साईबाबा संस्थान, शिर्डी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
साईबाबांचे इ.स. १९१५ मधील छायाचित्र

साईबाबा संस्थान, शिर्डी हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या समाधी मंदिराचे कामकाज पाहणारे व साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा पुरविणारी संस्था आहे. या संस्थानाकडून इतरही अनेक समाजोपयोगी कामे केली जातात. याची स्थापना दिनांक १३ फेब्रुवारी, इ.स. १९२२ रोजी अहमदनगरच्या सिटी सिव्हील कोर्टाकडून झाली.

सभा[संपादन]

साईबाबा संस्थानची पहिली सभा दासगणू यांच्या अध्यक्षतेखाली संस्थानच्या स्थापनेनंतरच्या पहिल्या रामनवमीला म्हणजेच दिनांक ६ एप्रिल, इ.स. १९२२ रोजी झाली होती.[१]

उत्पन्न[संपादन]

साईभक्तांकडून मिळणारी देणगी हे संस्थानाचे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. पहिल्या वर्षी म्हणजे इ.स. १९२२ साली रामनवमीला संस्थानला ७७३ रूपये साठ पैसे देणगी जमा झाली होती तर इ.स. २०१२ साली रामनवमीला तीन कोटी नऊ लाख सदोतीस हजार रोख रक्कम, ६९६ ग्रॅम सोने व पावणेतीन किलो चांदी संस्थानकडे साईभक्तांकडून जमा झाली.[१] उत्पसंदर्भ आणि नोंदी

  1. a b "तीन दिवसात सव्वातीन कोटींचे दान" (मराठी मजकूर). ४ एप्रिल, इ.स. २०१२ रोजी पाहिले. 

बाह्य दुवेसाईबाबा संस्थानचे अधिकृत संकेतस्थळ[संपादन]