संजय लीला भन्साळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
संजय लीला भन्साळी
जन्म २४ फेब्रुवारी, १९६३ (1963-02-24) (वय: ५७)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारत
कार्यक्षेत्र दिग्दर्शक, निर्माता, पटकथा लेखक
आई लीला भन्साळी

संजय लीला भन्साळी (जन्म: २४ फेब्रुवारी १९६३) हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक आहेत. लीला हे त्यांच्या आईचे नाव आहे. भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचा माजी विद्यार्थी असलेल्या संजय भन्साळी यांनी विधू विनोद चोप्राचा साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काही चित्रपटांमध्ये भाग घेतला. १९९६ साली त्यांनी स्वत: प्रमुख दिग्दर्शक बनून खामोशी ह्या चित्रपटाची निर्मिती केली. तेव्हापासून त्यांनी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांना आजवर फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत.

चित्रपट यादी[संपादन]

वर्ष चित्रपट दिग्दर्शक निर्माता कथाकार टीपा
१९९६ खामोशी होय होय फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट समीक्षक पुरस्कार
१९९९ हम दिल दे चुके सनम होय होय होय फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार
फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार
२००३ देवदास होय फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार
फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपट
२००५ ब्लॅक होय होय फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार
फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार
फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट समीक्षक पुरस्कार
२००७ साँवरिया होय होय
२०१० गुजारिश होय होय होय
२०११ माय फ्रेंड पिंटो होय
२०१२ रावडी राठोड होय
२०१२ शिरीन फरहाद की तो निकल पडी होय होय
२०१३ गोलियों की रासलीला राम-लीला होय होय होय
२०१४ मेरी कोम होय
२०१५ गब्बर इज बॅक होय
२०१५ बाजीराव मस्तानी होय होय होय

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत