अशोक कामत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. अशोक प्रभाकर कामत (जन्म : १० जानेवारी. इ.स. १९४२) हे एक हिंदी-मराठी साहित्यिक आणि संतवाङ्‌मयाचे चिकित्सक अभ्यासक आहेत. आयुष्यात भेटलेल्या मोठ्या लोकांच्या सहवासामुळे त्यांना ग्रंथसंग्रह, वाचन व लेखन या चांगल्या सवयी जडल्या, असे ते सांगतात. त्यांचा वैयक्तिक ग्रंथसंग्रह १२ हजार पुस्तकांचा असून तो सर्वांसाठी खुला आहे.[१][२]

प्रा. अशोक कामत ह्यांनी शाहू महाविद्यालयात व गरवारे कॉलेजमध्ये अध्यापनाचे काम केले. त्यांच्या प्रयत्‍नाने पुणे विद्यापीठात नामदेव अध्यासन उभे झाले. (ते सध्या २०१७ साली बंद पडले आहे!)

त्यांनी स्थापन केलेल्या गुरुकुल प्रतिष्ठानाने संत साहित्याचे ३५०हून अधिक प्रकल्प पूर्ण केले आहेत. ही संस्था विद्यार्थ्यांचे संशोधन प्रसिद्ध करते.

अशोक कामत यांची शैक्षणिक कारकीर्द[संपादन]

  • १९६० – राष्ट्रभाषा पंडित
  • १९६२ – बी.ए. (हिंदी/ मराठी/मानसशास्त्र) (स.प. महाविद्यालय, पुणे विद्यापीठ)
  • १९६४ – एम्.ए. (हिंदी/मराठी), पुणे विद्यापीठ (पुणे विद्यापीठात सर्वप्रथम)
  • १९७४ – हिंदी विषयात पीएच्.डी. पुणे विद्यापीठ (प्रकाशित प्रबंध – ‘महाराष्ट्र के नाथपंथीय कवियों का हिंदी काव्य’)
  • १९८४ – मराठी विषय घेऊन पीएच्.डी. पुणे विद्यापीठ (प्रकाशित प्रबंध – ‘संत नामदेवांचे जीवन आणि हिंदी-मराठी काव्य यांचा पुनर्विचार’)
  • १९६५-१९७७ : शाहू महाविद्यालयात अध्यापन
  • १९७७-१९८५ : आबासाहेब गरवारे महाविद्यालयात अध्यापन
  • १९८५-२००७ : पुणे विद्यापीठात संत नामदेव अध्यासनाच्या संत अध्ययन व संशोधन केंद्राचे प्राध्यापक व प्रमुख
  • १९७३पासून पदव्युत्तर एम्.ए. वर्गांचे अध्यापन
  • १९७९पासून पुणे विद्यापीठात हिंदी भाषेच्या पीएच्.डी.करिता मार्गदर्शन
  • १९८५पासून पुणे विद्यापीठात मराठी विषयाच्या पीएच्.डी.करिता मार्गदर्शन
  • मार्गदर्शन केलेल्या चोपन्‍न विद्यार्थ्यांचे पीएच्.डी प्रकल्प पूर्ण
  • मार्गदर्शन केलेल्या सोळा विद्यार्थ्यांचे एम.फिल. प्रकल्प पूर्ण
  • संत नामदेव अध्यासनात दरवर्षी मार्गदर्शन केलेल्या किमान सहा याप्रमाणे विद्यार्थ्यांचे एकूण एकशे चाळीस शोधप्रकल्प पूर्ण (लोकाश्रय मिळवून हे काम केले).
  • विद्यार्थ्यांकडून संत साहित्यविषयक सुमारे साडेतीनशे पुस्तके तयार झाली आहेत. त्यांतली काही प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.

अन्य शैक्षणिक, साहित्यिक नियुक्त्या आणि कार्य[संपादन]

  • सदस्य, हिंदी पाठ्यपुस्तक समिती, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ, १९७४-१९८६ (सुमारे ८० पाठ्यपुस्तकांच्या संपादनात सहभाग)
  • महाराष्ट्र राज्याच्या उत्कृष्ट ग्रंथ उत्तेजन समितीचे सदस्यत्व (१९७५-१९७८)
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीचे सदस्यत्व (१९७६-१९७९)
  • महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या संपादन समितीचे सदस्यत्व (१९७६-१९७९)
  • मराठी साहित्य परिषद परीक्षा संचालक, १९७६-१९८०
  • भारतीय श्रीरामकोश मंडळ, प्रथम खंड संपादन – सहभाग, १९७८
  • कार्यकारिणी सदस्य, मराठी बालकुमार साहित्य संमेलन, १९७८-१९८१
  • सदस्य, विद्या समिती, हिंदी माध्यमिक विद्यालय, पुणे १९८०-१९९२
  • सदस्य, मराठी परीक्षा समिती, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, १९८४-१९८७
  • अध्यक्ष, भारतीय विद्याभवन हरिकथा कीर्तन महाविद्यालय समिती, आळंदी, १९८७-१९८९
  • सदस्य, नियामक मंडळ, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, १९८०पासून २००१पर्यंत/अध्यक्ष, परीक्षा समिती १९८०पासून २००६पर्यंत/अध्यक्ष, विद्यासमिती – शिक्षणसमिती २००१पासून पुढे/कार्यकारी विश्वस्त २००८पासून पुढे.

अशोक कामत यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • आद्य महाराष्ट्रीय हिंदी कवी आचार्य दामोदर पंडित और उनकी कविता (संपादित, हिंदी)
  • ईश्वरनिष्ठांची मांदियाळी
  • ऐसी हे समर्थ पदवी
  • कबीर (हिंदी, सहलेखक - पारसनाथ तिवारी)
  • कामतांच्या निवडक ७५ व्याख्यानांच्या पुस्तिका
  • श्री ब्रह्मचैतन्यय गोंदवलेकर महाराज : व्यक्ति आणि वाङ्मय
  • जीवनाची स्मरणयात्रा (की माझी स्मरणयात्रा?) - (आत्मचरित्र)
  • नयी कहानी में युवा समस्या (हिंदी)
  • महाराष्ट्र के नाथपंथीय कवियों का हिंदी काव्य (हिंदी)
  • पं माधवराव सप्रे : व्यक्तित्व एवं कृतित्व (हिंदी)
  • मीरा विषयक हिंदी, मराठी सर्जनात्मक साहित्य का तुलनात्मक अनुशीलन (हिंदी)
  • य. गो. जोशी : एक अभ्यास (हे पुस्तक लिहिणारे अशोक कामत वेगळे आहेत?)
  • संतसाहित्य : काही अनुबंध
  • स्वातंत्र्योत्तर हिंदी और मराठी बालसाहित्य : एक तुलनात्मक अध्ययन
  • हिंदी एकांकी-साहित्य में नारी-समस्या का चित्रण (हिंदी))
  • हिंदी के आदिकालीन साहित्य में महाराष्ट्र का योगदान (हिंदी)
  • हिंदी तथा मराठी में चरितपरक (बालसाहित्य, हिंदी)
  • हिंदी मराठी में यात्रासाहित्य : एक अनुशीलन (१९७५ तक), (हिंदी) { यात्रासाहित्य=प्रवासवर्णन साहित्य)

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

  • महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेतर्फे साहित्य व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात येणारा पुरस्कार (२९-१०-२०१४) : पाच हजार रुपये रोख, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा गजानन माधव मुक्तिबोध पुरस्कार (१७-१-२०१८). एकावन्न हजार रुपये रोख, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • अशोक कामत हे हिंगोली तालुक्यातल्या नर्सी नामदेव या गावी २३-२५ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत भरलेल्या संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
  • उत्तर प्रदेश हिंदी संस्थानचा 'सौहार्द सन्मान' हा मानाचा पुरस्कार (२४ ऑक्टोबर २०१८). दोन लाख रुपये रोख, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. अशोक कामत यांनी हिंदी विषयात दिलेल्या साहित्यिक योगदानानिमित्त त्यांचा लखनौ येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

(अपूर्ण)

गौरवग्रंथ[संपादन]

स्नेहानुबंध, संपादक - सौ.शुभदा वर्तक, प्रा.रवींद्र कोठावदे., प्रकाशन - गुरुकुल प्रतिष्ठान

संदर्भ[संपादन]

  1. ^ "डॉ. अशोक कामत यांना पुरस्कार जाहीर". Maharashtra Times. 26 मे 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "राष्ट्राला शिवराय व गुरू गोबिंद सिंह यांची गरज : अशोक कामत". www.mahamtb.com. 26 मे 2020 रोजी पाहिले.