Jump to content

हजरत निजामुद्दीन–चेन्नई सेंट्रल राजधानी एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हजरत निजामुद्दीन–चेन्नई सेंट्रल राजधानी एक्सप्रेस
हजरत निजामुद्दीन–चेन्नई सेंट्रल राजधानी एक्सप्रेसचा मार्ग

चेन्नई राजधानी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. राजधानी एक्सप्रेस ह्या प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे तमिळनाडूची राजधानी चेन्नई शहराला दिल्लीसोबत जोडते. राजधानी एक्सप्रेस चेन्नई सेंट्रल ते हजरत निजामुद्दीन स्थानकांदरम्यान आठवड्यातून दोनदा धावते व ह्या दोन शहरांमधील २१७५ किमी अंतर २८ तास १५ मिनिटांमध्ये पूर्ण करते.

मार्ग

[संपादन]
१२४३३ / १२४३४ चेन्नई राजधानी एक्सप्रेस
स्थानक संकेत स्थानक/शहर नाव अंतर (किमी)
MAS चेन्नई सेंट्रल
BZA विजयवाडा ४३१
WL वारंगळ ६३९
BPQ बल्हारशाह ८८२
NGP नागपूर १०९०
BPL भोपाळ १४८०
JHS झाशी १७७२
GWL ग्वाल्हेर १८६९
AGC आग्रा छावणी १९८७
NZM हजरत निजामुद्दीन २१७५

बाह्य दुवे

[संपादन]