Jump to content

सूर्यकुमारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Tanguturi Suryakumari (es); Tanguturi Suryakumari (ast); Tanguturi Suryakumari (ca); Tanguturi Suryakumari (de); Tanguturi Suryakumari (ga); Tanguturi Suryakumari (da); スーリヤクマリ (ja); Tanguturi Suryakumari (tet); Tanguturi Suryakumari (sv); Tanguturi Suryakumari (ace); तंगुतुरी सूर्यकुमारी (hi); టంగుటూరి సూర్యకుమారి (te); Tanguturi Suryakumari (fi); Tanguturi Suryakumari (map-bms); சூர்யகுமாரி (ta); Tanguturi Suryakumari (fr); Tanguturi Suryakumari (jv); तंगुतुरी सूर्यकुमारी (mr); Tanguturi Suryakumari (pt); Tanguturi Suryakumari (bjn); Tanguturi Suryakumari (sl); Tanguturi Suryakumari (pt-br); Tanguturi Suryakumari (id); Tanguturi Suryakumari (nn); Tanguturi Suryakumari (nb); Tanguturi Suryakumari (nl); Tanguturi Suryakumari (min); Tanguturi Suryakumari (gor); Tanguturi Suryakumari (bug); Tanguturi Suryakumari (su); Tanguturi Suryakumari (en); تانجوتورى سورياكومارى (arz); Tanguturi Suryakumari (sq); ਸੂਰਿਆਕੁਮਾਰੀ (pa) actriz india (es); aktore indiarra (eu); actriz india (1925–2005) (ast); actriu índia (ca); actores a aned yn 1925 (cy); ban-aisteoir Indiach (ga); بازیگر هندی (fa); 印度女演員 (zh); indisk skuespiller (da); actriță indiană (ro); indisk skådespelare (sv); שחקנית הודית (he); भारतीय गायिका और अभिनेत्री (hi); intialainen näyttelijä (fi); Indian actress (en-ca); இந்திய நடிகை (ta); attrice indiana (it); ভারতীয় অভিনেত্রী (bn); actrice indienne (fr); India näitleja (et); भारतीय गायिका व अभिनेत्री (mr); actriz indiana (pt); pemeran asal India (id); indisk skodespelar (nn); indisk skuespiller (nb); Indiaas actrice (1925-2005) (nl); ഇന്ത്യന്‍ ചലച്ചിത്ര അഭിനേത്രി (ml); Indian actress (en-gb); индийская актриса (ru); actriz india (gl); ممثلة هندية (ar); Indian actress (en); індійська акторка (uk) శ్రీమతి టంగుటూరి సూర్యకుమారి, టి. సూర్యకుమారి, టి.సూర్యకుమారి (te); தங்குதூரி சூர்யகுமாரி (ta)
तंगुतुरी सूर्यकुमारी 
भारतीय गायिका व अभिनेत्री
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखनोव्हेंबर १३, इ.स. १९२५
राजमहेंद्री
मृत्यू तारीखएप्रिल २५, इ.स. २००५
लंडन
नागरिकत्व
व्यवसाय
मातृभाषा
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

तंगुतूरी सूर्यकुमारी (१३ नोव्हेंबर १९२५ - २५ एप्रिल २००५) ज्या सूर्यकुमारी एल्विन नावाने देखील ओळखले जाते,[] ह्या तेलुगु चित्रपटातील एक भारतीय गायिका, अभिनेत्री आणि नर्तीका होत्या. त्यांनी "मा तेलगू थल्लीकी" हे आंध्र प्रदेशचे अधिकृत गाणे गायले आहे.[] त्या मिस मद्रास १९५२ स्पर्धेच्या विजेते होत्या [] आणि मिस इंडिया १९५२ स्पर्धेची उपविजेत्या होत्या ज्यात इंद्राणी रहमान विजेत्या ठरल्या.[] आंध्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि मद्रासचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेल्या कार्यकर्त्या आणि राजकारणी तंगुतुरी प्रकाशम पंतुलु यांच्या त्या भाची होत्या.

एक अभिनेत्री म्हणून, त्यांनी १९६१ मध्ये रवींद्रनाथ टागोरच्या नाटक द किंग ऑफ द डार्क चेंबरमध्ये क्वीन सुदर्शनाच्या भूमिकेसाठी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आऊटर क्रिटिक्स सर्कल पुरस्कार जिंकला.[]

कारकीर्द

[संपादन]

सूर्यकुमारी वयाच्या १२ व्या वर्षी एक चित्रपट अभिनेत्री होत्या, जेव्हा तिच्या गायन प्रतिभेला सामावून घेण्यासाठी विप्रनारायण (१९३७) चित्रपटात एक विशेष भाग लिहिला गेला.[]

सूर्यकुमारीचा पुढचा चित्रपट अद्रुष्टम (१९३९) यशस्वी ठरला.[][] कटकम (१९४८) आणि संसार नोवका (१९४९) हे तिचे इतर चित्रपट यशस्वी आहेत. कटकम हे सुरुवातीला एक तमिळ नाटक होते जे कमी प्रसिद्ध अश्या विल्यम शेक्सपियरच्या सिम्बेलिन नाटकावर आधारित होते. सूर्यकुमारीने चित्रपटाच्या तमिळ आवृत्तीत काम केले. सूर्यकुमारीने नंतर सुमारे २५ चित्रपटांमध्ये काम केले. या चित्रपटांपैकी देवथा आणि रैथु बिड्डा यांनी चित्रपट इतिहास घडवला आणि तेलुगू चित्रपटांच्या सुवर्णकाळात योगदान दिले. एचव्ही बाबूच्या कृष्णप्रेमा या चित्रपटात सूर्यकुमारीने नारद ऋषींची भूमिका साकारली होती आणि तेलुगू सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं की एका स्त्रीने नारदाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात, पहिल्यांदाच, सूर्यकुमारीच्या गायन प्रतिभेचा नारदाच्या रूपात पुरेपूर वापर करण्यात आला आणि तिच्या अभिनयाने तिला अनेक पुरस्कार मिळवून दिले. सूर्यकुमारी यांनी वतन (१९५४) आणि उडण खतोला (१९५५) या हिंदी चित्रपटांमध्येही काम केले. उडण खतोला मध्ये सूर्यकुमारीने हिंदी चित्रपटाचे प्रसिद्ध दिलीप कुमार यांच्यासोबत अभिनय केला आणि फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळवले.

गायन

[संपादन]

त्यांच्या चित्रपट कारकिर्दीव्यतिरिक्त, सूर्यकुमारी खाजगी गाण्यांसाठी प्रसिद्ध होत्या जे ग्रामोफोन रेकॉर्ड आणि नंतर ऑडिओ कॅसेट मधून प्रकाशित होत असे. ही गाणी मधुर आणि प्रभावी होती. त्यांच्या गोड आवाजाने या गाण्यांमध्ये सौंदर्य वाढवले. सूर्यकुमारी यांनी काही देशभक्तीपर गीतेही गायली आणि त्यापैकी काहींमध्ये सूर्यकुमारीने महात्मा गांधींची प्रशंसा केली. सूर्यकुमारीने गायलेली असंख्य गाणी होती त्यापैकी काही "मां तेलुगु तल्लीकी", "मल्लेपूधंडलू", "ओ महात्मा", "सतपत्र सुंदरी", "मामिदिचेत्तुनू" आणि इतर आहेत.[] राष्ट्रभक्त तमिळ लेखक आणि पत्रकार ए.के. चेट्टियार यांनी बनवलेल्या महात्मा गांधींबद्दलच्या माहितीपटातही सूर्यकुमारीने गायले आहे.

पश्चिमेतील कारकीर्द

[संपादन]
बॉम्बे येथे १९५२ च्या मिस इंडिया स्पर्धेत इतर स्पर्धकांसह सूर्यकुमारी (डावीकडून सहावी )

एकंदरीत, सूर्याकुमारी १९४० आणि १९५० च्या दशकात सुमारे २५ भारतीय चित्रपटांमध्ये दिसल्या जसे तेलगू, संस्कृत, तमिळ, गुजराती, हिंदी आणि इंग्रजीसह विविध भाषांमध्ये गायन आणि अभिनय केला. रैथू बिड्डा (१९३९), भाग्यलक्ष्मी (१९४३), कृष्णा प्रेमा (१९४३), मरदालू पेल्ली (१९५२), वतन (१९५४), उडण खतोला (१९५५) या चित्रपटांसाठी तिचे चित्रपट प्रशंसक होते.

१९५० च्या मध्यात, अमेरिकेच्या मोशन पिक्चर असोसिएशनने हॉलीवूडमध्ये आमंत्रित केलेल्या भारतीय चित्रपट उद्योगातील प्रतिनिधी मंडळाच्या सदस्या म्हणून त्यांनी अमेरिकेला पहिली भेट दिली (जरी संघाच्या नियमांनी तिला तिथल्या चित्रपटात काम करण्यापासून प्रतिबंधित केले होते). १९५९ मध्ये, त्या कोलंबिया विद्यापीठात शिकवण्यासाठी आणि पाश्चात्य शास्त्रीय आणि लोकप्रिय नृत्य प्रकारांचा अभ्यास करून आपल्या कौशल्यांमध्ये भर घालण्यासाठी न्यू यॉर्कला गेल्या. त्यांच्या आगमनानंतर, त्या भारतीय राजदूतांसोबत दूरदर्शनवर दिसल्या आणि त्यांनी भारतीय गाणी गायली. अमेरिकन नाटकांमध्ये पदार्पण करताना, त्यांनी फेब्रुवारी १९६१ मध्ये जान हस प्लेहाऊस थिएटरमध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्या द किंग ऑफ द डार्क चेंबर या नाटकात राणी सुदर्शनाची भूमिका पुन्हा साकारली. त्यांच्या कामगिरीचे कौतुक करताना, रेड बँक रजिस्टरने लिहिले की त्यांनी "आकर्षक सौंदर्याशी जुळण्यासारखी चमकदार कलात्मकता प्रदर्शित केली." [] अभिनयासाठी, त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी ऑफ-ब्रॉडवेचा समीक्षकांच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुर्यकुमारींची अल्फ्रेड हिचकॉकशी ओळख होती व त्यांच्यासाठी भारतीय कथांवर संशोधन केले.

लंडनचा प्रवास

[संपादन]

१९६५ मध्ये सूर्यकुमारी लंडनला गेल्या. आर्ट्स थिएटरमध्ये एका नवीन नाटकात काइंडली मंकीजमध्ये हिंदू देवता कालिकाची भूमिका करण्यासाठी त्या तिथे गेल्या होत्या. पण त्यांनी तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला आणि केन्सिंग्टनमध्ये त्यांचे पती हॅरोल्ड एल्विनसह इंडिया परफॉर्मिंग आर्ट्सची स्थापना केली, जे कलाकारांना प्रशिक्षित करण्याचा आणि नाटक बसवण्याचा एक प्रकल्प होता.[] स्वतः सूर्यकुमारी, त्यांचे विद्यार्थी आणि सहकारी कलाकार यांचे पुढील ४० वर्षांसाठी वार्षिक सादरीकरण साऊथ बँक सेंटरमधील परसेल रूममध्ये झाले. १९८२ मध्ये बेन किंग्सले यांच्यासमवेत होमेज टू महात्मा गांधी आणि लॅरी ॲडलरच्या हार्मोनिका इम्प्रोव्हिजेशन्स ॲन इंडियन पेजेंटमध्ये मध्ये सुर्यकुमारींनी भाग घेतला होता. १९६९ मध्ये सेंट पॉल कॅथेड्रल येथे गांधी शताब्दी स्मरण सोहळ्यात मुख्य गायिका म्हणून त्या होत्या. सूर्यकुमारी ज्या, एक गायक, अभिनेता आणि नृत्यांगना होत्या त्यांचे २५ एप्रिल २००५ रोजी वयाच्या ७९ व्या वर्षी लंडन येथे निधन झाले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b Srihari, Gudipoodi (4 July 2008). "Twinkle toes and a magical voice". The Hindu. 17 March 2018 रोजी पाहिले.
  2. ^ a b Harpe, Bill (18 May 2005). "Obituaries: Surya Kumari". The Guardian. 2014-08-18 रोजी पाहिले.
  3. ^ a b Guy, Randor (1 August 2008). "Adrishtam 1939". The Hindu.
  4. ^ Rajadhyaksha, Ashish; Willemen, Paul (2014). Encyclopedia of Indian Cinema. Routledge. p. 225. ISBN 9781135943189. 17 March 2018 रोजी पाहिले.
  5. ^ "Biography of Tanguturi Suryakumari". 2023-04-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-02-18 रोजी पाहिले.
  6. ^ https://www.amazon.com/Golden-Hour-Basic-Songs-Tanguturi-Suryakumari
  7. ^ Glover, William (13 February 1961). "Spirited Play From India Has Charm". Red Bank Register. Associated Press. p. 5.
  8. ^ a b Newley, Patrick (1 June 2005). "Final curtain". thestage.co.uk. 17 March 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 March 2018 रोजी पाहिले.