भानू काळे
भानू काळे (जन्म : इ.स. १९५३ - ) हे एक मराठी लेखक असून अंतर्नाद या जगातील आशावादी घटनांची दखल घेणाऱ्या वैचारिक मराठी मासिकाचे संपादक आहेत.
भानू काळे हे IofC (Initiatives of Change) या संघटनेशी वयाच्या सोळाव्या वर्षी जोडले गेले. इ.स. १९७५च्या सुमारास त्यांनी पत्रकारिता सुरू केली. राजमोहन गांधी यांच्या हिंमत या इंग्लिश साप्ताहिकात त्यांनी लेखन केले आहे. त्यानंतर भानू काळे यांनी ऑक्टोबर २०१०मध्ये Change for Better या इंग्लिश त्रैमासिकाची स्थापना करून ते त्याचे संपादक झाले. या त्रैमासिकात देशातील विधायक बदलांसंबंधीच्या बातम्या असत.
भानू काळे हे IofC तर्फे राबवल्या जाणाऱ्या Let's Make a Difference' (LMAD) या उपक्रमाचे सल्लागार आहेत.
भानू काळे हे पत्नी वर्षा काळे आणि कन्या प्रियंका यांच्यासमवेत पुण्यात राहतात.
भानू काळे यांच्या अंतर्नादची अखेर[संपादन]
माणूस, सत्यकथा, सोबत या मसिकांनंतर साहित्याची परंपरा राबवून सजग वाचकांपर्यंत पोहोचलेले अंतर्नाद मासिक २२ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर २०१७ सालच्या दिवाळीनंतर बंद पडले असण्याची शक्यता आहे.
पुस्तके[संपादन]
- अंगारवाटा ... शोध शरद जोशींचा (चरित्र)
- अजुनी चालतोची वाट (रावसाहेब शिंदे यांचे चरित्र)
- अंतरीचे धावे (वैचारिक)
- कॉम्रेड (कादंबरी)
- तिसरी चांदणी (कादंबरी)
- बदलता भारत (वैचारिक)
- रंग याचा वेगळा ... दत्तप्रसाद दाभोळकर : लेखन आणि जीवन (व्यक्तिचित्रण - संपादित पुस्तक)