Jump to content

साचा चर्चा:ताजा उदयोन्मुख लेख

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१४ एप्रिल २०२० पासून Protected संपादन विनंत्या

[संपादन]

यंत्रणा झटत आहे. वैद्यकीय यंत्रणा जीवावर उदार होऊन रात्रंदिवस सेवा करण्यात व्यस्त आहे. मूलभूत अधिकारांसोबत नागरिकांनी आपल्या मूलभूत कर्तव्यांबाबतही जागरूक असायला हवं असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वरळे व्यक्त केले. Sachinvenga (चर्चा) १२:४०, १४ एप्रिल २०२० (IST)[reply]

झाले. -- अभय नातू (चर्चा) ०४:१६, १५ एप्रिल २०२० (IST)[reply]

१५ एप्रिल २०२० पासून Protected संपादन विनंत्या

[संपादन]

२०२० मधील महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेक ९ मार्च २०२० रोजी सुरू झाला. या दिवशी भारताच्या महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या साथीच्या आजाराची पहिली नोंद झाली. १७ मार्च रोजी महाराष्ट्रात पहिल्या कोरोना बाधीत व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली. महाराष्ट्र हे देशातील कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव झालेले राज्य आहे. राज्यात १४ एप्रिल २०२० पर्यंत २६८४ जणांना याची लागण झाली असून त्यापैकी १७८ जणांचा मृत्यू झाला आहे आणि २५९ जण पूर्ण बरे झालेले आहेत.

या उद्रेकावरील उपाययोजनेचा भाग म्हणून अभूतपूर्व निर्णय घेण्यात आले. ११ मार्चपासून राज्यातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व बससेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या. १३ मार्च रोजी, महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूचा उद्रेक पाहता महाराष्ट्रात महामारी रोग अधिनियम १८९७ लागू करण्यात आला. २२ मार्च पासून प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय विमान सेवा, रेल्वे तसेच मुंबईतील लोकल सेवा बंद करण्यात आल्या. २३ मार्च ला जमाव बंदीने फरक पडत नसल्याचे पाहून संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

महाराष्ट्रातील जनजीवनावर याचे फार मोठे परिणाम झाले. राज्यात लागू झालेल्या नियमांनुसार अत्यावश्यक कामाशिवाय सर्वांनी घरी बसणे सक्तीचे करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडू नये, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने वारंवार करुनही लोक गंभीरतेने घेताना दिसले नाहीत. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी जनतेला दिलेली सूट हीच लोकांच्या बेशिस्तीच्या वागण्याने समाजासाठी प्राणघातक ठरु नये या साठी महाराष्ट्रात पोलिस यंत्रणा झगडत आहे. वैद्यकीय यंत्रणा जीवावर उदार होऊन रात्रंदिवस सेवा करण्यात व्यस्त आहे. मूलभूत अधिकारांसोबत नागरिकांनी आपल्या मूलभूत कर्तव्यांबाबतही जागरूक असायला हवं असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वरळे व्यक्त केले. Sachinvenga (चर्चा) ०९:५५, १५ एप्रिल २०२० (IST)[reply]