Jump to content

सदस्य चर्चा:प्रसाद साळवे/जुनी चर्चा १

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी मध्ये रुळलेले शब्द वापरणे योग्य ठरेल. Salveramprasad (चर्चा) १३:४७, २१ ऑगस्ट २०१२ (IST)रामप्रसाद साळवे[reply]

संपादने

[संपादन]

जामनेर - पाचोरा या मार्गावर रेल्वेसेवा सध्या चालु आहे का?

@Yogeshs: होय सर त्या मार्गावर रेल्वेच्या दोन फेर्या नियमित सुरु आहेत. स्थानिक भाषेत त्या रेल्वे व रेल्वे मार्गाला पी.जे. PJ असे म्हणतात.



नमस्कार, आपली गेल्या काही दिवसांतील संपादने पाहिली. लक्षात आले की आपण एका विशिष्ट जात/समाजाच्या व्यक्तींवरील लेखांत अप्रचलित किंवा सहसा लोकांना जास्त माहिती नसलेला मजकूर घालीत आहात. तरी असा मजकूर घालताना संदर्भ दिले तर विकिपीडियावाचकांना आपण लिहीत असलेली माहिती खरी असल्याची खात्री पटेल.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ११:५७, १९ ऑगस्ट २०१३ (IST)[reply]

नमस्कार,

मी संदर्भ दिले आहेत.पण ते संदर्भ साहित्य आपल्या वाचना बाहेरील आहे.
धन्यवाद,
कळले नाही. तुमचे संदर्भ लेखातच दिलेले आहेत का? तसे असल्यास मला दिसले नाहीत तर त्यासाठी क्षमस्व. संदर्भ अधिक डिटेलने कसे द्यावे यासाठी लेखातीलच इतर ठिकाणांचा अभ्यास करावा. संदर्भ साहित्य माझ्या किंवा कोणाच्या वाचनाबाहेर असणे या टिप्पणीचा अर्थही उमगला नाही. संदर्भ खरे असले आणि ते सगळ्यांना उपलब्ध असले म्हणजे झाले.
अभय नातू (चर्चा) १९:२४, १९ ऑगस्ट २०१३ (IST)[reply]

जन्मदिनांक आणि वय

[संपादन]

जन्म दिनांक आणि वय हा साचा वापरून पहा. मला वाटते तुम्हाला पाहिजे ते त्यात आहे.

अभय नातू (चर्चा) ०६:२६, ९ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]

दिनविशेष

[संपादन]

एखाद्या व्यक्तीचा जन्म समजा १ मे रोजी झाला असेल तर ती घटना, १ मे च्या जन्म या दिन विशेष दैनंदिनी सदरात आपोआप का येत नाही. ती घटना तेथे सुद्धा संपादित का करावी लागते.त्या साठी १ मे चे जन्म ,१ मे च्या घटना किंवा २४ ऑक्टोबर चे मृत्यू असे वर्ग साचे तयार करावे लागतील का कसे ? या साठी काय करता येईल.साळवे रामप्रसाद २२:२९, २५ ऑक्टोबर २०१३ (IST)

@सदस्य:Salveramprasad,
नमस्कार,विकिपीडिया:विकिप्रकल्प दिनविशेष हा संबंधीत प्रकल्प आहे आणि विकिपीडिया:चावडी/कालगणना पाने चर्चा येथे संबंधीत काही जुनी चर्चा अंशत: संकलीत आहे (ती अद्ययावत नाही पण नवीन सदस्यांना कदाचित सुरवातीच्या माहितीस साहाय्यभूत होऊ शकेल असे वाटते.
दिनविशेष पद्धती समजून घेणे आणि त्यात भर टाकणे एकुण क्लिष्ट आहेच,त्याही पेक्षा प्रथम दर्शनी दिसत त्या पेक्षा खूप अधिक वेळ आणि श्रमही खर्ची पडतात (दिनविशेष प्रकाराचा प्रत्यक्ष व्याप (परिघ) खूप मोठा आहे आणि क्लिष्टतेस मिडियाविकि सॉफ्टवेअरच्या च्या काही मर्यादाही अंशत: कारणीभूत आहेत),हे सांगण्याचा उद्देश आपणास डिसकरेज करण्याचा नाही तर,उपरोक्त कारणांनी मी दिनविशेष सदरात सहसा सहभाग टाळत असल्यामुळे माझ्या माहितीस अद्ययावत नसण्याच्या मर्यादा आहेत.दिनविशेष सदरात इतर सदस्यांच काम अधिक भरीव आहे तेव्हा मी @सदस्य:अभय नातू यांना आपणास उपयूक्त मार्गदर्शन करण्याची विनंती करतो.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:१७, २७ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]

ध्वज

[संपादन]

राष्ट्रीय ध्वज याचा अर्थ वेगवेगळ्या राष्ट्रांचे ध्वज असा होतो आहे त्याअनुषंगाने त्यातील माहिती असावी. विशिष्ट देशाच्या राष्ट्रीय ध्वजाविषयीची माहिती वेगळ्या शीर्षकाखाली असावी. उदा. चेक प्रजासत्ताकचा ध्वज, म्यानमारचा ध्वज, आयर्लंडच्या प्रजासत्ताकाचा ध्वज, स्लोव्हाकियाचा ध्वज इत्यादी. म्हणूनच तुम्ही राष्ट्रीय ध्वज या लेखात भारतीय राष्ट्रध्वजाविषयी टाकलेली माहिती भारतीय राष्ट्रध्वज या पानात टाकण्यासाठी चर्चा:भारतीय राष्ट्रध्वज या पानावर नेऊन ठेवली आहे. ती माहिती प्रताधिकारीत नसल्यास तिथून ती लेखात टाकावी.

-- संतोष दहिवळ (चर्चा) ००:५८, २९ ऑक्टोबर २०१३ (IST) ok सर साळवे रामप्रसाद ००:५९, २९ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]