Jump to content

सदस्य चर्चा:Ajitoke

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत Ajitoke, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Ajitoke, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७७३ लेख आहे व १५९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

आपणास विकिपीडियावर तांत्रिक गोष्टी कठीण जातात ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

अरे अजित, तू? सही!

[संपादन]

तुला इथे बघून सही वाटलं! :) आता तुझ्यासारख्या लोकांकडून वेगवेगळ्या माहितीची भर पडली तर मराठी विकिपीडिया चांगला वाढेल. :-)

--संकल्प द्रविड 05:25, 10 नोव्हेंबर 2006 (UTC)

अजित, थोडेसे विकिपीडिया संपादनाविषयी..

[संपादन]

अजित,

तू संपादित केलेले काही लेख पाहिले, त्यावरून विकिपीडिया संपादनाविषयी ही लिंक द्यावीशी वाटली: विकिपीडिआ साहाय्य:संपादन
विकिपीडियावर त्याची स्वतःची syntax पद्धत आहे; खेरीज HTML चे काही सिंटॅक्सदेखील चालतात. इथल्या काही लेखांचे स्रोत पाहिलेस तर तुला याबद्दल कल्पना येईल. उदा.:

शिवाय इंग्लिश विकिपीडियावर संपादनाविषयी खूप च्हान माहिती साद्यंत लिहिली आहे. हा दुवा बघ:
en:Help:Contents/Editing Wikipedia

बाकी, मी सध्या Category:देश मधल्या लेखांत तक्ते भरत होतो. चित्रकारांवरचे लेख देखील लिहायचा मानस आहे. थोडक्यात - 'काम चालू आहे'. :-)

--संकल्प द्रविड 14:12, 14 नोव्हेंबर 2006 (UTC)

उत्तरे

[संपादन]

अजित, तुला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे:

  1. कॅटेगरी निर्माण कशी करावी: [[Category:काहीही नाव]] या पद्धतीने तू कुठेही लिहून त्याचा प्रीव्ह्यू पाहिलास तर तुला लाल रंगात एक लिंक दिसेल. त्या लिंकवर टिचकवलेस तर तुला 'Category:काहीही नाव' नामक लेखाचे पान लिहिण्यासाठी उपलब्ध झालेले दिसेल.. ज्यात तू त्या कॅटेगरीची पालक-कॅटेगरी लिहिणे अपेक्षित असते. अर्थात ही सर्व प्रक्रिया कुठलाही नवीन लेख लिहिण्याच्या प्रक्रियेसारखीच आहे; नवीन लेख कसा लिहावा येथे जाऊन तू जसे इतर लेख तयार करू शकतोस, तसेच कॅटेगरीदेखील तयार करू शकतोस. फरक फक्त इतकाच की "Category:" हा नेमस्पेससूचक प्रत्यय प्रारंभी हवा.
  2. खेळ नावाची कॅटेगरी: मराठी विकिपीडियाच्या मुखपृष्ठावर खाली असलेल्या 'संक्षिप्त सूचीमध्ये' [[Category:क्रीडा]] ही कॅटेगरी आहे.. त्याचा वापर करू शकतोस.
  3. तू लिहिलेल्या नेहरू स्टेडियम या लेखाचे स्थानांतरण मी अगोदरच नेहरू स्टेडियम, पुणे या लेखात केले आहे. तू या दोन्ही दुव्यांपैकी कुठल्याही दुव्यावर क्लिक केलेस तरी एकाच लेखापाशी पोचशील. तुला अन्य कुठल्याही लेखाचे स्थानांतरण करायचे असल्यास प्रत्येक लेखाच्या डोक्यावर 'लेख', 'चर्चा', 'संपादन', 'इतिहास', 'स्थानांतरण', 'पहारा' अशी जोडपाने (tabs) दिसतील; त्यातील 'स्थानांतरण' पान वापरून तू तो लेख नव्या शीर्षकावर स्थांतरित करू शकतोस (जसे मी नेहरू स्टेडियमचे केले.). अर्थात या पद्धतीने तुझा लेख/त्यातील आशय जुन्या व नव्या अशा दोन्ही शीर्षकांशी जोडला जातो.
  4. काही संकीर्ण बाबी: चर्चा पानावर तुला कुठलाही नवीन संदेश ठेवायचा असेल तर 'चर्चा' या टॅबशेजारी एक '+' असा टॅब दिसेल, त्यावर जाऊन नवीन संदेश लिहू शकतोस. जुनाच संदेश बदलायचा असेल किंवा त्याच धाग्यात भर टाकायची असेल तर त्या संदेशापाशी उजव्या कोपर्‍यात असलेल्या 'edit' या दुव्यावर टिचकवून नवीन संदेश आधीच्या मजकुरास जोडू शकतोस. आणि प्रत्येकवेळी संदेश लिहिल्यानंतर तुझे नाव व वेळ-दिनांक इ. लिहिण्याकरता ~~~~ असे चारवेळा टिल्डे लिहीत जा.
  5. सुरुवातीला इथली संपादनप्रणाली काहीशी अनोळखी वाटेल; पण - थोडे इतरांचे लेख, 'अलीकडिल बदल' मधून दिसणारे ताजे बदल, त्यात वापरलेले सिंटॅक्स, इंग्लिश विकिपीडियावरील 'हेल्प' पाने वगैरे - वापरून जितके लिहावेसे वाटेल तितके बिनधास्त लिहीत जा. आणि काहीही अडचणी असतील तर प्रबंधक, मी आणी अन्य विकिकर मदतीला आहोतच. कधीही संदेश ठेवून देत जा. उत्तर येईलच.

--संकल्प द्रविड 19:11, 19 नोव्हेंबर 2006 (UTC)

Great job on adding the tennis players!

अभय नातू 06:23, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)

गौरव

[संपादन]

Ajitoke,

आपल्या मराठी विकिपिडीयावरील योगदानाबद्दल, विशेषतः मराठी भाषा व क्रीडा विषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विकिपिडीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.

मराठी विकिपिडीयावरील मराठी भाषा व क्रीडा विषयक योगदानाबद्दल

क.लो.अ. Mahitgar 06:50, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)

movie pages

[संपादन]

Ajit,

Consider movig movie related table into a template and using that on indiviual movie pages.

Let me know if you need help creating the template.

अभय नातू 04:40, 28 नोव्हेंबर 2006 (UTC)

विशेष पानावरचे शुद्धलेखन (Re: User_talk:Sankalpdravid)

[संपादन]

नमस्कार अजित,

विशेष पाने तुम्ही म्हटले त्याप्रमाणे फक्त प्रबंधकांनाच बदलता येतात. तरी शुद्धलेखन किंवा आणखी काही सूचना असतील तर त्या संबंधित पानाच्या चर्चा पानावर मांडाव्या.

पाटीलकेदार 10:13, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)

उ.: विशेष पानांवरचे शुध्दलेखन

[संपादन]

अजित,

  1. अलीकडिल बदल यासारख्या विशेषपानांमध्ये केवळ प्रबंधकांनाच बदल करता येतात. पण 'नवीन लेख लिहा' यापानाबद्दल मला काही संदर्भ सापडला नाही. तू नवीन लेख कसा लिहावा या पानाबद्दल विचारत असशील तर हे पान अगोदरच संपादनीय ठेवले आहे.
  2. परभाषेतील विशेषनामांचे मराठीत लेखन करताना शक्यतो उच्चारानुसार करावे; कारण मराठी भाषेचे लेखन उच्चारानुसारी आहे. परंतु याला काही अपवाद करावे लागू शकतात:
    1. मराठीत अगोदरपासून रूढ झालेल्या परकीय संज्ञा/नावांचे लेखन रूढ पद्धतीनेच करावे. उदा. Sachsen (English: Saxony) या जर्मन राज्याचे नाव इंग्रजी साहित्यातून मराठी लोकांपर्यंत पोचल्याने इंग्लिश स्पेलिंगप्रमाणे 'सॅक्सनी' असे लिहिले जाते; मूळ जर्मन उच्चाराप्रमाणे 'जाख्सन' असे लिहिले जात नाही.
    2. मूळ भाषेतील शब्दांची अलगता त्या भाषेच्या बोलीत जाणवत नसली तरी मराठी लेखनात मूळ भाषेच्या लेखनाप्रमाणे जपावी. उदा. Leonardo Di Caprio चे नाव लिहिताना 'डिकॅप्रिओ' असे न लिहिता 'डि कॅप्रिओ' असे अलग शब्द लिहावेत.

--संकल्प द्रविड 10:44, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)

फुटबॉल अपूर्ण लेख

[संपादन]

अजित,

फुटबॉलबद्दलचे लेख सुरू करताना कृपया त्यात {{विस्तार-फुटबॉल}} ही ओळ घालावी, म्हणजे वर्गीकरणाला व लेख पूर्ण करायला सोपे जातील.

उदाहरण चेल्सी या लेखात आहे.

तसेच टर्किश फुटबॉल क्लबपेक्षा तुर्कस्तानचे फुटबॉल क्लब असे वर्गीकरण करावे. रशियन फुटबॉल क्लब, जर्मन फुटबॉल क्लब बरोबर आहेत परंतु टर्किशतुर्कस्तानमध्ये संबंध लगेच दिसून येत नाही.

अभय नातू 04:22, 12 डिसेंबर 2006 (UTC)

फुटबॉल अपूर्ण लेख

[संपादन]

वर लिहिल्याप्रमाणे रशियन फुटबॉल क्लब, जर्मन फुटबॉल क्लब बरोबर आहेत परंतु टर्किशतुर्कस्तानमध्ये संबंध लगेच दिसून येत नाही. मराठीत अमेरिकन, रशियन, जर्मन, इ. शब्द रूढ आहेत. जर मराठीकरण करायचेच झाले तर टर्किशऐवजी तुर्कस्तानी शब्दही वापरता येईल.

अभय नातू 04:30, 12 डिसेंबर 2006 (UTC)

टर्की

[संपादन]

टर्की विशेषनाम नाही :-) ते उपनाम आहे. देशाचे नाव तुर्कस्तान असे आहे. त्या नावाने येथे लेखही आहे.

अभय नातू 04:31, 12 डिसेंबर 2006 (UTC)

अजित,
विशेषनामांचे मराठीकरण करू नयेच. याला मी पूर्णपणे सहमत आहे.
तुम्ही दिलेले उदाहरण इंग्लिशमध्ये आहे. मराठी विकिपिडीयावर तुर्कस्तान हे नाव रूढ केले गेले आहे.
याची शहानिशा होईपर्यंत तुम्ही टर्की वापरलेत तरी चालेल. टर्की/तुर्कस्तानबद्दल तुमचे मत चावडीवर मांडा.
मला मोहमेडन‎ बद्दल शंका आहे. त्या चर्चा पानावर उत्तर द्याल?
अभय नातू 04:39, 12 डिसेंबर 2006 (UTC)

तुझ्या ब्लॉगवर 'मराठी विकिपीडियाची' जाहिरात

[संपादन]

अजित, तुझा 'उगाच उवाच' ब्लॉग मराठी ब्लॉगर मंडळींना चांगला माहीत आहे. :-) तिथे तुला 'मराठी विकिपीडिया'बद्दल माहिती लिहून जाहिरात करता येईल का? अधिकृत नाही पण अनौपचारिक पद्धतीने तू तुझ्या एखाद्या ब्लॉगपोस्टमध्ये मराठी विकिपीडिया उपक्रमाबद्दल sort of जाहिरात केलीस तर देवनागरीत लिहिणारे बरेच नेटकर पब्लिक आपल्या उपक्रमाबद्दल आस्था दाखवतील असे वाटते.

आणि अभिनंदनाबद्दल थँक्स! :-)

-संकल्प द्रविड 09:15, 12 डिसेंबर 2006 (UTC)

अजित,

Not sure if you created this template.

Template:चौकट क्रिकेटपटु हा साचा Template:चौकट क्रिकेटपटू असा लिहिला पाहिजे.

Even better, it should be named Template:चौकट क्रिकेट खेळाडू

अभय नातू 02:45, 16 डिसेंबर 2006 (UTC)

I did some digging and found out that you in fact did not create this template.

Let me know what you think about using पटू vs. खेळाडू.

अभय नातू 02:58, 16 डिसेंबर 2006 (UTC)

Using 'हा छोटा बदल आहे' checkbox

[संपादन]

Hi Ajit,

A suggestion. We need to check the above mentioned checkbox only when we correct a spelling or modify white/blank spaces.
In case of query, do let us know.
Regards,

Harshalhayat 06:55, 17 डिसेंबर 2006 (UTC)

search queries

[संपादन]

अजित, तू विचारतोयस तशा माहितीकरता खालील दुवे बघ:

BTW, तुझा नवीन लेख तयार करण्याचा सपाटा जोरदार आहे! च्हान काम चाललंय. :-) मात्र, नवीन लेखांच्या निर्मितीबरोबरच लेखांचा विस्तारदेखील करायला हवा. चंगीझ खानासारखे लेख असेच हळूहळू लिहीत विस्तारले आहेत. तूही तुला आवडेल अशा लेखावर जमेल तसे लिहायला सुरुवात कर; हळूहळू इतरजणही त्यात त्यांच्यापरीने भर घालतात.

--संकल्प द्रविड 04:54, 19 डिसेंबर 2006 (UTC)

Article requests in Marathi

[संपादन]

Hi! Do you do article requests in Marathi? Thanks WhisperToMe (चर्चा) १०:३४, १० जुलै २०१३ (IST)[reply]

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.