Jump to content

चिन्मय मिशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चिन्मय मिशन ही इ. १९५३ मध्ये स्थापलेली एक आध्यात्मिक, शैक्षणिक व धार्मिक संस्था आहे. तिचे व्यवस्थापन सेंट्रल चिन्मय मिशन ट्रस्ट द्वारे होते. स्वामी चिन्मयानंदांनी केलेल्या कार्याला संघटित स्वरूप देण्यासाठी त्यांच्या शिष्यांनी या मिशनाची स्थापना केली.[] सध्या भारत भरात व जगात अन्यत्र याची ३००हून अधिक केंद्रे कार्यरत आहेत.[] चिन्मय मिशनचे सध्याचे प्रमुख [[स्वामी स्वरूपानंद आहेत स्वामी तेजोमयानंद हे जागतिक प्रमुख होते. हीना नफा तत्त्वावर चालणारी संस्था आहे. संस्थेचे सर्व उत्पन्न समाजाच्या कल्याणासाठी वापरले जाते. यात सर्व स्वामीजी विनामोबदला कार्य करतात.[]

स्वरूप

[संपादन]

हिंदूंनी एकत्र येऊन संघटितपणे कार्य करावे यासाठी लोकशाही मार्गाने या संस्थेचे कार्य चालते. यात उच्चनीचतेला वाव नसतो.

कार्य

[संपादन]

चिन्मय मिशनाद्वारे वेदान्त प्रशिक्षण, बाल विहार, चिन्मय युवा केंद्र, सेंट्रल चिन्मय वानप्रस्थ संस्थान, देवी मंडळ, भजन मंडळ, विद्यालय व महाविद्यालय, पितामह सदन (वृद्धाश्रम), पुस्तक प्रकाशन इत्यादी अनेक प्रकारचे उपक्रम चालवले जातात.[] गीता ही या मिशन मध्ये महत्त्वाची मानली जाते. गीता ज्ञानयज्ञ या सारखे उपक्रम ही संस्था चालवते. चिन्मय गीत ज्ञानयज्ञ समिती हे उपक्रम आयोजित करते. सर्व समाजांना एकत्र घेऊन ही संस्था काम करते.[] आंध्रप्रदेश मध्ये संस्थेने गरीब लोकांसाठी अर्थसहाय्य केले आहेत. त्याद्वारे समाजाचा स्तर उंचावला आहे.[]

परदेशात सहाय्य

[संपादन]

परदेशातील हिंदूंना एकत्र ठेवून आपल्या संस्कृतीची माहिती करून देण्यासाठी ही संस्था काम करते.[] याचा नवीन देशात गेलेल्या भारतीयांना मोठाच आधार असतो.

वेद शिक्षण

[संपादन]

चिन्मय सेवा ट्रस्ट महाराष्ट्रच्या कोल्हापूर येथील चिन्मय सांदीपनी आश्रमाचे प्रमुख आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ निवासी वेदांत अभ्यासक्रम चालवला जातो. २० ते ३० वयोगटातील कोणतेही पदवीधर, अविवाहित आणि विनापाश स्त्री-पुरुष हे या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. निवड झालेल्या साधकांना निवारा, जेवण, कपडे, पुस्तके आणि वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातात.[]

पुस्तके

[संपादन]

सात वेगवेगळ्या लघुकथांचा समावेश असलेल्या ‘ट्रान्सफॉर्मिग इंडियन्स टू ट्रान्सफॉर्म इंडिया’ या पुस्तकांची माला तयार केली आहे. 'चिन्मय मिशन'च्या या पुस्तकाच्या निमित्ताने सकारात्मक आणि प्रेरणादायी दृष्टिकोन अंगीकारायला लावणा-या पुस्तकांची खूप वेगळ्या पातळीवर दखल घेतली जाते आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते प्रकाशन झाले होते.[]

दुष्काळी मदत

[संपादन]

चिन्मय मिशन संस्थेच्या पुणे शाखे द्वारे जनावरांसाठी मोफत काळजी घेणारी 'चिन्मय चारा छावणी' उभारण्यात आली आहे. तसेच गरजू लोकांच्या जनावरांसाठी मोफत चारा ही वाटण्यात येत आहे.

हे सुद्धा पाहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  • "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ books.google.com.au/books?isbn=8178357186
  2. ^ http://www.livekolhapur.com/?p=69435
  3. ^ http://books.google.com.au/books?id=xn4UAQAAMAAJ&q=chinmaya+mission+social+activities&dq=chinmaya+mission+social+activities&hl=en&sa=X&ei=5FfxU-CtKpfq8AXMkYDoAw&ved=0CCgQ6AEwATgK
  4. ^ books.google.com.au/books?id=ZNQ4TNdOUS4C
  5. ^ books.google.com.au/books?isbn=1593116993
  6. ^ books.google.com.au/books?isbn=8175970103
  7. ^ books.google.com.au/books?isbn=080477529X
  8. ^ http://www.livekolhapur.com/?p=69435
  9. ^ http://prahaar.in/collag/9855 [मृत दुवा] या दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती (संदर्भित दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)