सदस्य चर्चा:Shreyas190
स्वागत | Shreyas190, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Shreyas190, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,५५८ लेख आहे व १४८ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
सुषमा अंधारे
[संपादन]नमस्कार, आपण जो सुषमा अंधारे लेखात बदल करत आहात त्यासंबंधीचा दुवा देऊ शकाल का.-संतोष गोरे ( 💬 )
सुषमा अंधारे या शिवसेनेत आहेत आणि शिवसेनेच अंतिम उद्दिष्ट हिंदुत्व रूजविणे हे आहे. Shreyas190 (चर्चा) १९:२१, ३० ऑक्टोबर २०२२ (IST)
- हा लेख सुषमा अंधारे यांच्यावर आहे. गेल्या वीस पेक्षा जास्त वर्षांपासून त्या स्वतःला पुरोगामी स्त्रीवादी म्हणवून घेतात आणि ही त्यांची ओळख आहे. सेनेत असल्याने त्या पक्षाशी एकनिष्ठ आहेत असे आपण मान्य करुत. परंतु याचा अर्थ त्यांची स्वतःची ओळख नाही असे होते का? विकिपीडियावर आपण जो मुख्य बदल करत आहेत, असा बदल करताना संदर्भ द्यावा लागतो. आपल्याजवळ त्यासंबंधीचा दुवा असल्यास जोडणे किंवा मला संपर्क करणे. आपण तो जोडूया. तूर्तास आपण मनाने बदल करू नये.-संतोष गोरे ( 💬 ) १९:४३, ३० ऑक्टोबर २०२२ (IST)
सुषमा अंधारेंचा हिंदुत्ववादी असा वेगळा उल्लेख करा अथवा करू नका पण त्या हिंदुत्ववाद झुगारून सेनेत गेल्या आहेत हे म्हणणे हास्यास्पद आहे. आणि जर त्यांचा खरोखर हिंदुत्ववादाला विरोध असेल तर त्या पक्षाशी एकनिष्ठ नाहीत. अशी एकनिष्ठ नसणारी व्यक्ती स्वतःच्या फायद्याकरीता जनतेला फसवत आहे. यावर विचार करावा. Shreyas190 (चर्चा) २०:१३, ३० ऑक्टोबर २०२२ (IST)
- कृपया नोंद घ्यावी की त्या हिंदुत्ववादी नाहीत किंवा हिंदू विरोधी आहेत असे या लेखात कुठे लिहिलेले आहे? एक व्यक्ती स्त्रीवादी अभ्यासक, हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी तसेच इतर तत्ववादी असू शकत नाही का? तुम्ही त्यांची स्त्रीवादी ही ओळख विनाकारण खोडत आहात हे लक्षात घ्यावे. पुढील बातमी ही १७ ऑक्टोबर २०२२ ची आहे, प्रकाश आंबेडकरांनी मला ओळखायला, मी काय फडवणीस किंवा RSS पदाधिकारी आहे का; सुषमा अंधारेंचा पलटवार यात त्या स्वतःला वंचित म्हणवून घेत आहेत. लक्षात घ्या त्या वंचित बहुजन आघाडीत नसून शिवसेनेत आहेत. सबब, एखाद्या व्यक्तीची तत्वे ही त्याची स्वतःची ओळख असते.-संतोष गोरे ( 💬 ) २०:३८, ३० ऑक्टोबर २०२२ (IST)
आणखी एक गोष्ट, माझि विरोध त्यांना स्त्रीवादी अभ्यासक म्हणून नाकारण्याचा नाही तर पुरोगामी म्हणून नाकारण्यात आहे. Shreyas190 (चर्चा) २१:२१, ३० ऑक्टोबर २०२२ (IST)
मान्य आहे की त्या स्त्रीवादी अभ्यासक आहेत आणि जरी त्यांची ही ओळख मी खोडणार नाही तरी त्यांचा हिंदुत्ववादी असा वेगळा उल्लेख करावा. संदर्भ म्हणून त्यांचे दसरा मेळाव्याचे भाषण पहावे. आणि जर त्या हिंदुत्ववादी नसतील तर त्यांनी त्यांच्या एका भाषणात मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम असा रामाचा उल्लेख का केला ? Shreyas190 (चर्चा) २१:२१, ३० ऑक्टोबर २०२२ (IST)
पळवाटा काढून, ब्लाॅक करून तुम्ही जनतेची मते मिटवू शकत नाही. आमचा सत्याचा लढा चालू राहील. Shreyas190 (चर्चा) १०:५२, ३१ ऑक्टोबर २०२२ (IST)
- @Shreyas190: आपणास कुणी प्रतिबंधित केलेले नाही. कृपया थेट आरोप करण्या ऐवजी, चर्चा करावी. कोणत्या पानावर संपादन करण्यास अडचण येत आहे? संतोष गोरे ( 💬 ) ०७:३१, १ नोव्हेंबर २०२२ (IST)
- @Shreyas190: तुम्ही सातत्याने या लेखामध्ये पुरोगामी शब्द काढून "हिंदुत्ववादी" शब्द जोडत असतात. यासाठी तुम्ही कोणताही ठोस संदर्भ दिला नाही, केवळ एका भाषणाचा उल्लेख करीत आहात, जो की त्यांना हिंदुत्ववादी ठरवण्यास अपात्र आहे. यापूर्वीही तुम्हाला प्रचालकांद्वारे सूचना दिली गेली होती, मात्र तुम्ही नंतरही तशीच संपादने सुरू ठेवले. यापुढे लेखात हिंदुत्ववादी हा शब्द जोडू नये, ही सक्त ताकीद मी तुम्हाला देत आहे. --संदेश हिवाळेचर्चा ११:१९, १० नोव्हेंबर २०२२ (IST)
वास्तविक परिस्थिती माहित असून सुद्धा तुम्ही संबंधित बदलास विरोध करीत आहात. याचे दोन अर्थ निघतात एक तर तुम्ही अज्ञानी आहात किंवा तुम्ही कोणाच्या तरी दबावाखाली आहात. हे मला माहीत नाही. पण मी तुम्हाला ' हिंदुत्ववादी ' हा शब्द सुषमा अंधारेंना कसा योग्य ठरतो याची यथार्थता समजावून सांगण्यात असमर्थ ठरलो याची मला खंत वाटत आहे. तथापि आमचा सत्य लोकांसमोर आणण्याचा लढा इतर मार्गांनी चालू राहील. या ठिकाणी मी आता संपादन करू इच्छित नाही. येथे तुम्ही तुमची मनमर्जी करण्यास मुक्त आहात. Shreyas190 (चर्चा) १५:४७, १० नोव्हेंबर २०२२ (IST)
- तुम्हाला सुषमा अंधारे 'हिंदुत्ववादी' वाटतात, हे केवळ तुमचे व्यक्तिगत मत आहे. त्याला दुजोरा देण्यास किंवा त्याला उचीत संदर्भ पुरवण्यास तुम्ही असमर्थ आहात. --संदेश हिवाळेचर्चा १६:३६, १० नोव्हेंबर २०२२ (IST)
जे जे आंबेडकरवादी आहेत, त्यांना नक्कीच पटेल की त्या हिंदुत्ववादी आहेत. तुमची विचारसरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांशी निगडित असल्याने तुम्हाला ते विरुद्ध वाटणार. Shreyas190 (चर्चा) १६:५२, १० नोव्हेंबर २०२२ (IST)
माझ्याकडे एक चित्रफित आहे, ज्यामध्ये त्यांनी हिंदुत्ववादाचे समर्थन केलेले आहे. त्यावरून त्या हिंदुत्ववादी आहेत असे समजू शकाल. परंतु ही चित्रफित कशी पाठवू याबाबत मला फारशी तांत्रिक माहीती नाही. Shreyas190 (चर्चा) १७:२३, १० नोव्हेंबर २०२२ (IST)
Sushama Andhare on Hindutva ही चित्रफित youtube या समाजमाध्यमावर पहावा. Shreyas190 (चर्चा) १८:५७, १० नोव्हेंबर २०२२ (IST)
- @अभय नातू, संतोष गोरे, Tiven2240, आणि Usernamekiran: कृपया नोंद घ्यावी की सदर सदस्य माझ्यावर व्यक्तिगत हल्ले करत आहे, आणि या सदस्यावर शक्य ती कठोर कारवाई करावी ही विनंती. सदर सदस्याला दोन प्रचालकांनी संदर्भहीन मुद्दा/शब्द लेखात समाविष्ट केल्याबद्दल उचित संदर्भ मागितला असता ते संदर्भ तर देत नाहीत मात्र आपले व्यक्तिगत मत रेटत आहेत. आणि आता तर त्यांनी व्यक्तिगत हल्ले करायला सुरुवात केली आहे.
- आज सूचना देऊनही पुन्हा त्यांनी अनुचित कृती केली. कार्यवाही व्हायला हवी. --संदेश हिवाळेचर्चा १९:०९, १० नोव्हेंबर २०२२ (IST)
- @Sandesh9822 आणि Shreyas190:
- नोंद घेतली.
- १. यूट्यूब, ब्लॉग किंवा इतर समाजमाध्यमे ग्राह्य संदर्भ नाहीत.
- २. व्यक्तिगत मते लेखात घालू नयेत.
- अभय नातू (चर्चा) २३:४६, १० नोव्हेंबर २०२२ (IST)
https://divya-m.in/fwfBdKsMGub Shreyas190 (चर्चा) १५:४८, ११ नोव्हेंबर २०२२ (IST)
वरील संदर्भ पाहावा. तुम्हाला संदर्भ ग्राह्य वाटत नाही म्हणून तो ग्राह्य होण्यास पात्र आहे असे नाही. इतर सर्वांना तो ग्राह्य वाटेल Shreyas190 (चर्चा) १५:४९, ११ नोव्हेंबर २०२२ (IST)
तुम्ही सर्व योग्य बदल करण्यास मनाई करीत आहात. हे अत्यंत चुकीचे आहे. Shreyas190 (चर्चा) १६:३५, ११ नोव्हेंबर २०२२ (IST)
विकिपीडिया आशियाई महिना २०२२
[संपादन]प्रिय विकिसदस्य,
विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.
प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊ शकता तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.
जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संदेश हिवाळे, Tiven2240 किंवा संतोष गोरे यांना संपर्क करावा.
धन्यवाद.
आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२२
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.