चुना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चुना हा एक अ-सेंद्रिय पदार्थ आहे ज्यात कार्बोनेट,ऑक्साईड्स व हायड्रॉक्साईड हे घटक जास्तकरुन असतात. चुन्यास इंग्रजीत कॅल्शियम ऑक्साईड देखील म्हणतात. तो ज्वालामुखीतून निघणारा एक घटकही आहे.याचा वापर विस्तृत प्रमाणात बांधकामात व अभियांत्रिकी कामांसाठी होत असतो. सिमेंटमधील हा एक मुख्य घटक आहे. त्याचा उपयोग अनेक रासायनिक उद्योगांमध्ये होतो.साखर उद्योग हा त्यातील एक आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यातही याचा फेरस सल्फेटसोबत उपयोग करतात.

भारतात विड्याचे पानात याचा उपयोग करतात. हा कॅल्शियमचा एक नैसर्गिक स्रोत आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.