Jump to content

बलराज साहनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बलराज साहनी
दमयंती व बलराज
जन्म बलराज साहनी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय

बलराज साहनी (मे १, १९१३ - एप्रिल १३, १९७३) हे बॉलीवूड अभिनेते आणि पंजाबी भाषेत लिहिणारे लेखक होते.[]

जीवन

[संपादन]

बलराज साहनी यांचे खरे नाव युधिष्ठिर साहनी असून त्यांचा जन्म पंजाबच्या सरगोधा जिल्ह्यातील भेरा (आता पाकिस्तान) या गावी एका पंजाबी खत्री कुटुंबात झाला होता. लाहोर विद्यापीठातून इंग्लिश साहित्य व हिंदी विषयांत पदवी प्राप्त केल्यानंतर[] त्यांनी काही काळ रावळपिंडी येथे कौटुंबिक व्यवसायात व्यतीत केला.

पुढे १९३० साली ते पत्‍नी दमयंतीसह रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनात अध्यापनासाठी गेले.[] महात्मा गांधींसोबत काही काळ कामय केल्यानंतर ते १९३८ साली लंडन येथील बी.बी.सी.च्या हिंदी विभागात निवेदक म्हणून रुजू झाले. तेथे ते १९४३ पर्यंत होते.

'इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन' (आय.पी.टी.ए.) व 'पंजाबी कला केंद्राचे' ते संस्थापक सदस्य होते.[]

बलराज साहनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुण्यात ‘बलराज साहनी-सहिर लुधियानवी फाउंडेशन स्थापन झाले आहे. या फाउंडेशनतर्फे दर वर्षी एका अभिनेत्याला ‘बलराज साहनी पुरस्कार दिला जातो. २०१७ साली हा पुरस्कार विक्रम गोखले यांना मिळाला.

निवडक चित्रपट

[संपादन]

बलराज सहानी यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात इप्टा मधून केली आणि पुढे भारतीय चित्रपटसृष्टीत वास्तववादी अभिनयाचा पाया रचला. []

वर्षचित्रपटदिग्दर्शकसहकलाकारभूमिकानोंदी
१९४६इन्साफफाणी मुजुमदारस्वर्णलतापदार्पण (पहिली भूमिका)
१९४६धरती के लालके. ए. अब्बासतृप्ती मित्रानिरंजनबंगालच्या दुष्काळावर आधारित जागतिक स्तरावर गाजलेला चित्रपट
१९५३दो बिघा जमीनबिमल रॉयनिरूपा रॉयशंभू महतोविजेता: फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट; कान्स चित्रपट महोत्सवात 'इंटरनॅशनल प्राईज' प्राप्त []
१९६१काबुलीवालाहेमेन गुप्तासज्जन, सोनूअब्दुल रहमान खानरवींद्रनाथ टागोरांच्या कथेवर आधारित; अजरामर भूमिका
१९६५वक्तयश चोप्राराज कुमार, सुनील दत्त, शशी कपूरलाला केदारनाथ१९६५ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक []
१९६९दो रास्तेराज खोसलाराजेश खन्ना, मुमताजनवेंदु गुप्ताब्लॉकबस्टर चित्रपट; कौटुंबिक विषयावर आधारित []
१९६९एक फूल दो मालीदेवेंद्र गोएलसाधना, फिरोज खानकैलासनाथव्यावसायिक यश
१९७३हंस्ते जख्मचेतन आनंदनवीन निश्चल, प्रिया राजवंशएस.पी. पुरीमहत्त्वाचा चित्रपट
१९७३गरम हवाएम. एस. सथ्यूशौकत आझमी, फारुख शेखसलीम मिर्झाविजेता: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (सर्वोत्तम एकात्मता चित्रपट); शेवटची प्रमुख भूमिका []
१९७७अमानतशत्रुजित पॉलमनोज कुमार, साधनासुरेशमरणोत्तर प्रदर्शित (शेवटचा चित्रपट)

हे सुद्धा पहा

[संपादन]

प्रकाशित साहित्य

[संपादन]
  • पंजाबी नियतकालिक 'प्रीतलारी' मधून नियमित लेखन
  • मेरा पाकिस्तानी सफर
  • मेरी फिल्मी अमरकथा (आत्मचरित्र)
  • मेरा रूसी सफरनामा

पटकथा

[संपादन]
  • बाजी (१९५१)

पुरस्कार

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. एनसायक्लोपीडिक डिक्शनरी ऑफ पंजाबी लिटरेचर. लेखकः आर.पी. मल्होत्रा, कुलदीप अरोरा. प्रकाशकः ग्लोबल व्हिजन पब्लिशिंग हाऊस, २००३. ISBN 81-87746-51-3. पृ. ४३४
  2. http://www.tribuneindia.com/2001/20010902/spectrum/main2.htm
  3. "संग्रहित प्रत". 2012-07-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-27 रोजी पाहिले.
  4. http://cities.expressindia.com/fullstory.php?newsid=69006
  5. "Balraj Sahni Filmography". IMDb (इंग्रजी भाषेत). १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  6. "Balraj Sahni - Indian Actor and Author". Encyclopædia Britannica (इंग्रजी भाषेत). १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  7. "Box Office Results 1965". Box Office India (इंग्रजी भाषेत). १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  8. "Box Office Results 1969". Box Office India (इंग्रजी भाषेत). १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  9. "Garam Hawa (1973) - Classic Indian Cinema". World History Encyclopedia (इंग्रजी भाषेत). १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]