Jump to content

चुना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चुनखडी या पानावरून पुनर्निर्देशित)

चुना हा एक अ-सेंद्रिय पदार्थ आहे ज्यात कार्बोनेट,ऑक्साईड्स व हायड्रॉक्साईड हे घटक जास्तकरून असतात. चुन्यास इंग्रजीत कॅल्शियम ऑक्साईड देखील म्हणतात. तो ज्वालामुखीतून निघणारा एक घटकही आहे.याचा वापर विस्तृत प्रमाणात बांधकामात व अभियांत्रिकी कामांसाठी होत असतो. सिमेंटमधील हा एक मुख्य घटक आहे. त्याचा उपयोग अनेक रासायनिक उद्योगांमध्ये होतो.साखर उद्योग हा त्यातील एक आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यातही याचा फेरस सल्फेटसोबत उपयोग करतात.

भारतात विड्याचे पानात याचा उपयोग करतात. हा कॅल्शियमचा एक नैसर्गिक स्रोत आहे.