श्रीकांत बहुलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

श्रीकांत बहुलकर हे एक प्राच्यविद्या संशोधक आहेत. पुण्याच्या भांडारकर संस्थेतून ते निवृत्त झाले आणि अजूनही ते तेथे संशोधनाचे काम करत असतात.

श्रीकांत बहुलकर यांचे मूळ गाव खेड तालुक्यातील बहुळ होय. या छोट्याशा खेड्यातून पुण्यात येउन बहुलकर यांनी अथर्ववेदातील भैषज्य (औषधिशास्त्र) या विषयावर संशोधन केले. डॉक्टरेट पूर्ण केल्यावर शिष्यवृत्ती मिळवून ते जपानला गेले. तेथे त्यांनी तिबेटी भाषा शिकून तिबेटी औषधिशास्त्राचा अभ्यास केला.

यातून त्यांनी अकस्मात वज्रयान या बौद्ध पंथाचा सखोल अभ्यास केला. बहुलकर हे वेद आणि बौद्ध तंत्र विषयातील जागतिक स्तरावर तज्ज्ञ समजले जातात.

त्यांनी जपान, कॅनडा, जर्मनी, नेदरलँड्स, रोमेनिया, फिनलंड, रशिया, अमेरिका, थायलंड इत्यादी देशांत विद्यापीठांतून, शैक्षणिक संस्थांमधून व्याख्याने दिलेली आहेत.

पदे[संपादन]

पुरस्कार[संपादन]

  • अभिजात आणि मध्ययुगीन साहित्यातील संशोधनाबद्दल दिल्लीच्या साहित्य अकादमीचा भाषा सन्मान पुरस्कार