Jump to content

विकिपीडिया:मासिक सदर/एप्रिल २००७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बेळगांव

बेळगांव हे दक्षिण महाराष्ट्र आणि वायव्य कर्नाटक या सीमाभागात वसलेले, बेळगांव जिल्हाबेळगांव विभागाचे प्रशासकीय मुख्यालय असलेले शहर आहे. समुद्रसपाटीपासून २,५०० फूट (७६२ मीटर) उंचीवर वसलेले बेळगांव शहर मार्कंडेय नदीच्या किनार्‍यावर आहे. येथील हवामान आल्हाददायक असून वनस्पतीजीवन मुख्यतः सदाहरित प्रकारातील आहे.

बेळगांव हे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरचे मोठे व्यापारकेंद्र आहे. बेळगांवावरून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात वाद सुरू आहे व प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. शहरातील प्रमुख भाषा मराठी असून कन्नडकोंकणी भाषादेखील बोलल्या जातात.

बेळगांव शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. येथे देशा-परदेशातून विद्यार्थी शिकायला येतात. बेळगांवात भारतीय सैन्य दलाची अनेक सैनिकी शिक्षणकेंद्रे व भारतीय हवाईदलाचे तळ व कमांडो स्कूल आहेत. मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचे मुख्यालय येथेच आहे. बेळगांवाच्या भौगोलिक स्थानामुळे ब्रिटिशकाळापासूनच हे महत्त्वाचे शहर ठरले आहे. पुढे वाचा...