पोझ्नान शहर स्टेडियम (पोलिश: Stadion Miejski w Poznaniu) हे पोलंड देशाच्या पोझ्नान शहरामधील एक फुटबॉलस्टेडियम आहे. १९८० साली बांधण्यात आलेल्या ह्या स्टेडियमचे २००३ ते २०१० दरम्यान संपूर्णपणे नूतनीकरण केले गेले. येथे युएफा युरो २०१२ स्पर्धेमधील तीन सामने खेळवले गेले.