जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर
तलवारीच्या बळावर, अधिकार वापरून, हिंदूंची इच्छा नसतांना त्यांचे धर्मांतर केले जाते त्यास जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर म्हंटले जाते. असे करण्यासाठी हिंदूंना द्वितीय श्रेणीचे नागरिक म्हणून वागवले जाते. हिंदूंना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात - घरे, नोकऱ्या, सरकारी कल्याणात पद्धतशीरपणे भेदभाव केला जातो. आणि मग गरीबी आणि इतर सामाजिक बहिष्कारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी त्यांना अमीष दाखवले जाते. त्याद्वारे हिंदूंचे धर्मांतर केले जाते. हा एक पद्धतशीरपणे हिंदूंचा छळ करण्याचा भाग आहे.
इस्लामी आक्रमण आणि राज्यकर्ते
[संपादन]इस्लामी आक्रमणात हिंदूंना मृत्यु किंवा इस्लामचा स्विकार असा पर्याय दिला जात असे.[१] जिझिया कर हा मुस्लिम राज्यकर्त्यांनी त्यांच्या संरक्षणाच्या बदल्यात तेथील हिंदू रहिवाशांवर लावलेला कर होता. क्रूर इस्लामी आक्रमक मुहम्मद बिन कासिमने इ.स ७१२ मध्ये सिंध प्रांत लुटला आणि इस्लाम स्वीकारण्यास तयार नसलेल्या हिंदू आणि बौद्धांवर जिझिया कर लादला.[२] भारतात कुतुबुद्दीन ऐबकने पहिल्यांदा जिझिया लावला. जिझिया सोळाव्या शतकात मुघल शासक अकबराने रद्द केला होता परंतु सतराव्या शतकात औरंगजेबाने पुन्हा सुरू केला. हिंदूंचा छळ करण्याचा हा एक प्रकार होता.
पाकिस्तान
[संपादन]पाकिस्तानात हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर केले जात आहे असे वारंवार दिसून येते. गेल्या वर्षी, अमेरिकेने पाकिस्तानला धार्मिक स्वातंत्र्याच्या उल्लंघनासाठी “विशिष्ट चिंता असलेल्या देशांच्या” यादीत ठेवले होते.[३] पाकिस्तानात असलेल्या हिंदूना दुय्यम नागरिक म्हणून वागवले जाते. सर्वसामान्य नागरिक व्हायचे असेल तर त्यांना जबरदस्तीने इस्लाम स्विकारायला लावले जाते.[४] पाकिस्तानमध्ये धार्मिक अल्पसंख्याकांकडून अल्पवयीन मुलींचे अपहरण करणे सामान्य गोष्ट आहे. दरवर्षी सुमारे एक हजार हिंदू मुलींना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले जाते.[५]
गोवा इन्क्विझिशन
[संपादन]पोर्तुगीजव्याप्त प्रदेशातून हिंदू धर्माचा नाश करण्याचं काम कॅथलिक धर्मपीठ आणि पोर्तुगीज शासक यांनी संगनमताने केले. त्या राज्यांतून हिंदू तसेच त्यांचे ज्ञान, विद्या, कला या सर्वांचे उच्चाटन करण्यात आले. त्यांच्या स्थावर जंगम संपत्तीचं सर्वस्वी अपहरण करण्यात आले.[१]https://www.mahamtb.com/Encyc/2018/11/14/A-brief-history-of-purity-.html
गोव्यात, हिंदू विधी किंवा सण पाळणारे उल्लंघन करणाऱ्यांवर बंदी घातली होती. आणि ख्रिश्चन नसलेल्यांना कॅथलिक धर्मात धर्मांतरीत करण्याच्या पोर्तुगीज प्रयत्नांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या व्यक्तींवरही गोवा इन्क्विझिशनने कारवाई केली. पोर्तुगीज ख्रिश्चन राजवटीत हिंदूंविरुद्ध भेदभाव इतर स्वरूपात चालूच होता जसे की लागू करण्यात आलेला झेंडी कर, जो जिझिया करासारखाच होता. गोवा इन्क्विझिशनने गोवा आणि पोर्तुगालच्या इतर ख्रिस्ती वसाहतींना हिंदू चालीरीतींवर हल्ला करण्याचे आदेश देखिल दिले होते.
- ख्रिस्ती धर्मांतरितांची संख्या वाढवण्यासाठी सक्रिय प्रचार करणे,
- हिंदूंना शत्रू घोषीत करणे आणि म्हणून कॅथोलिक ख्रिश्चनांच्या शत्रूंशी लढणे,
- पाखंडी समजल्या जाणाऱ्या हिंदू आचरणांचे उच्चाटन करणे आणि कॅथलिक विश्वासाची शुद्धता राखणे यांचा समावेश आहे.
फ्रान्सिस झेवियरने हा आदेश अंमलात आणला यावेळी किमान दोन लाख हिंदूंची हत्या झाल्याचा संशय आहे. या काळात किमान चार लाख हिंदू धर्मांतरीत केले गेले होते. याच फ्रान्सिस झेवियर च्या नावाने आजही अनेक शाळा आणि महाविद्यालये भारतात चालविली जातात.
शुद्धीकरण
[संपादन]देवल ऋषी आणि मेधातिथी या दोघांच्या शिकवणुकीप्रमाणे सोप्या रितीने शुद्धीकरण करून सहस्त्रावधी स्त्रिया, ज्या बाटवल्या गेल्या होत्या त्यांना शुद्ध करून घेऊन पुन्हा हिंदू धर्मात प्रतिष्ठापूर्वक सामावून घेतलं गेले. शुद्धीकरण होऊअन् हिंदू धर्मात परत येता येते. आणि अशी उदाहरणे सिंध, राजस्थान, नेपाळ, कर्नाटक-बंगाल आणि महाराष्ट्र येथे आहेत. हे कार्य श्री रामानुजाचार्य, श्री रामानंद, चैतन्य महाप्रभू यांनी केले आहे आणि आजही चालले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहिमांमुळे पोर्तुगीज आणि कॅथलिक धर्मपीठाच्या अत्याचारांना पायबंद बसला.
संदर्भ
[संपादन]- ^ "Hinduism - Hinduism under Islam (11th–19th century) | Britannica". www.britannica.com (इंग्रजी भाषेत). 2022-09-11 रोजी पाहिले.
- ^ VibeThemes; Narain, Harsh (2020-03-02). "Jizyah in India". Home (इंग्रजी भाषेत). 2022-09-11 रोजी पाहिले.
- ^ "Pakistan: Hindu girl's killing reignites forced conversion fears". www.aljazeera.com (इंग्रजी भाषेत). 2022-09-11 रोजी पाहिले.
- ^ Abi-Habib, Maria; ur-Rehman, Zia (2020-08-04). "Poor and Desperate, Pakistani Hindus Accept Islam to Get By" (इंग्रजी भाषेत). ISSN 0362-4331.
- ^ Nov 18, ANI /; 2021; Ist, 11:42. "Pakistan: Nearly 1,000 Christian, Hindu women fall victim to forced conversion every year, say rights activists - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2022-09-11 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)