Jump to content

साहिर लुधियानवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सहिर लुधियानवी या पानावरून पुनर्निर्देशित)


साहिर लुधियानवी

पूर्ण नावअब्दुल हयी साहिर
जन्म ८ मार्च, १९२१
लुधियाना, पंजाब
मृत्यू २५ ऑक्टोबर, १९८०
राष्ट्रीयत्व भारतीय

साहिर लुधियानवी तथा अब्दुल हयी[] (जन्म : लुधियाना- पंजाब, ८ मार्च १९२१; - मुंबई, २५ ऑक्टोबर १९८०) हे एक प्रसिद्ध कवी आणि हिंदी चित्रपट गीतकार होते.

संगीतकार एस.डी. बर्मन यांच्यासोबत साहिर यांची हिंदी चित्रपटसृष्टीतील वाटचाल सुरू झाली. पहिल्याच भेटीत सचिनदांना साहिर यांनी काही ओळी लिहून दिल्या. १९५१मध्ये आलेल्या 'नौजवान' चित्रपटात या गीताचा समावेश झाला आणि हे गीत प्रचंड लोकप्रिय ठरले. साहिर यांनी या प्रेमगीतात संपूर्ण निसर्ग उभा केला होता. या गीताने चित्रपटसृष्टीला साहिर यांच्या प्रतिभेची चुणूक दाखवून दिली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. हे गीत होते - 'ठंडी हवाएँ लहराके आयें, ऋतु है जवाँ, तुम हो यहाँ, कैसे भुलायें...'

प्रख्यात अभिनेते व दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या 'बाजी' या प्रथमच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटासाठी साहिर यांनी लिहिलेले 'तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले...' या गीताने लोकप्रियतेचे उच्चांक गाठले. अभिनेते देवानंद यांच्या म्हणण्यानुसार हे एक गाणे ऐकण्यासाठी त्यावेळी लोक जोधपूरच्या हवाई दलाच्या केंद्रावर तुफान गर्दी करायचे.

पश्चिम बंगालमधील 'बाऊल' परंपरेत कीर्तनाच्या स्वरूपात गायल्या जाणाऱ्या 'आन मिलो आन मिलो शाम सवेरे...' हे गाणे साहिर यांच्यातील प्रतिभावंत गीतकारावर शिक्कामोर्तब करणारे ठरले.

प्रेमातले गहिरेपण दाखवण्यासाठी साहिर त्यांच्या अनेक गाण्यांमध्ये निसर्गातील वेगवेगळ्या प्रतिमांचा अचूक वापर करायचे. 'ठंडी हवाएँ लहराके आयें...'नंतर देवानंद व कल्पना कार्तिक यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या 'चुप है धरती चुप है चाँद सितारे...' या गाण्यातही साहिर यांनी तोच भन्नाट प्रयोग केला होता.

गुरुदत्तचा 'प्यासा' हा चित्रपट साहिर-एसडी बर्मन जोडीच्या यशस्वी कारकिर्दीतील कळसाध्याय म्हणावा लागेल. 'प्यासा' चित्रपटाच्या पोस्टरवर या दोघांचीही नावे झळकलेली दिसायची. मात्र, 'प्यासा'चे यश हे फक्त त्यातील गीतरचनांमुळे आहे, संगीतामुळे नव्हे, असे साहिर यांचे म्हणणे होते. एसडी बर्मन यांच्या ते जिव्हारी लागले आणि ही जोडी तुटली. पण 'प्यासा'तील त्यांच्या कलाकृती अजरामर ठरल्या. त्यातील साहिर यांनी लिहिलेली सर्वच गीते अक्षरशः 'महान' असली तरी ये 'दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है...'ला तोड नाही.

सचिन बर्मन दूर गेल्यानंतर साहिर आणि ओ.पी. नय्यर ही जोडी जमली. या जोडीने 'नया दौर', 'तुमसा नही देखा' असे अनेक चित्रपट केले. १९५७मध्ये दिलीप कुमार व वैजयंती माला यांच्यावर चित्रित झालेल्या 'माँग के साथ तुम्हारा मैने माँग लिया संसार...' या गीतातील शब्दांनी तरुणाईला भारून टाकले होते. या शब्दांची जादू आजही संपलेली नाही.

संगीतकार खय्याम यांच्यासोबत साहिर यांनी चित्रपटसृष्टीला अनेक अजरामर गीते दिली. मात्र, 'कभी कभी' चित्रपटासाठी साहिर यांनी लिहिलेले 'मै पल दो पल का शायर...' हे शब्द अनेकांना हेलावून सोडले. साहिर यांनी त्यातून तमाम शायरांची व्यथाच मांडल्याचे बोलले गेले. या गाण्यासाठी त्यांना उत्कृष्ठ गीतकाराचा फिल्म फेअरचा पुरस्कार ही मिळाला.

हिंदी चित्रपटगीतांच्या क्षेत्रात साहिर यांनी दिलेल्या ऐतिहासिक योगदानामध्ये 'हम दोनो'ची ही गीते येतात. - 'अल्लाह तेरो नाम... कभी खुद पे कभी हालात पे... तसंच, मै जिंदगी का साथ निभाता चला गया...' अशी एकापेक्षा एक गाणी सांगता येतील. मात्र, 'अभीना जाओ छोड कर...' यातील आर्तता शब्दांत पकडणे फक्त साहिरनाच शक्य होते.

साहिर यांचे 'चित्रलेखा' चित्रपटातील गीत : संगीतकार रोशन यांनी 'यमन' रागात बसविलेल्या आणि मोहम्मद रफी यांनी गायकीने एका उंचीवर नेलेले - 'मन रे तू काहेना धीर धरे...' खूप गाजले.

आर. डी. बर्मन यांच्यासाठीही साहिर यांनी गीतलेखन केले. 'आ गले लग जा'मधील त्यांच्या 'तेरा मुझसे है पहले का नाता कोई...'तील शब्दांनी अनेकांना भुरळ घातली. मात्र, 'जोशिला'मधील 'किसका रस्ता देखे ऐ दिल ऐ हरजाई...' हे तात्त्विक शब्द वेड लावून जातात.

प्रसिद्ध कविता (नज़्में)

[संपादन]
  • अक़ायद वहम है मज़हब
  • अपने माज़ी के तसव्वुर
  • अब आए या न आए
  • अहलेदिल और भी हैं
  • आओ कि कोई ख़्वाब बुनें
  • उदास न हो
  • ऐ शरीफ़ इन्सानो
  • ख़ुद्दारियों के ख़ून को
  • खून अपना हो या पराया हो
  • ख़ून फिर ख़ून है
  • जब कभी उन के तवज्जो
  • ज़िन्दगी से उन्स है
  • जश्ने ग़ालिब
  • ताजमहल (ताज तेरे लिये इक मज़हर-ए-उल्फ़त ही सही)
  • तुम्हें उदास सा पाता हूँ
  • तेरी आवाज़ (रात सुनसान थी, बोझल थी फज़ा की साँसें)
  • नज़रे-कालिज (ऐ सरज़मीन-ए-पाक़ के यारां-ए-नेक नाम)
  • नाकामी (मैने हरचन्द गमे-इश्क को खोना चाहा,)
  • नूरजहाँ की मज़ार पर
  • भड़का रहे हैं आग
  • मादाम (आप बेवजह परेशान-सी क्यों हैं मादाम?)
  • मायूस तो हूं वायदे से तेरे
  • मेरे ख्वाबों के झरोकों
  • मेरे गीत (मेरे सरकश तराने सुन के दुनिया ये समझती है)
  • मेरे सरकश तराने सुन
  • मैं जिन्दा हूँ ये
  • मैंने जो गीत तेरे प्यार
  • मोहब्बत तर्क की मैंने
  • ये हुस्न तेरा ये इश्क़ मेरा
  • रद्द-ए-अमल (चंद कलियाँ निशात की चुनकर, मुद्दतों महवे यास रहता हूँ)
  • लब पे पाबन्दी नहीं
  • शाहकार (मुसव्विर मैं तेरा शाहकार वापस करने आया हूं)
  • शिकस्त (अपने सीने से लगाये हुये उम्मीद की लाश)
  • सज़ा का हाल सुनाये
  • सदियों से इन्सान
  • सनाख्वानएतक्दीस
  • सांझ की लाली सुलगसुलग
  • सोचता हूँ
  • हर चीज़ ज़माने की जहाँ
  • हवसनसीब नज़र को

प्रसिद्ध गीते

[संपादन]
  • अभीना जाओ छोडकर (चित्रपट : हम दोनों; गायक : मोहम्मद रफीआशा भोसले, संगीतकार : जयदेव)
  • आना है तो आ (चित्रपट : नया दौर, इ.स. १९५७), संगीतकार : ओ.पी. नय्यर)
  • अल्लाह तेरो नाम ईश्वर तेरो नाम (चित्रपट : हम दोनो इ.स. १९६१), संगीतकार : जयदेव)
  • ईश्वर अल्लाह तेरे नाम (चित्रपट : नया रास्ता इ.स. १९७०), संगीतकार : एन. दत्ता)
  • गरजत बरसत सावन आयो रे, लायो न संग में, हमरे बिछडे बलमवा (संगीतकार : रोशन, गायिका : कमल बारोत-सुधा मलहोत्रा-सुमन कल्याणपूर, चित्रपट : बरसात की रात)
  • चलो एक बार फिर से अजनबी बन जायें (चित्रपट : गुमराह इ.स. १९६३), संगीतकार : रवी)
  • ज़िंदगीभर नही भूलेंगी ये बरसातकी रात (चित्रपट : बरसात की रात, संगीतकार : रोशन)
  • जीवन के सफ़र में
  • जो वादा किया वो
  • तदबीर से बिगडी हुई
  • तुम अपना रंज ओ गम, अपनी परेशानी मुझे दे दो (चित्रपट : शगुुन, संगीतकार : खय्याम)
  • तोरा मन दर्पण कहलाएँ
  • निगाहेंं मिलानेको जी चाहता हैं
  • मन रे तु काहे न धीर धरे (चित्रपट : चित्रलेखा,१९६४; संगीतकार : रोशन)
  • मांग के साथ तुम्हारा
  • मैं ज़िंदगी का साथ निभाता चला गया
  • मैं पल दो पल का शायर हूं (कभी कभी १९७६), संगीतकार : खय्याम)
  • यह दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है (हिंदी चित्रपट : प्यासा इ.स. १९५७), संगीतकार : एस डी बर्मन)
  • रेशमी सलवार कुरता

साहिर लुधियानवी यांची हिंदी-उर्दू पुस्तके

[संपादन]
  • तल्ख़ियाँ (कविता संग्रह)
  • परछाईयाँ (ग़झल संग्रह)

साहिर लुधियानवी यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके

[संपादन]
  • साहिर लुधियानवी : द पीपल्स पोएट’ (इंग्रजी, लेखक अक्षय मनवानी)
  • साहिर लुधियानवी : मेरे गीत तुम्हारे (हिंदी, लेखक - सुनील भट्ट) : साहिरने ११५-१२० चित्रपटांसाठी सवासातशे ते साडेसातशे गीते लिहिली; या पुस्तकात ६९६ गीतांचे उल्लेख आहेत.
  • लोककवी साहिर लुधियानवी (मराठी अनुवादक प्रदीप चंपानेरकर; मूळ इंग्रजी लेखक - अक्षय मनवानी)
  • साहिर समग्र (हिंदी, लेखिका आशा प्रभात)

चित्रपट

[संपादन]

साहिर लुधियानवी यांच्या आयुष्यावर एक हिंदी चित्रपट निघतो आहॆ, जसमीत रीन त्याच्या दिग्दर्शिका असतील.

पुरस्कार आणि सन्मान

[संपादन]
  • पुण्यामध्ये ‘बलराज साहनी-साहिर लुधियानवी’ नावाचे कलाकारांना अणि कवींना उत्तेजन देणारे फाउंडेशन आहे.
  • पद्मश्री पुरस्कार
  • फिल्‍मफेअर पुरस्कार
  • रसिकप्रिया व्हिओलिनातर्फे पुण्यात ‘चलो इक बार फिरसे : जलसा-ए-साहिर’ नावाचा कार्यक्रम झाला होता. (जून २०१७)
  • पुण्याच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात २०-११-२०१७ रोजी आनंद देशमुख यांनी आयोजित केलेला ‘मैं हर एक पल का शायर’ या नावाचा साहिरच्या गाण्यांचा उत्सव झाला.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]