हल्द्वानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हल्द्वानीचे नकाशावरील स्थान

हल्द्वानी
भारतामधील शहर


हल्द्वानी is located in उत्तराखंड
हल्द्वानी
हल्द्वानी
हल्द्वानीचे उत्तराखंडमधील स्थान

गुणक: 29°12′52″N 79°31′40″E / 29.21444°N 79.52778°E / 29.21444; 79.52778

देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तराखंड
जिल्हा नैनिताल
समुद्रसपाटीपासुन उंची १,३९१ फूट (४२४ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,५६,०६०
  - महानगर २,३२,०६०
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३० (भारतीय प्रमाणवेळ)


हल्द्वानी हे भारताच्या उत्तराखंड राज्याच्या नैनिताल जिल्ह्यामधील एक मोठे शहर आहे. हल्द्वानी उत्तराखंडच्या कुमाऊँ भागात हिमालय पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसले असून ते उत्तर प्रदेशातील बरेलीच्या १०० किमी उत्तरेस स्थित आहे. नैनिताल, रानिखेत, अलमोडा, पिथोरागढ इत्यादी लोकप्रिय पर्यटनस्थळांकडे जाण्यासाठी हल्द्वानी हे प्रवेशद्वार मानले जाते. हल्द्वानी उत्तराखंडामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे नगर असून २०११ साली हल्द्वानीची लोकसंख्या सुमारे १.५६ लाख होती.

येथील काठगोदाम रेल्वे स्थानक हेभारतीय रेल्वेचे एक टर्मिनस असून येथून लखनौ, कोलकाता, दिल्ली इत्यादी अनेक मोठ्या शहरांसाठी थेट रेल्वेगाड्या सुटतात. पंतनगर विमानतळ येथून २८ किमी अंतरावर आहे.

बाह्य दुवे[संपादन]