याच काळात त्यांच्यावर प्रचंड मानसिक दबावही आणला जातो.

हिंदू धर्मात पुनरागमन[संपादन]

कोणत्याही मंदिराचा पुजारी इच्छुक व्यक्तीचे शुद्धीकरण संस्कार करून त्या व्यक्तीला हिंदू बनवू शकतो. संस्थात्मकदृष्ट्या, हिंदू धर्म स्वीकारण्यासाठी विश्व हिंदू परिषद, आर्य समाज मंदिर तसेच चिन्मय मिशन या सारखे अनेक पर्याय आहेत. कोणतीही व्यक्ती विश्व हिंदू परिषद किंवा आर्य समाज मंदिरात जाऊन हिंदू धर्म स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करू शकते. शुद्धीकरण संस्काराचे पालन केल्यावर कोणतीही व्यक्ती हिंदू धर्मात सहजतेने सामील होऊ शकते. उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी दसना देवी मंदिरात स्थापित केलेल्या शिवलिंगावर दूध अर्पण केले आणि हिंदू धर्म स्वीकारला आहे.[८]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "धर्मांतर". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-07-04. 2022-09-18 रोजी पाहिले.
  2. ^ "धर्मांतर". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-07-04. 2022-09-18 रोजी पाहिले.
  3. ^ "vikaspedia Domains". mr.vikaspedia.in. 2022-09-19 रोजी पाहिले.
  4. ^ humans.txt. "Indian Evangelical Mission". Faith2Share (इंग्रजी भाषेत). 2022-09-19 रोजी पाहिले.
  5. ^ "Nitesh Rane Statement: हिंदू मुलींचे धर्मांतर करण्यासाठी पैसा दिला जात आहे, आमदार नितेश राणेंचे वक्तव्य | 📰 LatestLY मराठी". LatestLY मराठी. 2022-08-24. 2022-09-19 रोजी पाहिले.
  6. ^ "धर्म कसा बदलला जातो, धार्मिक बदलाने हिंदू होता येतं का? कायदा काय सांगतो?". News18 Lokmat. 2021-12-06. 2022-09-18 रोजी पाहिले.
  7. ^ "धर्म कसा बदलला जातो, धार्मिक बदलाने हिंदू होता येतं का? कायदा काय सांगतो?". News18 Lokmat. 2021-12-06. 2022-09-18 रोजी पाहिले.
  8. ^ "Wasim Rizvi, ex-chairman of Shia Waqf Board in UP, converts to Hinduism". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2021-12-06. 2022-09-19 रोजी पाहिले.