समरसता साहित्य परिषद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

समरसता साहित्य परिषद या संस्थेची महाराष्ट्र शाखा ही महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यात समरसता साहित्य संमेलन भरवते. मुंबईत या संस्थेचे ’समरसता साहित्य परिषद प्रकाशन’ आहे, त्याद्वारे समरसता विषयक पुस्तके प्रकाशित केली जातात. ‘सरस ते साहित्य, समरस तो साहित्यिक’ हे समरसता साहित्य परिषदेचे ब्रीदवाक्य आहे. समरसता हे एक जीवनमूल्य आहे असे सांगणारी ही संस्था आहे असे डॉ देवदात दाभोळकर म्हणतात. त्यांची प्रेरणा घेऊन या संस्थेची वाटचाल चालू आहे.

समरसता साहित्य परिषदेने आजवर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तीन दिवसांची समरसता साहित्य संमेलने भरवली आहेत. त्याशिवाय कविसंमेलने, परिसंवाद, व्याख्याने, कार्यशाळा, तसेच विद्यार्थी केंद्रबिंदू धरून त्यांच्या साहित्यिक जाणिवांना हळुवार साद घातली आणि बघता बघता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा प्रतिसाद्मिळू लागला. विद्यार्थ्यांच्यातील सुप्त साहित्यिक गुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही संस्था ‘कवितेकडून कवितेकडे’ हा उपक्रम चालवते. कवितेच्या स्पर्धा ठिकठिकाणी होतातच पण २०१४ सालापासून काव्य सादरीकरणाच्या सांघिक स्पर्धा होऊ लागल्या आहेत.

’समरसता साहित्य परिषद प्रकाशन, मुंबई’ने प्रसिद्ध केलेली पुस्तके[संपादन]

 • समरसता : एक साहित्य मूल्य; संपादक श्याम अत्रे व रमेश पतंगे. प्रकाशन वर्ष १९९९.
 • लोकसंस्कृती व समरसता; संपादक श्याम अत्रे व रमेश पतंगे. प्रकाशन वर्ष २०००.
 • स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्य व समरसता; संपादक श्याम अत्रे व रमेश पतंगे. प्रकाशन वर्ष २००१.
 • अनुवादित साहित्य आणि समरसता; संपादक रमेश पतंगे. प्रकाशन वर्ष २००२.
 • स्त्री साहित्य आणि समरसता; संपादक श्यामा घोणसे प्रकाशन वर्ष २००३.
 • युवा साहित्य आणि समरसता; संपादक श्याम अत्रे. प्रकाशन वर्ष २००५

समरसता या विषयावर पुस्तके प्रकाशित करणाऱ्या अन्य प्रकाशन संस्था आणि त्यांची पुस्तके[संपादन]

 • समरसता मंच प्रतिष्ठान प्रकाशन
  • नामांतर संघ आणि समरसता मंच. संपादक रमेश पतंगे. प्रकाशन वर्ष १९९४
 • सामाजिक समरसता प्रतिष्ठान, मुंबई
  • मंडल आयोग. लेखक भिकूजी इदाते. प्रकाशन वर्ष १९९०
  • समरसता दर्शन. लेखक गिरीश प्रभुणे. प्रकाशन वर्ष १९९२
  • नामांतर संघ आणि समरसता मंच. संपादक रमेश पतंगे. प्रकाशन वर्ष १९९४
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारयात्रा. लेखक श्याम अत्रे. प्रकाशन वर्ष १९९८.
 • सामाजिक समरसता प्रकाशन
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार यात्रा, लेखक श्याम अत्रे. प्रकाशन वर्ष १९९८.
 • सामाजिक समरसता व्यासपीठ
  • राजर्षी शाहूमहाराज जीवन व कार्य; संपादक रमेश पतंगे. प्रकाशन वर्ष २००३
  • नामांतर संघ आणि समरसता मंच. संपादक रमेश पतंगे. प्रकाशन वर्ष १९९४
 • भारतीय विचार साधना प्रकाशन, पुणे
  • सामाजिक समरसता डॉ.हेडगेवार आणि डॉ.आंबेडकर. लेखक रमेश पतंगे.प्रकाशन वर्ष १९९४.
  • सामाजिक समरसता मंच - व्यक्ती आणि वाटचाल. लेखक रमेश महाजन. प्रकाशन वर्ष २००५.
 • हिंदुस्थान प्रकाशन सोसायटी, मुंबई ५६
  • विवेक व्यासपीठ व सामाजिक समरसता मंच. लेखक ? प्रकाशन वर्ष ?
 • साप्तहिक विवेक, मुंबई
  • जेव्हा गुलाम माणूस होतो. लेखक रमेश पतंगे. प्रकाशन वर्ष २००६
  • कृतिरूप समरसता लेखक रमेश पतंगे. प्रकाशन वर्ष २००७.
 • राष्ट्र जागरण अभियान प्रकाशन
  • संघ आणि सामाजिक समरसता. संपादन - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. प्रकाशन वर्ष २०००.
 • अन्य प्रकाशन संस्था
  • समरसता दर्शन. लेखक प्रभुणे