Jump to content

सुकसाळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?सुकसाळे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ०.४०८ चौ. किमी
जवळचे शहर विक्रमगड
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
१,३८५ (२०११)
• ३,३९५/किमी
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा वारली
कोड
आरटीओ कोड

• एमएच/४८ /०४

सुकसाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

ह्या गावाजवळून पश्चिम वाहिनी वैतरणा नदी वाहते. वैतरणा नदीची उपनदी देहरजी नदीवर धरण प्रकल्प बांधण्यात येत आहे.[]

हवामान

[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन

[संपादन]

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २७७ कुटुंबे राहतात. एकूण १३८५ लोकसंख्येपैकी ६९७ पुरुष तर ६८८ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.हल्ली येथील स्थानिक आदिवासींनी फुलशेती सुरू केलेली आहे. मुख्यतः मोगरा फुलांची शेती केली जाते. मोगरा फुलांना दादर, कल्याण, सुरत, नाशिक भागात भरपूर प्रमाणात मागणी आणि बाजारपेठ आहे.विशेषतः श्रावण,चैत्र, भाद्रपद, आश्विन महिन्यांच्या उत्सवाच्या काळात मागणी जास्त असल्याने शेतकऱ्यांना बाजारभाव सुद्धा चांगला मिळतो.

नागरी सुविधा

[संपादन]

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस विक्रमगड बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा विक्रमगडवरून उपलब्ध असतात.

जवळपासची गावे

[संपादन]

सावडे,गडधे, नागझरी, यशवंतनगर, संगमनगर, जांभे, खुदेड, हनुमंतपाडा, साखरे, अंधारी, टेंभोळी ही जवळपासची गावे आहेत.सुकसाळे ग्रामपंचायतीमध्ये आंबेघर,आंबेघर धरमपूर,शावटे आणि सुकसाळे ही गावे येतात.

संदर्भ

[संपादन]

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/

५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036

६. https://palghar.gov.in/

७. https://palghar.gov.in/tourism/

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स रविवार १८ मे २०२५