मुझफ्फर हुसेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. मुझफ्फर हुसेन (२० मार्च, १९४५:बिजोलिया, राजस्थान, भारत - १३ फेब्रुवारी, २०१८)) हे भारतीय पत्रकार, विचारवंत आणि लेखक होते. त्यांनी उज्जैनच्या विक्रम विद्यापीठातून पदवी घेतल्यावर, मुंबईतून एल्‌एल.बी. ही कायद्याची पदवी घेतली. या परीक्षेत ते पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. पत्रकारितेचे शिक्षणही मुंबईत घेतले. सुरुवातीला त्यांनी औरंगाबाद येथील देवगिरी समाचार या वृत्तपत्रात सल्लागार संपादक म्हणून काम केले. ते देश-विदेशांतील ४२ दैनिकांतून आणि साप्ताहिकांतून स्तंभलेखन करीत असत.

मुझफ्फर हुसेन यांना अरबी, इंग्लिश, उर्दू, गुजराती, फारसी, मराठी आणि हिंदी या भाषा अवगत होत्या.

पुस्तके[संपादन]

मुझफ्फर हुसेन यांनी इंग्लिश, गुजराती, मराठी आणि हिंदी या भाषांतून ११हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.

  • अल्पसंख्याक वाद : एक धोका
  • इस्लाम आणि शाकाहार
  • इस्लाम धर्मातील कुटुंब नियोजन
  • मुस्लिम मानस
  • समान नागरी कायदा

सन्मान आणि पुरस्कार[संपादन]

  • प्रतिष्ठित संस्था आणि विविध विद्यापीठांतून वक्ता म्हणून आमंत्रित
  • इ.स. २००२मध्ये पद्मश्री
  • राष्ट्रीय स्तरावरील १४हून अधिक पुरस्कार.
  • २०१४ साली महाराष्ट्र सरकारने त्यांना पत्रकारितासाठीचा लोकमान्य टिळक पुरस्कार आणि जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला.