सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101/जुनी चर्चा २

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लोगो[संपादन]

यूट्यूब लेखातील माहितीचौकट पाहिली. तिथे मराठी विकिपीडियावरील प्रताधिकारित संचिका किंवा विकिकॉमन्सातील संचिका नोंदवावी लागेल. सध्या दोन्ही ठिकाणी ती उपलब्ध नाही. इंग्लिश विकिपीडियावर ती प्रताधिकारित संचिका वर्गात, 'उचित वापर' समर्थन-टॅग लावून तात्पुरती वापरली आहे, असे दिसते.

दिनविशेष - हिंदू धर्म[संपादन]

दिनविशेष आणि हिंदू धर्म हे दोन्ही प्रकल्प एकत्र येणे सयुक्तीक आहे किंबहुना आवश्यकही आहे. माझा त्यासाठी पूर्ण पाठिंबा आहे. दिनविशेष साठी ऑटॉमेटेड पंचांगाचा वापर केल्यास ते जास्त उपयुक्त राहील असे वाटते. यामुळे तिथे नोंदवत रहाव्या लागणार नाहीत. त्या पानावर आपोआप पॉप्युलेट व्हायला हव्यात. सणवार आणि व्रते मात्र (कदाचित) नोंदवावे लागतील असे वाटते. (हे ऑटॉमेटेड पंचाग प्रत्यक्षात कसे आणायचे, याचे काम तुम्हालाच चटकन जमेल असे वाटते! ;) )

सद्य स्थितीत मी तिथींवर काही काम करत नाहीये. सध्या फक्त हा हिंदू धर्म प्रकल्प कसा चालवावा यावर विचार करतो आहे. तुमच्या सर्व सूचना, सुचवण्यांचे स्वागत आहे. कलोअ निनाद ०२:४९, ३ ऑगस्ट २०११ (UTC)

वेगवान संपादने[संपादन]

वेगवान संपादने साधण्यासाठी तुम्ही काय युक्त्या वापरता? इंग्रजी किंवा इतर विकींवर काय वापरले जाते? तसेच तुम्ही सांगकामे वापरता का? असल्यास कसे? निनाद ०२:५३, ३ ऑगस्ट २०११ (UTC)


राहुलजी, आपले मराठी भाषेसाठी चालेले प्रयन्त खरोखरच वाखण्याजोगे आहे, आणि तुम्ही त्याला देत असलेली आधुनिक तंत्राद्यानाची जोड हि काळाची गरज आहे. मी आपली संपादने आणि चर्चा वाचल्या आहेत.मी नुकताच सदस्य म्हणून मराठी विकिशी जोडलो गेलो आहे. वेगवान संपादने हा मथळा मला उमगला नाही आहे,तरी त्याची सहनिषा वाव्हि आशी इच्छा. --सागर-मराठी सेवक ११:२६, ३ ऑगस्ट २०११ (UTC)

आपला संदेश वाचला.[संपादन]

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०६:१२, ३ ऑगस्ट २०११ (UTC)

साचे छान काम करतात[संपादन]

माहितीगार नमस्कार

आपण विदागार साचे पुनर्स्थापित केल्याचे पहिले. साचे छान काम करतात आहेत. काही शंका/विनंती

आपण दिनांका नुसार विदागार स्मपूर्ण सांभाळावे. आपण त्याचे विश्लेषण करून इतर उपपाने केली आहेत तेपण उत्तम झाले तरी दिनांका नुसार पण जशीच्या तशी चावडीची एक प्रत असावीच असे वाटते.

साच्यात संपादन हा दुवा दाखवा/लपवा जवळ होतो आणि चुकून तिचकवल्या जातो त्यास जर सं. अशा स्वरुपात दूर ठेवला कर कसे ? कारण साचा सम्पादन हा दुवा फारच थोड्या लोकांना (जाणकारांनला) लागते.

धन्यवाद राहुल देशमुख ०५:३३, ३ ऑगस्ट २०११ (UTC)

ह्म् ,सध्याच्या साचांनी काम करून पुरेसे नाही, बॉट्स ना काम काम करता येण्याच्या दृष्टीने ते ऊपयूक्त ठरतील अशा सूधारणा करावयास हव्यात. मध्यवर्तीचावडीवरील सध्याचा मूख्य चर्चा विषय अजून एक दहा दिवसा नंतर चावडी/प्रगतीवर नेण्याचा मनोदय आहे त्या नंतर मध्यवर्ती चावडीवर चावडी/व्यवस्थापनातील प्रस्तावित सूधारणा व्यापक सहमती करिता पून्हा एकदा मांडू .नवीन चावडी/व्यवस्थापन वर वेगवेगळ्या सूचनांचे संकलन करून ठेवावे.
जो पर्यंत लोक त्यांचे मुद्दे मांडण्याकरिता सूयोग्य चावड्यांची निवड करावयास हवी. तरच बॉट संचलीत अर्काईव्हींगचा व्यवस्थीत फायदा होइल, दुसरे सहाय्य पाने बनवणार्‍यांचे आणि संकेतांबद्दल झालेल्या सहमती नोंदवून ठेवणार्‍यांचे हाल कमी होतील.
माहितगार ०९:३१, ३ ऑगस्ट २०११ (UTC)

काहीच् अनुभव नही[संपादन]

मला येथील काहीच् अनुभव नही.पन आपण म्हणता तर कोणती मदत हवी ती करतो.

  • Makyaj १३:५७, ३ ऑगस्ट २०११ (UTC)

I am sorry! i have to write this in english as i am not well acquented with the script here.What is dinvishesh? what way i would be helpful to you? to express myself properly, i chose english.Would i be able to do the work you are allotting to me? i am afraid i would not be of much use to u. Makyaj १४:०४, ३ ऑगस्ट २०११ (UTC)

  • I am again sorry.i have to take help of english to express myself in a better way.can u suggest certain articles which will help me in coming out of the situation. i really want to work here.the language here appears to be very pure and i am yet to get femilear with it.pl. help.

Further, how could know i have made certain additions here? I didnot add aly sort of list. i made only certain corrections there.

  • Makyaj १४:१७, ३ ऑगस्ट २०११ (UTC)

i can read very well in marathi but typing it here, i am facing problems. pl do write in marathi.and for some days, pl allow me to communicate in english. may i further know which designation u r holding here?are u from the supervisory cadre here? Makyaj १४:२४, ३ ऑगस्ट २०११ (UTC) see u 2mrow.i am constrained to close down. Makyaj १४:३०, ३ ऑगस्ट २०११ (UTC)


कोडे कसे सोडवायचे ?[संपादन]

संकल्पचे म्हणणे बरोबर आहे. पण तरी प्रकल्प सुरुकार्ण्यासाठी किमान स्वरुपाची विशिष्ट विषयावर रुची ठेवणारी काही मंडळी (डेडीकेटेड) असावी म्हणजे ते प्रकल्पास आकार देऊ शकतील. काही जुने आणि काही नवे अशी सांगड घातली तर दुग्ध शर्करा. आता हिंदू धर्म प्रकल्पासाठी ४ जुने आणि ४ नवीन अशी ८ लोक केवळ दिनविशेष ह्या कामा साठी सहयोग करायला आज तयार झाली आहे. तेव्हा प्रकल्प पहिले कि सदस्य पहिले हे कोडे कसे सोडवायचे ? मला वाटते मूळ नियमा प्रमाणे किमान ४ सदस्य तरी असावेत. अन्यथा आपणास भविष्यात आजारी प्रकल्पांचा वर्ग निर्माण करावा लागेल. राहुल देशमुख १६:४१, ३ ऑगस्ट २०११ (UTC)


तुमच्या इतरत्रच्या चर्चेत दखल दिल्याबद्दल क्षमस्व. तुम्ही निमंत्रण देऊन लोकांनी प्रकल्पात रस घेतला तर आनंदाचीच गोष्ट आहे. सोबत स्वत:हून सामिल होऊ इच्छिणार्‍या मंडळींना असे काही काम किंवा प्रकल्प चालू आहे हे कळण्याचा मार्ग काय? याकरिता इंग्रजी विकिपीडियामध्ये संबधीत लेखांच्या चर्चा पानांवर तो लेख कोणत्या प्रकल्पांतर्गत येतो त्याचा साचा लावण्याचा प्रघात आहे.त्यामुळे ज्यांना रस आहे ती मंडळी संबधीत प्रकल्प पानावर आपोआप सहजतेने पोहोचू शकतात.काही अनाकलनीय कारणामुळे मराठी विकिपीडियन्सनी आतापर्यंत तरी चर्चा पानांवर लावण्याकरीता लागणार्‍या साचांवर काम करणे आणि असे साचे चर्चा पानांवर लावणे यात रस दाखवलेला नाही.
प्रत्येकवेळी प्रकल्प पान वेगळच असल पाहीजे अस नाही वर्ग पानाचा उपयोग प्रकल्प पाना सारखा करण्याचा कमी वापरला गेलेला पर्याय नेहमीच उपलब्ध आहे.माहितगार १७:०४, ३ ऑगस्ट २०११ (UTC)

>>>मुख्यलेख पानावर

सध्या मला वाटते मुख्यलेख पानावर "....विषयावरील अपूर्ण लेख" अशा प्रकारचे साचे काही ठिकाणी दिसतात पण त्या विषयांना कदाचित प्रकल्प पाने नाहीत ,त्या साचातच सुधारणा करून प्रयोग करून पहाण्यास हरकत नाही. दुसरे तर सध्याचा साचा:विस्तार वाचकांना विकिपीडिया:अपूर्ण लेख विकास या पानावर नेतो तीथे चावडी उस्चालन मध्ये मुख्यचावड्या ज्या प्रमाणे एका रांगेत दाखवल्या आहेत त्या प्रमाणे लोकप्रीय ठरू शकतील असे पाच एक प्रकल्पपानांचे दुवे लावून पहाण्यास हरकत नाही.
अर्थात इंग्रजी विकिपीडियात प्रकल्प साचे चर्चा पानावर लावण्या मागे इतर दोनतीन उद्दीष्ट होती एकतर मुख्य लेखपानावर आधीच इतर सूचना साचे माहिती चैकटी आणि तळाशी असलेल्या मार्गक्रमण साचाची गर्दी असते. दुसरे चर्चापानावरील साचे केवळ विषया संबधीत प्रकल्पाचेच नाही तर मुल्यांकनादी इतर कामे पार पाडण्यात देखील उपयूक्त ठरली आहेत.एखादा लेख एका पेक्षा अधिक प्रकल्पांचा पण भाग ठरतो. चर्चा पानाचा दुवा लाल आहे म्ह्टल्यावर लोक चर्चा पानावर जात नाहीत पण दुवा निळा आहे म्हटल्यावर जाऊन पाहू शकतात.

>>>साचा:Wikipedia ads

यावर पुढे काही काम केलेले नाही.करण्यास हरकत नाही.(अशा जाहीरातीतून प्रकट होणारी माहिती चपखल आणि सूयोग्य असावी या दृष्टीने प्रत्यक्ष त्यावर काम करण्यापूर्वी सहाय्य पानांचे अधीक वाचन करून घेतले गेले तर बरे पडेल.)


Vertualisation[संपादन]

Rahul,

I am not doing any specific task on Marathi Tithi. Just wanted to create the required pages and possible information. That's all. I can support your work of vertualisation once I get the idea and details what you are exactly doing. My vision is that we get some information about our festivals and marathi tithi either in Panchang/ kalnirnaya / Bhaktimarg pradip. We and our next generation should get all this information on Wikipedia and also understand the real meaning/ cause of doing it.... मंदार कुलकर्णी ०८:५०, ४ ऑगस्ट २०११ (UTC)

चैत्र[संपादन]

चैत्र शु.प्रतिपदा/द्वितिया- हे नुकतेच टाकलेले लेख बघावेत. काही दुरुस्त्या /त्रुटी असतील तर सुचवाव्यात ही विनंती. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १३:४७, ४ ऑगस्ट २०११ (UTC)


अतिउत्तम मार्गदर्शन[संपादन]

तमिळ क्यूब वर काम करणे अगदीच सोपे आणि सरळ आहे. मराठी लिहिण्यासाठी खूपच छान साधन आहे. आभार!!!

सागर:मराठी सेवक ०७:३३, ५ ऑगस्ट २०११ (UTC)

  • आपला संदेश मिळाला ,मी सध्या विकिपीडियावर नियमीत येत नसल्याकारणाने वेळेत उत्तर देता आले नाही,त्याबद्दल क्षमस्व.

वेळ मिळाल्यावर उपरोक्त विषयासंबंधी आपणास पुन्हा संपर्क साधेन,कळावे,धन्यवाद. प्रसन्नकुमार १२:४२, ५ ऑगस्ट २०११ (UTC)

झपाट्याने[संपादन]

कल्पना मांडून ती झपाट्याने प्रत्यक्षात आणणारे फार कमी लोक असतात. ते तू साधलेस, यु आर अ स्टार! त्यामुळे मला कौतुक वाटले. शिवाय चावडीची कल्पना मांडण्यासाठी केलेले प्रेझेंटेशन अप्रतिम छाप पाडणारे होते/आहे! आता आपण वेगवान संपादने पार पाडण्यासाठी युक्त्या शोधू या. जसे की एखाद्या नावाचे पान बनले की त्या 'शब्दाला' सर्व मराठी विकि पानांवर दुवा बनवू शकेल असा सांगकाम्या. म्हणजे समजा तबला हा लेख बनला तर त्या सांगकाम्याने विकीवरच्या सर्व पानांवर तबला शब्दाचा दुवा बनवावा. (काही वेळा शब्द खुपदा आलेला असू शकतो त्यासाठी त्या पानावरील पहिल्या ३ शब्दांचा दुवा बनवावा असे फिल्टर घालता येईल.) तबल्याच्या असा शब्द असेल तर अर्थातच दुवा बनणार नाही हे मी समजू शकतो. - असे सांगकामे बनवणे जमू शकेल का? निनाद ११:२२, ७ ऑगस्ट २०११ (UTC)

चावडीवर जातो मग आता... :) निनाद ००:२५, ८ ऑगस्ट २०११ (UTC)

तुम्ही मागे बदल करण्याला जुने सदस्य अनुकूल नसतात असे काहीसे मत नोंदवले होते. मला ते मत तितकेसे पटत नाही. माझ्या अनुभवाप्रमाणे अभय नातूं पासून संकल्प पर्यंत सर्वजण बदलाला अनुकूल असतात. पण अनुभवी सदस्यांना आपण प्रपोज केलेल्या बदला मागे असलेले मॅकेनिझमही दिसत असते. ते त्याप्रमाणे बदल 'ट्विक' करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांच्या दृष्टीनेही आपण पाहिले पाहिजे असे मला वाटते. इतके असूनही माझे वाद होतातच. पण मी चर्चेतून समोरच्याचे मत काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. माझे मतही आग्रहीपणे विविध मार्गे मांडतो. पण ते वादही निव्वळ त्या त्या पानापुरतेच आहेत असे मी समजतो. आणि ते त्या पानावरच विसरून जातो, किमान तसा प्रयत्न असतो! :) तेव्हा कोणताही पूर्वग्रह बाळगू नका इतकेच सांगणे! निनाद ०६:४५, ८ ऑगस्ट २०११ (UTC)

बिमार[संपादन]

सादर नमस्कार! आपणास दिव्य दृष्टी आहे काय? मी व माझा संगणक एकसमयावच्छेदेकरुन ४-५ दिवस बिमार होतो.मी सुधरलो पण संगणक अद्याप बिमारच आहे.हे काम दुसर्‍या संगणकावरुन करीत आहे.तसे आपणास धन्यवाद देतो. माझ्यातील दोष दाखविल्याबद्दल.मी यात सुधरण्याचा प्रयत्न करील.कोणाकोणास बिमार सोडले(लेख अथवा माणुस) ती यादी दिल्यासही मी आपला आभारी राहील.तसे,वयोमानापरत्वे प्रकृती ठिक रहात नाही हे तर आहेच.कसेतरी चालढकल व विरंगुळा म्हणुन येथे येतो. टाईमपास. दुसरे काय? 'मराठी प्रेम व निष्ठा' वगैरे सर्व दाखविण्याच्या बाबी आहेत असे माझे मत झाले आहे.माझ्यासारख्या माणसास आतापर्यंत अनेकांनी निभविले.उदार मनाने मदतीचा हात पुढे केला.त्यांचा मनःपुर्वक आभारी आहोच.माझे येथील काम आपणास वा कोणास पटत नसेल तर मी येथील लेखन/संपादन बंद करतो.तसे मला अगत्याने कळवावे. मी आपल्या संदेशाची वाट पहात आहो.मला येथे वा कोठेही कोणत्याही पदाची वा मानाची अपेक्षा नाही.आतापर्यंत केले ते काम बस झाले.आता येथील अवतारकार्य समाप्त करण्याचा विचार करीत आहो.


आमच्या विदर्भात एक म्हण आहे. 'डंगर्‍या(थोराड) बैलास कोणीही शिंग मारतो.' त्याची या निमित्ताने आठवण झाली एव्हडेच. शक्य असल्यास आपल्या प्रत्यक्ष समोरासमोर भेटीची ईच्छा आहे. अर्थात, आपलीही असेल तर.

आपणास पुन्हा एकदा धन्यवाद. काही चुकले माकले तर उदार मनाने माफ करावे अशी आपणांस विनंती करु काय?

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०६:१३, ९ ऑगस्ट २०११ (UTC)

प्रशासकपद[संपादन]

माहितगारांना प्रशासकपद देण्याबाबत आपण कुठे विनंती केली हेही कृपया कळवावे म्हणजे मला अनुमोदन देता येईल. जाता जाता एखादे चांगले काम करावे ही ईच्छा आहे. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०६:१९, ९ ऑगस्ट २०११ (UTC)


स्वागत चमू[संपादन]

स्वागत चमूचा सदस्य स्वतच होतायेते काय?किन्वा त्याची कोणाची परवानगी लागते? Makyaj ०९:५१, ९ ऑगस्ट २०११ (UTC)

आपल्या सहय्याबद्द्ल धन्यवाद. मकरंद (चर्चा • योगदान) १०:०४, ९ ऑगस्ट २०११ (UTC)

धूळपाटी पाने[संपादन]

राहुल,

धूळपाटी आणि त्याची उपपाने विकिपीडिया नामविश्वात असावी म्हणजे त्यांची गणना विकिपीडियातील लेखांत होत नाही.

संधी मिळाली की तुम्ही अलीकडे तयार केलेली सगळी धूळपाटी पाने (व इतरही जी हातास लागतील ती) विकिपीडिया:धूळपाटी अशी स्थानांतरित करावी.

अभय नातू १४:३५, ९ ऑगस्ट २०११ (UTC)

आमंत्रण[संपादन]

विकिप्रकल्प हिंदू धर्म येथे सदस्य होण्यासाठी आपल्या आमंत्रण आहे! विकिपीडिया:विकिप्रकल्प हिंदू धर्म/सदस्य येथे सदस्य सूची मध्ये आपले नाव वाचण्यास उत्सुक आहे. निनाद ११:१८, ११ ऑगस्ट २०११ (UTC)

Invite to WikiConference India 2011[संपादन]


Hi Rahuldeshmukh101,

The First WikiConference India is being organized in Mumbai and will take place on 18-20 November 2011.
You can see our Official website, the Facebook event and our Scholarship form.

But the activities start now with the 100 day long WikiOutreach.

Call for participation is now open, please submit your entries here. (last date for submission is 30 August 2011)

As you are part of Wikimedia India community we invite you to be there for conference and share your experience. Thank you for your contributions.

We look forward to see you at Mumbai on 18-20 November 2011

सांगकाम्या बनवताय ना?[संपादन]

विकिलेखात सर्वत्र दुवे टाकू शकेल असा सांगकाम्या बनवताय? काही कारय घडले की चावडीवर जाऊन अजून परवानग्या मागता येतील. निनाद २३:१२, ११ ऑगस्ट २०११ (UTC)

बिनशर्त माफी[संपादन]

झालेल्या प्रकाराबद्दल मी आपली 'बिनशर्त माफी' मागतो.'क्षमा वीरस्य भूषणम्' या उक्तिप्रमाणे आपण माफ कराल हीच अपेक्षा मनात बाळगुन आहे. कार्यालयीन कामकाजाचा ताण,वाढलेला रक्तदाब त्यातच येथे विकीवर येणे झाले. त्यामुळे तसे झाले असावे असे वाटते.कारण काहीही असो,माझा गैरसमज झाला. त्याबद्दल पुनश्च क्षमाप्रार्थी आहे. आपणही झाले-गेले ते मोठ्या मनाने विसरुन जावे व मनात कोणतेही किल्मिष ठेवु नये ही आग्रहाची विनंती.

  • तलवारीकडे हात जाउ नये असा सतत प्रयत्न करीतच असतो.त्या कारणामूळेच हातात लेखणी घेतली.पण काय करता? हात गेलाच तिकडे.

'रहीमन धागा प्रेमका । मत तोरे चटकाय ।। टुटे-जुरै सौ बार । पर बिच गाठ पर जाय ॥ आपल्या संबंधात कृपया अशी गाठ पडु देऊ नका. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १६:११, १२ ऑगस्ट २०११ (UTC)

मराठी स्पेलचेकर[संपादन]

मला सुचवावेसे वाटते की तुम्ही मराठी स्पेलचेकर वापरावा. हा फा फॉ वर चालतो आणि त्यातून माझे लेखन बर्‍यापैकी सुधारए असा माझा समज आहे. हा येथे मिळेल. मराठी स्पेलचेकर निनाद २२:५७, १२ ऑगस्ट २०११ (UTC)


विकिपीडिया:प्रमाणपत्र[संपादन]

राहुल विकिपीडिया:प्रमाणपत्र या प्रकल्पात प्रमाणपत्र बनवण्यात तुमचा सहभाग हवा आहे.बाकी सुद्धा या प्रकल्पाच्या प्रगतीकरता काही वेळ देता आलातर स्वागतच आहे.माहितगार ११:००, २० ऑगस्ट २०११ (UTC)
जसे शाळेत विद्यार्थ्यांना सहभाग घेतल्याबद्दल एखादे प्रमाणपत्र किंवा सर्टीफिकेट दिले जाते तसेच बनवून हवे आहे. शक्यतो मराठी विकिपीडियावरच नाव गाव टाईप करता येईल असा साचा प्रिफरेबल शिवाय A4 साईज कागदावर सहज प्रिंटेबल आणि दिसावयास चांगले असावे.
मी स्टॅटेजी विकिवर येथे बरेच सविस्तर लिहिले आहे. त्याचे चर्चा पानही पहावे.माहितगार ११:३८, २० ऑगस्ट २०११ (UTC)

>> (लोगो, चिन्ह , आदी.) काही ब्र्याड रंग (असल्यास ) बाबदची माहिती द्यावी

विकिपीडियाचा लोगो वापरू नये त्या साठी विकिमीडिया फाऊंडेशनची परवानगी लागते (तेही भविष्यात त्यांची परवानगी घेउन करण्यास हरकत नाही). मराठी आणि महाराष्ट्र या संदर्भाने आणि विकिपीडियाशी संबधीत आहे या दोन्ही गोष्टी दाखवणारा एखादी नवीन लोगो संकल्पना सुद्धा चालेल किंवा नविन काही सुचे पर्यंत सध्याचा महाराष्ट्र बार्नस्टारचित्र तसेच ठेवले तरी चालेल. रंग इंटरनेट आणि प्रिंटींग मध्ये दोन्हीकडे व्यवस्थीत येणारा कोणताही चालेल.

>>मसुदा आणि इतर माहिती

मसुदे मुख्य प्रकार दोन

१) विकिपीडिया संपादन कसा करावा या संदर्भात आपण चांगले ( पॉवर पॉइंट) प्रेझेंटेशन मराठी भाषेतून बनवून दिल्याबद्दल मराठी विकिपीडिया समुदायातर्फे हे प्रमाणपत्र प्रदान करण्या येत आहे

२) विकिपीडिया ज्ञानकोशातील ज्ञानाचा सुयोग्य वापर करून आपण चांगले ( पॉवर पॉइंट) प्रेझेंटेशन मराठी भाषेतून बनवून मराठी भाषिकांना मुक्तपणे वापरण्याकरता उपलब्ध करून दिल्याबद्दल मराठी विकिपीडिया समुदायातर्फे हे प्रमाणपत्र प्रदान करण्या येत आहे

सोबत "अशा जगाचा विचार करा, जिथे पृथ्वीवरील प्रत्येक माणसाला अखिल मानवी ज्ञानाभांडारात मु्क्त विहरता येईल." हे विकिपीडियाचे ब्रीदवाक्य माहितगार २०:०१, २० ऑगस्ट २०११ (UTC)

>>>माहितीगार,आपण विकिपीडिया च्या लोगो वापर संबंधी परवानगी साठी त्वरित हालचाल करावयास हवी (मान्यता येईल तेव्हा येईल पण सुरुवात करून द्यावी )कारण विकिपीडियाच्या ब्र्यांड व्ह्यालूचा आपणास फायदा घेता येईल असे वाटते.

अशा कार्यक्रमास विकिमीडिया इंडिया चॅप्टर, इंडिया प्रोग्राम्स आणि सरते शेवटी विकिमीडिया फाऊंडेशनची अधिकृत मान्यता लागेल.येत्या विकिकॉफरन्स (नव्हेंबरातल्या) मध्ये कुणी हा मुद्दा रेटला तर काही प्रगतीची शक्यता आहे.पण त्या करता मराठी विकिपीडियास जे उपयूक्त आहे ते करण्याकरता थांबून रहावयाचे का असा मुळात प्रश्न आहे उलट आपण आपला कार्यक्रम स्वतंत्र पणे रेटावा त्याच यश इतरांना सिद्ध करून दाखवाव आणि पाठींबा मागावा याचा फायदा आप्ल्या कृती आपल्याला चालू करता येतात इतरांवर विसंबून रहावयास लागत नाही.

काही मुद्दे

>>>विकिपीडियाचा यु आर एल द्यावा का

प्रमाणपत्रात यु आर एल असलेला बरा.


>>>आपणास जे जे ठावे ..... मराठी विपी चे (अनधिकृत/अधिकृत) घोष वाक्य लिहावे का

विकिमीडिया फाऊंडेशनच "Imagine a world in which every single human being can freely share in the sum of all knowledge. That's our commitment." हे घोष वाक्यच मराठी विकिपीडियासही लागू होत.ते अधिक सर्वसमावेशक आहे.
आपणास जे जे ठावे हे बर्‍याच लोकात लोकप्रिय आहे हे खरे असले तरी "शहाणे करून सोडावे सकळ जन" एका अर्थाने त्या वाक्यास दोन अर्थ छाटा आहेत,त्यातील एक अर्थ छटा ह विकिपीडियाच्या व्हॅल्यूज मध्ये परफेक्टली बसत नाही.कारण विकिपीडिया वाचकाला विवेक आहे यावर विश्वास ठेवत इतरांना शहाण करून सोडा म्हटल्या नंतर मला माझ व्यक्तिगत मत मांडण्याची मोकळीक अपेक्षीत होते ती विकिपीडियाच्या परिघात बसत नाही. त्यामुळे या बद्दल आग्रह धरू नये असे माझे प्रांजळ मत आहे.

>>>प्रमाण पत्रावर सही राहणार आहे का (~~)

बेसिकली मूळ कसेप्ट बार्नस्टार सारखाच कुणिही कुणालाही देण्याचे स्वातंत्र्य त्यामुळे ऑनलाईन सही पुरेशी ठरावी सोबत हवेतर प्रिंटेड सर्टीफिकेटवर सही करण्याकरता एखाद ओळीची जागा ठेवावी.

>>>तारीख /कालावधी वैगरे

कालावधीची आवश्यकता नाही तारीख प्रमाणपत्र देण्याची प्रिंटकरताना आपोआप त्यावेळची येईल अशी व्यवस्था केल्यास कसे असेल .

>>>हा साचा असावा असे आपण म्हणता मग तो कोणीहि लावला/वापरला तर ? त्याचे वापराचे तंत्र कसे असावे.

असे कुणी सहसा वपरणार नाही आणि वापरले तर वापरू द्या बार्नस्टारचा पर्याय आहे, नुक्सान होण्या सारखे काही आहे असे वाटत नाही.

>>>बंधू प्रकल्प वा इतर काही विपिशी निगडीत गोष्टी जाहिरातीसाठी द्यावे का

बंधूप्रकल्पावर जरी असे काम केले तरी असे प्रमाणपत्र देता आले पाहिजे.
"जाहिरातीसाठी द्यावे का" हे समजले नाही माहितगार २२:०२, २० ऑगस्ट २०११ (UTC)
ओके, तसे....या बंधूप्रकल्पाकरिता सूद्धा अशाच स्वरूपाची प्रेझेंटेशन्स बनवून देण्याचे आवाहन करून किंवा दुवा देण्यास हरकत नाहीमाहितगार २३:३२, २० ऑगस्ट २०११ (UTC)
थँक्स राहूल, काम प्रमाणपत्राचे काम तुम्ही एक सही केले आहे संकल्पना सुद्धा मस्त जमली आहे . मला वाटते हा प्रकल्प राबवण्याकरता मंदार,निनाद मनोज आणि जमले तर इंग्रजी विकिपीडियावरील अभिजीत सुर्यवंशी यांना सामील करून घेऊ या , तत्पूर्वी शुद्धलेखन आणि तत्सम काही गोष्टी सुचल्यास पहावे म्हणून अभय आणि संकल्पचे मत घेतो. माहितगार ०६:३५, २५ ऑगस्ट २०११ (UTC)

दीनविशेष काम[संपादन]

होय ! काम तर सुरू करु या. पण हल्ली माझी व्यस्तता वाढली आहे. तरीपण करु काम. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १३:१२, २० ऑगस्ट २०११ (UTC)

दिनविशेष[संपादन]

Namsakar, me दिनविशेष sathi kam karnyas aatur aahe. Adeshachi vat pahat.... !!!मंदार कुलकर्णी ०४:१८, २१ ऑगस्ट २०११ (UTC)

खालील प्रस्तावावर तुमचे मत हवे[संपादन]

mw:Extension:TitleBlacklist हे एक्सटंशन मराठी विकिपीडियावर अलरेडी आहेच त्याच्या अनुषंगाने विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न#Blocking of article titles in roman script by anon and new users हा प्रस्ताव मांडला आहे. प्रस्तावावर तुमचे मत हवे आहे. धन्यवाद माहितगार ०६:१०, २१ ऑगस्ट २०११ (UTC)

ग्राफिक संकल्पकाचा बार्नस्टार[संपादन]

नमस्कार राहुल ! मराठी विकिपीडियावर मराठीतून ग्राफिक संकल्पनात बजावलेले मोलाचे योगदान गौरवण्यासाठी खालील बार्नस्टार तुम्हांला देण्यात येत आहे. हा बार्नस्टार गौरव (अर्थात, त्यातील साचा), तुम्ही तुमच्या सदस्यपानावर लावू शकता. :)

ग्राफिक संकल्पकाचा बार्नस्टार
Rahuldeshmukh101, मराठी विकिपीडियावर केलेल्या ग्राफिक संकल्पनविषयक (अर्थात ग्राफिक डिझाइनविषयक) महत्त्वपूर्ण योगदानाची कदर म्हणून मराठी विकिपीडियाच्या वतीने तुम्हांला हा गौरव प्रदान करण्यात येत आहे.


माहितगार ०६:२९, २५ ऑगस्ट २०११ (UTC)

Dear Rahul, I have seen many lists in English wikipedia. e.g. http://en.wikipedia.org/wiki/Swing_bridge We need to work out the strategy on lists in Marathi wp...मंदार कुलकर्णी ०९:०८, १५ सप्टेंबर २०११ (UTC)

राहुल, सहसा विकिपीडियावर विश्वकोशीय मूल्य असलेल्या याद्या/सूची चालतात - म्हणजे 'अमुक तमुक देशाच्या राष्ट्राध्यक्षांची/पंतप्रधानांची/गव्हर्नरांची सूची' इत्यादी. यादीपर/सूचीपर लेख जर निबंधात्मक वळणाकडे झुकू लागले, तर मात्र ते विश्वकोशीय दखलपात्रतेनुसार लायक न ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे संबंधित ठिकाणी उल्लेखनीयता/दखलपात्रतेचा साचा लावून चर्चापानावर मत नोंदवावे, हे उत्तम. जर दखलपात्रता सिद्ध झाली नाही, तर ते लेख उडवता येतील.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १२:११, १५ सप्टेंबर २०११ (UTC)
याद्या असण्यास हरकत नाही. त्यांना विश्वकोषीय मूल्य तर आहेच तसेच माहितीच्या संकलनाच्या व वर्गीकरणाच्या दृष्टीनेही अशी पाने उपयोगी ठरतात. तरी अशी पाने असू द्यावी वण वर संकल्पने म्हणल्यानुसार त्यांवर लक्ष असावे.
अभय नातू २२:५६, १५ सप्टेंबर २०११ (UTC)

याद्या[संपादन]

राहुल, तुमचे चर्चा पानावरील मत वाचले.याद्या हव्यात का किंवा कशा हव्यात याविषयी चर्चा व्हायलाच हवी. पण या याद्या मुख्य लेखात ठेवण्यापेक्षा वेगळा उपलेख बनवून ठेवल्या तर मुख्य लेखाची लांबी आणि उपयुक्तता अबाधित राहील. त्या हिशोबाने हे उपलेख बनवले आहेत. याद्या या विश्वकोशात असायला हव्यात असे मला वाटते कारण अनेक जणांना थोडक्यात पुरेशी माहिती मिळते. इंग्लिश विपी मध्ये अशा याद्या अनेक आहेत आणि मी त्यात मला शक्य असेल तेंव्हा भर घालत असतो. नुसत्या याद्या देवून भागणार नाही हे मला मान्य. पण त्यातून कुठेतरी लेखाच्या शीर्षकाची सुरुवात तरी होते. तद नंतर जाणते मंडळी त्याचे नवीन लेख लिहून विपी मध्ये भर घालू शकतात. याचा अर्थ "याद्या नकोतच" असे नसावे असे वाटते....मंदार कुलकर्णी १४:१०, १७ सप्टेंबर २०११ (UTC)

साधित लेख/याद्या[संपादन]

नमस्कार राहुल ! बरोबर. या संदर्भात काही मार्गदर्शक तत्त्वे विशद करणे उपयोगी ठरू शकेल. मुळात विश्वकोशासाठी फारशी दखलपात्र नसलेली सूक्ष्मतम माहिती (मायक्रो-माहिती) ब्लॉगावर/अन्य संकेतस्थळांवर नोंदवता येईल आणि अश्या बाह्य दुव्यांची नोंद पूरक माहितीखातर विकिपीडियाच्या लेखाच्या अंती करता येईल. त्यासाठी विश्वकोशात स्वतंत्र लेख लिहिण्यात हशील नाही. नाहीतर 'माटुंगा परिसरातील दत्तमंदिरे' वगैरे लेखही मराठी विकिपीडियावर दिसायला लागतील. लोकांनी निबंध आणि विश्वकोशीय लेख यांतील फरक ओळखायला हवा.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:०४, १७ सप्टेंबर २०११ (UTC)

साचा[संपादन]

राहुल,

मी खरतर गेले ३ महिने संकल्पच्या मताची आणि मदतीची वाट पाहत होतो. पण असे दिसत आहे की त्याला कार्यबाहुल्यामुळे वेळ झाला नाही. तुम्हाला जर यात झटपट काही दुरुस्त्या करता येत असतील तर अवश्य कराव्या. मला फक्त हा नवीन साचा जुन्या साच्याशी आवश्यक लेखात Replace कसा कराल ते शिकवा म्हणजे भविष्यात पण मला ते करता येईल.... मंदार कुलकर्णी १४:३२, १८ सप्टेंबर २०११ (UTC)


नमस्कार राहुल,

कदम हा लेख फक्त देवनागरी लिपीतल नावाखाली स्थलांतरी करण्यात यावा. चाचापानावरील मजकूर लिहिण्यात जरा गल्लत झाली. -प्रबोध १४:५६, १८ सप्टेंबर २०११ (UTC)


सांगकाम्या[संपादन]

राहुलजी, सांगकाम्या कसा वापरावा ह्या बदल थोडे मार्गदर्शन हवे होते.


१. तो कसा वापरावा ?

२. कुठे वापरावा ?

३. कसा बनवावा ? सागर:मराठी सेवक १७:५५, २२ सप्टेंबर २०११ (UTC)


ट्रॅक[संपादन]

ट्रॅकसाठी अनेक शब्द आहेत, पण आपल्याचा कामाचा त्यांतल्या त्यात बरा शब्द, मार्गिका(स्त्रीलिंगी) हा आहे असे वाटते. आणखी शब्द : चाकोरी, पथ, मार्ग, वाट, पायवाट वगैरे....J १७:२३, २७ सप्टेंबर २०११ (UTC)


मार्गिका[संपादन]

मार्गिका अपरिचित नाही. कोणत्याही शर्यतीसाठी मैदानावर जे मार्ग आखून दिले असतात त्यांना मार्गिका किंवा चाकोरी म्हणतात. चाकोरी नेहमी वर्तुळाकार असते. मार्गिका तशी नसते. गंगवे, पॅसेज किंवा कॉरिडॉरला मार्गिका म्हणतात. साहित्यसंमेलनात जे स्वतंत्र ट्रॅक असतात त्यांना मला वाटते उपसत्र, विषयसत्र, चर्चासत्र किंवा सभासत्र म्हणतात. सर्कशीत मुख्य सर्कशीच्या बाजूला असलेल्या अधिकच्या वर्तुळाला रिंग म्हणतात. त्या अर्थाने ट्रॅकसाठी मंडल, अंगण(ग्राउंड), अवकाश(स्पेस) किंवा त्यांहून चांगला प्रांगण(कँपस) हे शब्द वापरता येतील. मार्गिकेपेक्षा प्रांगण जास्त चांगला. वेगळे व्यासपीठ म्हटले तरी चालेल. मला वाटते 'एक स्वतंत्र व्यासपीठ' हा सर्वोत्तम शब्दप्रयोग ठरावा..मराठी सदरपेक्षाही मराठीसाठी वेगळे व्यासपीठ हा अधिक चांगला शब्द आहे असे वाटते...J १८:२५, २७ सप्टेंबर २०११ (UTC)

धन्यवाद[संपादन]

नमस्कार राहुल. आपण जी चित्रे लेखात लावली आहेत ती अतिशय उत्तम आहेत. आपल्या मदती बद्दल धन्यवाद. Vishal1306 ०७:०४, ४ ऑक्टोबर २०११ (UTC)


दुर्ग संपत्ती[संपादन]

नमस्कार राहुलजी, माझ्याकडे दुर्ग संपत्ती या विषयावर एक सुंदर चित्र उपलब्ध आहे पण ते कुठे वापरावे हे मला समजत नाही आहे तरी आपण मला या साठी मदत करावी (Durg_sampatti.jpg‎ ) सागर:मराठी सेवक १७:३९, ४ ऑक्टोबर २०११ (UTC)

धन्यवाद[संपादन]

एरर काढल्या बद्दल धन्यवाद - मेघनाथ ०६:४७, १६ ऑक्टोबर २०११ (UTC)

डोळ्यांत तेल घालून लक्ष द्यावे लागणार[संपादन]

पण येत्या काळात अश्या प्रकारांकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष द्यावे लागणार असे दिसते.

होय, मलाही तीच काळजी वाटते, आंतरजालावरून इतरत्रची झालेली कॉपी पेस्टींग भाषाशैलीवरून बरेच सहजतेने लक्षात येते.शासकीय विश्वकोशातील कुणी संदर्भ न देता कॉपी पेस्टींग केल्यास भाषेत अलंकृतता नसल्यामुळे आपल्या नजरेतून सुटेल पण त्याच वेळी तज्ञांनी स्वतःची भाषाशैली टिकवत लेखन केले आहे त्यामुळे कॉपीराईट भंग सिद्ध करणे तसे झाल्यास कायदेतज्ञांच्या मात्र हातचा मळ असेल आणि याचे गांभीर्य नवागत सदस्यांना कसे समजवावे हा एक मोठा यक्ष प्रश्न आहे चएचेतून भविष्याकारता काही मार्ग सुचावा याच उद्देशाने मी हा विषय चावडीवर मांडला आहे माहितगार १८:१२, १ नोव्हेंबर २०११ (UTC)
Can we have a bot in Marathi Wipi like English which immd. founds the copied content from net... I think this is now badly required as it is very difficult to search such content manually.... Also we need to guide and teach the editors how to right the article by taking help of "Vishwakosh" without getting caught in Copyright issue. I guess some discussion is required in this topic. Just to tell you, the information in http://manase.org/ was earlier free (no copyright) and that was mentioned specifically on the website. On that basis, some articles in Marathi Wipi are been created/copied from that site and given the reference on page by some editors. Now during last 2 months http://manase.org/ has put back dated line "Copyright @ 2009 Maharashtra Navnirman Sena. All rights reserved." What to do now? मंदार कुलकर्णी ०७:२२, २ नोव्हेंबर २०११ (UTC)


हार्दिक अभिनंदन[संपादन]

आपले, प्रचालकपद मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.'विकिपीडियाच्या उत्कर्षाची शपथ' आपण सर्वांनी घेतलीच आहे.नविन टीम तयार झाली आहे.जोमाने कामास लागा.या पदास लागणारी नितीमत्ता,सुजाणता, सर्वसमावेशक वृत्ती,खिलाडूपणा,चिकाटी,धैर्य ईत्यादी आपणात सध्या असलेले गुण परम् उंचीवर नेण्याचा आपला प्रयत्न असावयास हवा एवढेच यानिमीत्त्याने सांगावेसे वाटते. पुन्हा मनःपूर्वक शुभेच्छा.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १५:०२, १२ नोव्हेंबर २०११ (UTC)


हार्दिक अभिनंदन! आपल्या प्रचालकपदाच्या कारकिर्दीसाठी अनेक शुभेच्छा! -- कोल्हापुरी ०८:४२, १३ नोव्हेंबर २०११ (UTC)

राहुल, प्रचालकत्व मिळाल्याबद्दल अभिनंदन (संदर्भ)! विकिपीडिया:प्रचालक/कामे येथे प्रचालकीय कर्तव्यांची माहिती नोंदवली आहे; त्यावर नजर टाकावी. काही अडचण असल्यास, जरूर कळवावे. --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०९:०१, १३ नोव्हेंबर २०११ (UTC)

नवनिर्वाचित प्रचालकांनी आपल्याबाबत माहिती त्यांचे सदस्यपानावर टाकावयास हवी अशी सूचना करावीशी वाटते. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ११:३५, १८ नोव्हेंबर २०११ (UTC)

हार्दिक अभिनंदन! आपल्या प्रचालकपदाच्या कारकिर्दीसाठी अनेक शुभेच्छा! सोबत एक काम पण विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न#Using_Template:Random_subpage_in_two_levels मला हा प्रश्न अजून सुटलेला नाही सवडिनुसार मार्गदर्शन करावे माहितगार १२:४६, ४ डिसेंबर २०११ (UTC)

काळजी करु नका[संपादन]

सगळे दुवे दुरुस्त करणयाचे काम अजून चालू आहे. काही चुका राहिल्यास कळवालच. संतोष दहिवळ १५:१४, ४ डिसेंबर २०११ (UTC)

मला वाटते सगळे दूवे ठिक झाले आहेत. एकदा नजरेखालून घालावे. काही चुका झाल्या असल्यास क्षमस्व. संतोष दहिवळ १५:४३, ४ डिसेंबर २०११ (UTC)

विकिपत्रिके संबंधित सर्व पाने वर्ग:विकिपत्रिका येथे आहेत. मला वाटते तुम्ही चित्र:Vikipatrika1.png हे वर्ग:विकीपत्रिका येथे टाकले होते. त्यामुळे तुम्हाला वर्ग मध्ये problem दिसला असेल. ते चित्रही मी वर्ग:विकिपत्रिका येथे हलवले आहे. फक्त मला वर्ग:विकीपत्रिका याचे स्थानांतरण वर्ग:विकिपत्रिका येथे करता येत नाही ते तुम्ही करावे ही विनंती. संतोष दहिवळ १९:१७, ५ डिसेंबर २०११ (UTC)

तुम्ही योग्य ते निर्णय घ्या.[संपादन]

राहुलजी नमस्कार . ठीक आहे .मला काहीच अडचण नाही.तुम्ही योग्य ते निर्णय घ्या.मी लिहित जाइन.पण सोलीव सुख हे प्रकरण का काढले?भावार्थ अवश्य काढून टाका .काही अडचण नाही

समर्थ व समर्थ शिष्य यांची काही चित्रे अपलोड केली आहेत[संपादन]

नमस्कार , ठीक आहे .मी समर्थ व समर्थ शिष्य यांची काही चित्रे अपलोड केली आहेत .सर्व चित्रे एकदम अधिकृत आहेत.ती ३०० वर्षांच्या परंपरेने चालत आलेली आहेत .कृपया एकदा तपासून बघा.

हि चित्रे मुक्त आहेत.[संपादन]

राहुलजी नमस्कार , मी अपलोड केलेली सर्व चित्रे यांच्यावर कसलाही व कोणाचाही कॉपीराईट नाही.याची सर्व जबाबदारी माझी व खात्री देतो.हि चित्रे मुक्त आहेत.

धन्यवाद , मला आखणी करून काम करायला आवडेल. एक गोष्ट विचारायची होती ती म्हणजे पक्ष्यांच्या लेखांसाठी जीवचौकट व पक्शिचौकत एकत्र करता येईल का ? जीवचौकट व पक्शिचौकत मधील फक्त इतर भाषातील नावे व जमल्यास लांबी जसे कि या लेखामध्ये http://gu.wikipedia.org/wiki/%E0%AA%98%E0%AB%8B%E0%AA%B0_%E0%AA%96%E0%AB%8B%E0%AA%A6%E0%AB%80%E0%AA%AF%E0%AB%81%E0%AA%82

.

विकीपत्रिका सभासद नोंदणी ....!
नमस्कार, Rahuldeshmukh101/जुनी चर्चा २

मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत.

पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल.

मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर.

कळावे - खबर्या (विकीपत्रिका)


माफ करा. आपली परवानगी न घेता, तो साचा योग्य तर्‍हेने प्रदर्शित व्हावा म्हणुन, विकिपत्रिका संदेश या साच्यात काही टंकनचुका दुर केल्या आहेत.

क.लो.अ.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०३:५०, १९ डिसेंबर २०११ (UTC)

लेखाचे नाव कसे बदलायचे[संपादन]

एखाद्या लेखाचे नाव कसे बदलायचे (http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%आफ)

Broad Categorization[संपादन]

I feel we should categorize the articles with "specific" categories instead of adding broad categories (e.g. विकिपीडिया चित्रे). Also, these kind of edits can be easily automated. - प्रबोध (चर्चा) ०६:३९, २३ डिसेंबर २०११ (UTC)

चित्रे या विभागावर काम झाले पाहिजे, हे मान्य आहे. परंतु, इतका ढोबळ वर्ग लावल्याने फार काही साध्य होत नाही आहे, असे वाटते. व थोडे बहुत आपलेच काम विनाकारण वाढणार आहे (ढोबळ वर्ग लावणे व काढणे).
१००-२०० चित्रांची यादी तयार करून, चावडीवर अथवा साईट नोटीस वर सर्व संपादकांना चित्रांचे वर्गीकरण करण्यास निमंत्रित केल्यास कसे? अट एकाच असेल, कि विशिष्ट वर्गीकरण केले पाहिजे. हि यादी सामुर्णपणे वर्गीकृत झाली कि त्यास रिव्हू करायचे आणि एकदा समाधानकारक वर्गीकरण झाले कि यादीत नवीन चित्रे टाकायची.
- प्रबोध (चर्चा) ०८:३६, २३ डिसेंबर २०११ (UTC)
जर एखाद्या चित्रास विकिपीडिया चित्रे या पेक्षा विशिष्ट वर लावला तर विकिपीडिया चित्रे हा वर्ग काढल्यास चालेल का? (उदा:चित्र:-VAJRESHWARIDEVI MANDIR-1-.jpg) - प्रबोध (चर्चा) ०९:०१, २४ डिसेंबर २०११ (UTC)
चित्र:Wikipedialogokiran.png या सारख्या चित्रांस् विकिपीडिया चित्रे हा वर्ग उचित वाटतो. - प्रबोध (चर्चा) १६:०२, २५ डिसेंबर २०११ (UTC)
I have replied to you on your email. I feel adding विकिपीडिया चित्रे is not necessary. Could you please check the email. - प्रबोध (चर्चा) ०५:५१, ३१ डिसेंबर २०११ (UTC)

कृपया येथेयेथे बघावे. तेथे वर्गिकरणासंबंधी मते मांडली आहेत.त्याचा आपणास नक्कीच उपयोग होईल. धन्यवाद. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १५:३३, ३१ डिसेंबर २०११ (UTC)

होय.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १४:४१, १ जानेवारी २०१२ (UTC)