सुविज्ञ शर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सुविज्ञ शर्मा
Suvigya.jpg
सुविज्ञ शर्मा
पूर्ण नावसुविज्ञ रामकृष्ण शर्मा
जन्म जुलै २८ , इ.स. १९८३
जयपूर, राजस्थान, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र चित्रकला
प्रशिक्षण महराजा सवाई मानसिंह शाळा
भारतीय विद्या भवन विद्याश्रम
भवानीपूर एजुकेशन सोसायटी कॉलेज
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय
पुरस्कार भारत गौरव पुरस्कार (२०१२)
वडील आर.के. शर्मा
आई मीनाक्षी शर्मा
पत्नी चारू शर्मा

सुविज्ञ शर्मा (२८ जुलै, १९८३:जयपूर, राजस्थान, भारत - ) हे एक भारतीय कलाकार, चित्रकार, फॅशन डिझायनर आणि उद्योजक आहेत. ते सूक्ष्म चित्र (मिनिएचर पेंटिंग), तंजावर चित्र, फ्रेस्को चित्र व इतर जिवंत पोट्रेट चित्रांसाठी विख्यात आहेत. ऐतिहासिक वारसा असणाऱ्या सिटी पॅलेस, जयपूर आणि जामा मशिदीतील फ्रेस्को चित्रांच्या जीर्णोद्धारासाठी त्यांनी हातभार लावला आहे. त्यांना २०१२चा भारत गौरव पुरस्कार देण्यात आला. [१][२][३]

सुविज्ञ शर्मा यांच्या अनेक कलाकृती बजाज, बिरला, सिंघानिया, अंबानी, पिरामल, मित्तल व बर्मन सारख्या श्रीमंत व्यक्तींनी खरेदी केलेल्या आहेत.

सुविज्ञच्या कलाकृती सिमरोझा आर्ट गॅलरी, चित्रकूट आर्ट गॅलरी, चेन्नई आर्ट गॅलरी, आर्टिझन्स आर्ट गॅलरी व इंडिया हॅबिटॅट सेंटर यांसारख्या विभिन्न कला दालनांमध्ये प्रदर्शित झाल्या आहेत. सप्टेंबर २०१४ मध्ये, सुविज्ञ शर्मा यांनी आपला संग्रह ॲन आर्ट कलेक्टर्स पॅराडाइज प्रकाशित केला. त्यात २४ कॅरेट सोन्याने सजवलेली कलोनियल स्टँप पेपर चित्रे आहेत. या संग्रहाचे प्रकाशन बॉलीवुड अभिनेत्री राणी मुखर्जीच्या हस्ते झाले.

१८ ऑक्टोबर २०१५ रोजी, सुविज्ञ शर्मा यांनी आपला संग्रह फॉरएवर इटरनल पिचवई प्रकाशित केला. या संग्रहाचे प्रकाशन बॉलीवुड अभिनेत्री कंगना राणावतच्या हस्ते झाले.

कौटुंबिक माहिती[संपादन]

सुविज्ञ शर्मा यांचा जन्म २८ जुलै, १९८३ रोजी राजस्थानमधील जयपूर शहरात झाला. त्यांचे वडील आर.के. शर्मा हे कलाकार असून आई मीनाक्षी शर्मा गृहिणी होत्या. सुविज्ञने वयाच्या सातव्या वर्षापासूनच आसपासच्या वस्तूंचे व व्यक्तींचे पोट्रेट रेखाटणे सुरू केले होते. सुविज्ञचे शालेय शिक्षण जयपूर मधील महराजा सवाई मानसिंह व भारतीय विद्या भवनच्या विद्याश्रम शाळांमध्ये झाले. त्यानी कोलकातामधील भवानीपूर एज्युकेशन सोसायटी कॉलेजमधून पदवी मिळवली. त्यांनी पुण्यातील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून फॉरेन ट्रेड ॲन्ड एक्सपोर्ट मॅनेजमेंटचा अभ्यास केला.

सुविज्ञ यांचा विवाह चारू शर्मा यांच्याशी झाला आहे, त्या जयपूरमध्ये एक स्वयंसेवी संस्था चालवतात. तेथे त्या नियमितपणे कला शिबिरे घेतात. हे दांपत्य दूरस्थ भागांमधील महिला व तरुण मुलींना त्यांच्यातील कला ओळखण्यास मदत करते. त्यांना अभिज्ञ नावाचा एक मुलगा आहे.

कारकीर्द[संपादन]

सुविज्ञ शर्मा यांच्या कलाकृतींमध्ये भारतीय राजेशाही कलेचा वारसा दिसत असल्याचे वलय त्यांनी समकालीन जगतात निर्माण केले आहे. त्यांनी आघाडीच्या भारतातील राजघराण्यांच्या वंशजांसाठी चितारलेल्या कलाकृतींमध्ये विलास, कला व जीवनशैलीचे दुर्मीळ दृश्य दिसून येते. सुविज्ञ त्यांच्या मार्मिक परीक्षकांना राजेशाही वातावरणात निर्माण केलेल्या उत्कृष्ट कलाकृत्या पाहण्याच्या उत्तम संधी देत असतात. फक्त राजेशाही घराणेच नव्हे तर सुविज्ञचा आणखीही एक ग्राहकवर्ग आहे. बजाज, बिरला, सिंघानिया, अंबानी, पिरामल, मित्तल व बर्मन सारख्या भारतभरातील कित्येक उद्योगपती घराण्यांसाठी सुविज्ञने कलाकृती निर्माण केल्या आहेत. या व्यतिरिक्त त्यांचे बॉलीवुडमध्ये ही काही प्रशंसक व ग्राहक आहेत, त्यांत प्रियंका चोपङा, राणी मुखर्जी व आदित्य चोपङा यांचाहीहि समावेश आहे.

सुविज्ञ शर्मा यांचा फ्रेस्को वॉल पेंटिंग, प्युअर स्टर्लिंग सिल्व्हर, चंदन व मकराना संगमरवरी मंदिर, औद्योगिक जगतासाठीच्या प्रेक्षणीय भेटवस्तू व डिझायनिंगशी संबंधित कामांचा विशिष्ठ अभ्यास आहे. त्यांनी जगभरात भ्रमण करून लंडन, ससेक्स व इंग्लंड सारख्या ठिकाणी विविध प्रदर्शने व कार्याशाळांच्या माध्यमातून कित्येक कलाप्रेमींचे लक्ष वेधले आहे. दरम्यानच्या काळात, त्यांचे काम सगळ्या मोठ्या महानगरांमध्ये व भारतातील सर्व प्रसिद्ध कला दालनांमध्ये प्रदर्शित केले होते.

सुविज्ञच्या कलाकृती जयपूर आणि उदयपूरच्या हवेल्या, किशनगड, जामा मस्जिदची सुवर्ण पाने, जयपुर सिटी पॅलेसचे काही भाग, बंगले, दर्गा व अनेक ऐतिहासिक वारसा असणाऱ्या ठिकाणी दिसून येतात.

ते याच संदर्भात कार्यशाळाही चालवतात. जुन्या अनुषंगाने जाऊन, ते जे रंग वापरतात ते १००% नैसर्गिक वनस्पती रंग असतात. हे रंग भाज्यांपासून व पाचू, माणिक व हिरे असल्या नैसर्गिक रत्‍नांपासून बनतात

सुविज्ञ यांनी सिद्धिविनायकाचीया चतुरायामी चित्रे काढली आहेत. त्यात त्यांनी २४ कॅरेट सोने, चांदी व रत्‍नांचा उपयोग केला आहे. संपूर्ण भारतातली ही एकमेव चतुरायामी कलाकृती आहे. त्याच बरोबर त्यांनी १००% अस्सल दुर्मीळ स्टँप पेपरवर २२ विविध सुवर्ण चित्रेही चितारली आहेत.

फॉरएवर इटरनल पिचवई[संपादन]

१८ ऑक्टोबर २०१५ रोजी, सुविज्ञ शर्मा यांनी आपला संग्रह फॉरएवर इटरनल पिचवई प्रकाशित केला. या संग्रहाचे प्रकाशन बॉलीवुड अभिनेत्री कंगना राणावतच्या हस्ते झाले.

मान्यता[संपादन]

२९ च्या तरुण वयात सुविज्ञ शर्मा यांना २०१२ रोजी भारत गौरव पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.

इतर[संपादन]

मार्च २०१५ रोजी सुविज्ञ शर्मा हे स्माईल फाउंडेशनसाठी मुलींच्या शिक्षणासारख्या थोर कारणासाठी रॅम्पवर प्रमुख टीव्ही व बॉलीवूड कलाकारांसोबत चालले होते.

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत